क्षितिज
मंडळी, जानेवारी २०२४ मध्ये विश्व मराठी संमेलनात सहभागी होण्यासाठी मी भारतात आलो होतो, त्यावेळेला मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी ला भेट देण्याचा योग आला. तिथे सी आर शेलारे या चित्रकाराचे प्रदर्शन भरले होते ते बघण्याचा आणि त्याला भेट देण्याचा सुद्धा योग आला.
चित्रकार शेलारे यांनी काढलेल्या अनेक चित्रांपैकी २०२३ सालामध्ये काढलेल्या “पीस” या चित्राकडे बघून मी एकदम भारावून गेलो. या चित्रांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या पर्वतराजी, डोंगररांगा आणि त्यांच्यामध्ये प्रतिबिंबित होणारे वेगवेगळ्या प्रकारचे रंग बघून एकदम प्रसन्नतेचा भाव माझ्या मनात दाटून गेला.
पुढे जुलै महिन्यामध्ये मी युरोपमधील “टूर दे मोंट ब्लांक” नावाचा अतिशय कठीण असा ट्रेक करायला गेलो होतो. स्वित्झर्लंड, इटली आणि फ्रान्स या तीन देशांमधून जाणारा आल्प्स पर्वतराजी मधला “मोंट ब्लांक” हा सर्वात उंच पर्वत आणि हा ट्रेक त्या पर्वताच्या भोवती अतिशय खडतर चढाई करून जवळजवळ 170 किलोमीटरचं अंतर कापून करावा लागतो.
मी जेव्हा हा ट्रेक करत होतो तेव्हा आम्हाला तो सतत दिसणारा पर्वत पाहताना आणि त्याच्या भोवतीची सुंदर दृश्य आणि नजारे पाहताना मला सतत “त्या” चित्राची आठवण होत होती. तिथे ट्रेक करताना जाणवलं की हे चित्र नुसतेच चित्र नसून आपल्या मनामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या चढ-उताराला कसं रंगीबेरंगी पद्धतीने साजरे करून, आयुष्य जगण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मला या चित्रातून दिसला. त्यामुळे मी या चित्राकडे बघून आणि माझ्या “टूर दे मोंट ब्लांक” या ट्रेकला अनुषंगून केलेली कविता तुमच्यापुढे सादर करत आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन : शैलेश देशपांडे.
रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800