महत्प्रयासने मिळविलेला मांसाचा तुकडा कसा कोण जाणे घारीच्या चोचीतून पडला. तीक्ष्ण नजरेच्या कावळ्याने त्वरित झेप घेऊन तो पकडला.
अपघातात तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी समजताच तो इतरांबरोबर सांत्वनासाठी आला आणि तिसऱ्याच दिवशी, तिच्या जागी प्रमोशनसाठी मागणीचा अर्ज बॉसला देतांना, दोन लहान मुले, वयस्कर सासू, आजारी सासरे यामुळे उशीराच्या मिटींग्ज, दुसर्या जिल्ह्यातील दौरे तिला कठीण पडतील असे सांगता झाला.
तिच्याबरोबर चर्चा होऊन, काही महिन्यांसाठी ही परिस्थिती तिने मान्य करताच त्याचे प्रमोशन झाले.
हे तिला कळताच दुसर्या डेस्कचा चार्ज घ्यायला न जाता ती मंद हसली आणि राजीनामा पाठवून दिला.
इकडे घारीने मोठ्ठा मासा पकडला होता !

– लेखन : नीला बर्वे. सिंगापूर
सुरेख
अप्रतिम 👌👍