महाराष्ट्राचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व स्वच्छता, भूकंप पुनर्वसन, आणि संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काल लातुरात जेष्ठ पत्रकार श्री जयप्रकाश दगडे यांच्या निवासस्थानी काल सदिच्छा भेट दिली. श्री दगडे यांच्या सुविद्य पत्नी प्रा सौ. स्मिता यांच्या कार्यावर राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त डायरेक्टर श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या पुस्तकातील यशकथेचे मनापासून कौतुक करताना ते दिसत आहेत.
या पुस्तकाचे प्रकाशनही मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते करण्यात आले.त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नेते अभय साळुंके, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, उदगीर एम आय डी सी चे गुरुडे, पीटीआय प्रतिनिधी प्रा. विनोद चव्हाण आदींची उपस्थिती होती.