धारावाहिक
मंडळी,
खरंतर मुंबई म्हणजे कित्येकांसाठी स्वप्ननगरी !! अनेक लोकं मुंबईला त्यांच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात आणि असं म्हणतात की मुंबई बहुतांशी लोकांना निराश करत नाही. माझ्यासारख्या मुंबईमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्यांसाठी मुंबई ही एक आदर्श, स्वप्नवत जन्मभूमी आणि कर्मभूमी वाटते.
पण जेव्हा आपण विमानाने मुंबईहून कुठे जातो किंवा मुंबईला येतो, तेव्हा विमानाला धारावीवरून जावेच लागते. आपण विमानातून जेव्हा खाली बघतो तेव्हा आपल्याला दिसतं ते एक भयाण वास्तव.. त्या झोपड्या, आणि त्या निळ्याश्या ताडपत्रींमागे झाकलेला तो स्वप्नांचा चुराडा…

२०२४ मध्ये मुंबईतल्या चित्रकार राधिका बावा यांनी काढलेलं “द ब्लू सी” नावाचे चित्र बघितलं की त्यामध्ये याच धारावीचं निळशार रूप आणि ती कधीही न संपणारी स्वप्न आपल्याला दिसतात. जानेवारी २०२४ मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी ला भेट देण्याचा योग आला तिथे हे चित्र बघून माझ्या मनात आलेले विचार माझ्या या कवितेतून मी तुमच्यापुढे सादर करत आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.
— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800