जन्नत …..
बानो चा धीर सुटत चालला होता. ती आतुरतेने माझ्याकडे बघत होती. कधी मी त्या कागदावर काय लिहिलंय हे सांगते, हे ऐकण्यासाठी ती अधीर झाली होती. मी सगळे कागद नीट लावले आणि बानो ला म्हणाले, “जन्नत ने कभी अपने पिता के बारे मे आपसे कुछ पूछा है ?” बानो च्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नचिन्ह होते. त्यात आणखी एका प्रश्नाची भर पडली. आता ती खिन्न वाटू लागली. थोडा वेळ शांत होती नंतर पिंपळाच्या देवीकडे बघत म्हणाली, “हां पूछा था ना. पहले कई बार पूछंती थी, 9फिर मैं डांटती थी तो चूप हो जाती थी. मेरे पास जवाब नहीं है और जन्नत के पास सवाल ही सवाल हैं”. असं म्हणत ती शांत झाली आणि कागदावर काय लिहिलं आहे हे जाणून घेण्याची तिची आतुरता पण शांत झाली होती.
मी कागदावर लिहिलेले जन्नत चे शब्द वाचू लागले, “तू जो भी कोई मेरा बाप हैं वो सकुल मे अपना नाम बताता क्यू नहीं ? कूछ मालूम हैं सब कितना मजाक बनाते हैं मेरा.” एवढं वाचून मी थांबले. बानो चे मोठे मोठे डोळे भरून आले होते. आणि ती तळमळीने एकदम रडू लागली. मनात दाटलेल्या श्र्वासाने जणू हुंदका फोडला होता. मी पण थांबवलं नाही तिला.
त्यावेळी, अश्रू संगे दुःख का वाहून जात नाही ? असा एक निरागस प्रश्न मला पडला होता. पण त्याच वेळी तशी काहीच सोय नाहीय ही जाणीव देखील झाली. बानो ने कसे बसे अश्रू आवरले आणि रिकाम्या डोळ्यांनी त्या कागदकडे बघू लागली. मग म्हणाली, “इतने सारे कागज मे ये एक ही बात लीखी हैं क्या दिदी?.” मी सगळेच कागद वाचले नव्हते. आणि तिचा ही आपल्या जन्मदात्या विषयी प्रश्न पडण्याचा अबोध हक्क कुठे गहाण पडला आहे हेच मोठं कोडं होतं. हे कोडं तिला कसं उलगडेल माहिती नाही. लांब श्वास घेत बानो म्हणाली, “हर कोई नफरत कर रहा है हमसे. जिसने जनम दिया वो भी, जिसको जनम दिया वो भी. सजा देने से पहले गुनाह बताया जाना चाहिए ना दिदी. इस जहन्नुम मे भी जिंदा है, लाश की तरह जिकर दींखाये, तो कोई बरसो”.
माझ्या कडे बानो ला देण्यासाठी कोणतंही उत्तर नव्हतं. मी केवळ ऐकून घेत होते. मी आणखी एक कागद हातात घेतला आणि वाचू लागले, “बाप तो आसमान जितना बडा होता है ऐसा टीचर बोली थी. फिर तू जो मेरा बाप हैं दिखाई देता क्यू नहीं ?” मनाला चटका लावणारे तिचे हे प्रश्न होते. आपण या वस्तीचा एक भाग असण्याचे कारण काय आहे ? आपला कुठलाही दोष नसताना इथे का आहोत ? हे जन्नत च्या हक्काचे प्रश्न होते. पण उत्तर कोणाकडे आहे ?
मी या सगळ्या गुंत्यात असताना बानो मला म्हणाली, “दिदी क्या सिर्फ मां का बच्चा नहीं हो सकता. जो अपनी उतरन जैसी जिंदगी को भी एक उम्मिद से देखती हैं”. मी काय बोलावं की बानो ला तिची आणि जन्नत ची उत्तरं मिळतील हे मला माहिती नव्हतं. पण बानो च्या भिजलेल्या ओढणीचा कोपरा मी बघू शकत होते, त्याचा ओलावा मी समजू शकत होते, एवढाच एक धागा होता आमच्यात.
बानो ने तिच्या भूतकाळातील एक पान उलगडलं होतं आज. ती बोलू लागली, “चौथी क्लास मे बार बार बैठने से बहुत होशियार हो गयी थी मैं. लेकीन उसकी चलाकी को ना समझ पायी उस बरसात वाले दिन”…..
क्रमशः

– लेखन : डॉ. राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
बहुत ही उम्दा कहानी जन्नत हार्दिक बधाई
अभिनंदन 🌷 🌷 🌷 🌷
अध्यक्ष महात्मा गांधी साहित्य मंच गांधीनगर
जन्नत…अत्यंत ह्रदय पिळवटून टाकणारी कथा..
राणीचा प्रत्येक शब्द जणू अश्रुत भिजवलेला वाटतो…