“मोकळी”
मंडळी,
Terry Lacy यांच्या “Murmuration” या चित्रात आपल्याला दिसते ती एक शांतपणे बसलेली स्त्री — तिची नजर दूर कुठेतरी हरवलेली, एकाच वेळी स्थिर आणि अस्वस्थ. तिच्या डोक्याच्या मागे पक्ष्यांचा थवा झेप घेताना दिसतो, जणू तिच्या विचारांनीच मोकळं होण्यासाठी मारलेली भरारी.
तिच्या भोवतीची शांतता, आणि डोक्यातून उडणाऱ्या पक्ष्यांचं लयबद्ध झुंडीत उडणं, हे दृश्य पाहताना माझ्या मनात एक अंतर्गत मुक्ततेची प्रतिमा उमटली. हे पक्षी म्हणजे मनात साठलेले कावळे … विचारांचे, आठवणींचे, अपराध गंडांचे.
“मोकळी” ही कविता म्हणजे भावनांची, आणि आठवणींची मुक्तता आहे. शेवटी स्वतःच्याच छायेतून बाहेर पडून घेतलेली एक झेप. ही कविता केवळ एका चित्रावर भाष्य नाही. ती आपल्या सगळ्यांच्या आतल्या “पिंजऱ्यांची” ओळख आहे.
यूट्यूब चॅनलची लिंक इथे खाली देत आहे.
मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800