ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “र्हस्व ” या लघुकथा संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले.
या प्रसंंगी, आपल्या मनोगतात सौ. राधिकाताई म्हणाल्या, “आजपर्यंत वाचकांनी माझ्या लेखनावर भरभरून प्रेम केले आहे. त्या माझ्या वाचकांनाच मी माझा र्हस्व हा कथासंग्रह समर्पित करत आहे”
शॉपीजेन ने प्रकाशित केलेल्या या कथासंग्रहात सौ. राधिका भांडारकर यांच्या एकाहून एक सरस अशा तेरा वाचनीय कथा आहेत.
या प्रकाशनानिमित्त राधिकाताईंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राधिकाताई आपल्या ‘न्युज स्टोरी टुडे‘ वेबपोर्टल वर नियमित लेखन करीत असतात. आपल्या
परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्य प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा !
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
