Wednesday, February 11, 2026
HomeUncategorizedरिचार्ज…

रिचार्ज…

दररोज न चुकता करावे
लक्षात ठेऊन
नाही केले तर
संपर्क तुटतो जगाशी,

तसे आपले जग
अगदी छोटेसे
आपले सारे विचार विश्व
या जगाच्या परिघाशी,

जुने आणि टिकाऊ
आहेत हे ऋणानुबंध
काही रक्ताचे, मैत्रीचे,
जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध

खूप काळजी घेतो आम्ही
त्यांना मनापासून जपतो
आमच्या सुख, दुःखात
त्यांना भागीदार करतो

नवी नाती जमवणे
यात खरेच ऊर्जा असते
नवे विचार समजून घेणे
हेच आव्हान असते

संबंधाचे महत्व कळले तर
नाती सतत रिचार्ज होतात
वेळ कोणतीही येवो
सारे आपल्या जवळ असतात.

हेमंत भिडे

— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments