Tuesday, January 14, 2025
Homeकलारेषांमधली भाषा : ८

रेषांमधली भाषा : ८

मंडळी,
उत्तर गोलार्धामध्ये आता थंडी वाढते आहे आणि अमेरिका आणि युरोपमध्ये देखील आता बर्फ पडायला सुरुवात झाली आहे.

भारतामध्ये हिमालयाच्या आसपासचा प्रदेश वगळला तर बाकीच्या ठिकाणी फारशी बर्फवृष्टी होत नसल्यामुळे भारतीय कलेमध्ये बर्फाचा फारसा वापर आढळत नाही. परंतु युरोपियन चित्रकलेमध्ये सिम्बॉलिझम या चित्र प्रकारामध्ये चिन्हांचा वापर हा प्रबोधन करण्यासाठी केला जातो, त्यामुळे काही युरोपियन चित्रांमध्ये आपल्याला बर्फाचा वापर प्रकर्षाने जाणवतो.

प्रसिद्ध चित्रकार पॉल गॉगविन यांनी १८९४ मध्ये काढलेल्या “पॅरिस इन द स्नो” हे असेच एक चित्र. फ्रेंच साहित्यामध्ये खडतर आणि कठोर असा हिवाळा दर्शवण्यासाठी, ज्याला इंग्लिशमध्ये “व्हाईट डेथ” म्हणतात किंवा शरणागती दर्शवण्यासाठी बर्फाचा सिम्बॉलिक दृष्ट्या वापर केलेला जाणवतो.

अमेरिकेमध्ये राहत असल्यामुळे गेली बरीच वर्षे मी बर्फवृष्टी अनुभवतो आहे. दरवेळेला बर्फाच्छादित घरं किंवा बर्फाच्छादित डोंगर बघून जग थांबल्याचा भास होतो आणि आपण आयुष्यात मागे तर जात नाही ना अशी एक भावना मनात येते. हेच विचार माझ्या या कवितेतून मी तुमच्यापुढे सादर करत आहे.

व्हिडिओ लिंक इथे खाली देत आहे.

मला आशा आहे की ही कविता तुम्हाला जरूर आवडेल. कविता आवडली तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करा, धन्यवाद.

— लेखन : शैलेश देशपांडे. रिचमंड, वर्जिनिया, अमेरिका
— निर्माती : सौ अलका भुजबळ. +91 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. कविता आणि चित्रकाराचे चित्र खूप भावले..चित्रकाराने काढलेल्या बर्फाच्छादित चित्र पाहून “मी मागल्या वेळेस काय करीत होतो”.. हे भूतकाळाचे मोजके शब्द चित्रण खूप काही सांगून गेले…पश्चिमी देशात राहूनही इतकी शुद्ध मराठी बोलता हे पाहून आनंद झाला..भारतात तर आता घराघरात इंग्रज राहतात असे वाटते…आपले व आपल्या कुटुंबाचे अभिनंदन
    विजयराज बोधनकर…ठाणे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अहेर on भोगी
राऊत सर संत ज्ञानेश्वर हायस्कूल कुर्ला पश्चिम on रस्त्यावरच्या मुलांसाठी शिक्षकांनी पुढे यावे – रामराव पवार