हा नको तो नको, करता करता,
चाळीशी ओलांडली, काय करता ?
शरीर झाले बेढब, दीदी म्हणे,
महागात पडले, मुंबई पुणे….
आता ती बिजवर शोधू लागली,
तिची तिलाच लाज वाटू लागली..
बिजवराला म्हणे आधीची पोरं,
जिवाला आता, लागलाय की घोर….
प्रेम विवाहा साठी, शोधू लागले,
गल्लीत पोरं, दीदी म्हणू लागले..
उशीर झाला, आता आले कळून,
आता तर, फुल ही गेले गळून….
आता ती ढसढसा रडू लागली,
अन बाकी पोरींना सांगु लागली..
नम्र विनंती, शहाणपणा करा,
आता आई वडिलांचे पाय धरा….
बिलकुल वेडेपणा करू नका,
तर तारुण्य वाया घालवू नका..
दिसतं तस बिलकुल नसतं,
असचं लग्नाचं ही वय असतं….

– रचना : सुभाष कासार.