काही नाती मनामनाची, टिकती ती किती ?
कोणते हे रेशीमबंध, काय वर्णू महती ?
सुखदु:खात सदैव सोबत, आधार वाटतो,
स्नेहाचा हा चिवट धागा, टिकून राहतो,
संवादाने इथे थाटल्या, कितीतरी ह्या बागा,
हास्यफुले अन भावना वेलींवर, सुगंधाची शोभा,
तुझे नी माझे नाते जपता, वीण घट्ट होते,
कुटुंबच जणू नवीन झाले, धन्यता दाटते,
कलागुणांना बहर येतसे, विविध प्रयोग होती,
चवीचवीचे किती चोचले, नव्या नवीन रिती,
सहप्रवास अन यात्रा सोबत, आठवणी जागल्या,
तृप्त मनाने, श्रद्धेसाठी, नवजागर झाला,
सणासुदीला बहार येते, उत्साहास उधाण,
नटणे, सजणे, मिरवण्याचा, सगळ्यांना मान,
गुणानुसार संघटन करूनी, संधी सगळ्यांना,
नवे नवे जे पदाधिकारी, पाठींबा त्यांना,
आठवणी, किस्से अन फोटो, हजारोंनी झाले,
आनंद मनातून, ह्रदयी प्रेमाचे, ते भरते आले,
अनेक वर्षे सोबत ज्यांची, प्रेम, ममता, माया,
एक नवा विक्रम करूनी, साधली ही किमया…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
आपल्या ह्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा
बहोत खूब. अभिनंदन. या प्लॅटफॉर्म वर पाहून आनंद झाला. हेमंत भिडे हे सहज, सुंदर, भावपूर्ण, अभिव्यक्ती, यांनी ओत, प्रोत भारलेले, चैतन्याने सळसळणारी व्यक्ती आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.💐🌷🏵️💐