श्री दुर्गामाता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग, तसेच जे. आय. एम. स्विमिंग अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय ओपन वॉटर मॅरेथॉन स्पर्धेत 30 किलोमीटर अंतर लहान वयात पूर्ण करून कु. रुद्राक्षी मनोहर टेमकर हिने पाचवा क्रमांक संपादन केला. देशभरातील आलेल्या स्पर्धकांमधून कमी वयाची मुलगी होण्याचा मान देखील तिने मिळवला आहे.
रुद्राक्षीने 30 किलोमीटर अंतर 7 तास 12 मिनिटे 57 सेकंदात पूर्ण करून आपला नावलौकिक उंचावला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे नाव देखील राष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले आहे याबद्दल तिचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे (इंग्रजी माध्यम), गिरीश पाटील (मराठी माध्यम), मुख्याध्यापक तसेच मराठी माध्यमाचे पर्यवेक्षक शशिकांत म्हात्रे, इंग्रजी माध्यमाचे ज्येष्ठ शिक्षक जगदीश मढवी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक रमाकांत गावंड, विद्यालयाच्या प्रिन्सिपल पूजा अंजनीकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ती सराव करते, त्या जलतरण तलावाचे व्यवस्थापक श्रीकांत जाधव व सर्व क्रीडाप्रेमी सहकारी यांनी ही तिला शुभेच्छा दिल्या.
अल्प परिचय
कु. रुद्राक्षी मनोहर टेमकर हि मूळ अलिबाग तालुक्यातील नवीन कमळपाडा येथील असून ती सध्या आर.के.एफ.जे.एन.पी. विद्यालय, शेवा टाऊनशिप, उरण या शाळेत इयत्ता सातवीत आहे.तिचे मार्गदर्शक किशोर पाटील तसेच प्रशिक्षक हितेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ती उरण नगरपालिकेच्या जलतरण तलावात प्रशिक्षण घेत आहे.

– लेखन : विठ्ठल ममताबादे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800