लहानपण देगा देवा
बालपणीच्या आठवणी
भेटता बाल मैत्रिणी
हृदयातील शिकवणी
बाल्यावस्थेत मौजमजा
चिंच, बोरे, कैऱ्या तोडून
मीठ मिरची चटकारे घेत
खावे पदार्थ हाताने फोडून
सकाळी धावपळ शाळेची
गृहपाठ उरकवा झटपट
सांजवेळी जमती सारे
हुंदडायला येती पटापट
दीप लावून सांजारती
शुभंकरोती पाढे म्हणा
पाठांतरी कविता करून
आठवणी येती क्षणोक्षणी
पंधरा ऑगस्ट २६ जानेवारी
प्रभात फेरी, कवायत करावी
खेळाचे शिक्षक राष्ट्रगीत गात
फेरी मैदानावर मारावी
शाळेत रोज फडक्यात डबा
सुकी भाजी लोणचे रानमेवा
अंगण पंगत मिटक्या मारत
नसे खाताना कोणाचा हेवा
रात्रीची शिळी पोळी
कुस्करून लाडू गुळ तुप
दुध भाकरी चटणी खावी
मुखी यायचे गोंडस रूप
गेले ते सारे क्षण राहिल्या
बालपणीच्या आठवणी ताज्या
थालिपीठ, लाडू चिवडा
आता आठवतो फुलबाज्या

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800