Home साहित्य रिक्षावाले : काही वात्रटिका

रिक्षावाले : काही वात्रटिका

0

रिक्षाचालकांच्या काही (विचित्र) सवयी आपल्या नजरेतून सुटत नाही. त्यात आपले वात्रटिकाकार गजाभाऊ मुळात वात्रटच. तसे बरेच सभ्य / शिस्तप्रिय रिक्षावाले त्यांचे मित्र सुद्धा आहेत बरं का !. अन् बरेच ……… जाऊ द्या.

या वात्रटिका आवडल्यास जरूर कळवा. शेअर करा.
— संपादक


पटकन एक पिंक टाकतो
केली कि रिक्षा चालू
बिनधास्त मोबाईल वर
मग लागतो तो बोलू


संकटात मीटरप्रमाणे पैसे
म्हणजे वेडेपणा वाटतो
अव्वाच्यासव्वा भाड्याने
प्रवाश्यांना लुटतो


जायचे ठिकाण सांगितले
की याचे उत्तर ठरलेले
रिक्षात पेट्रोल कमीच
आता उरलेले


रिक्षात बसलो तर
खड्डे नाही टाळणार
त्याची सवय
बरोबर पाळणार


जवळचे भाडे त्यांना
मुळीच आवडत नाय
अन त्यांना अद्दल घडविणे
आम्हाला परवडत नाय

गजाभाऊ लोखंडे.

— रचना : गजाभाऊ लोखंडे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version