बानो
“चौथी क्लास मे बार बार पढते थे जब तक निकाह नहीं हो जाता. मेरा निकाह भी होने वाला था. रोका(सगाई) हो गया था. कुछ आखरी दीन ही बाकी थे स्कूल जाने के लिये. मैं बहोत खुश ना थी. जिसके साथ रोका हुआ था, वो अजीब आदमी लगता था. उमर मे भी बहोत बडा था. उसकी एक और बिबी भी थी. लेकीन हमारे गाव मे ये आम बात थी.
उस दीन बारिश खूब तेज थी. हम चार पाच लडकिया ही थी स्कुल मे. दरवाजे से सिट कर बारिश के रुकने या कम होने का इंतजार कर रही थी हम. बाहर कीचड फैला था सारा. घुटने तक पैर फसने का डर था. उपर से बारिश और हो रही थी. रुकने के सिवाय कोई रस्ता ना था.”
बानो आता त्या भूतकाळातील पावसात भिजू लागली होती. तिचं भिजणं तिच्या डोळ्यातून अश्रु संगे वाहत होतं. ती बोलता बोलता थांबली आणि अश्रू पुसत परत म्हणाली, “हम पाच लडकिया बडी अच्छी सहेलिया थी. वो दीन बडे प्यारे होते हैं ना दिदी ? इसिलिये जल्दी ही खत्म हो जाते हैं. एक मिठी गोली दुप्पटे से चबाकर सबसे बडे टुकडे के लिये लडकर खाते थे. मेरे हिस्से मे हमेशा बडा टूकडा आता था मिठी वाली गोली का. न जाने फिर इतनी कडवाहट कैसे भर गयी जिंदगी में”?
बानो परत जन्नत ने लिहिलेल्या कागदाकडे बघू लागली. मला काही कामा निमित्त शाळेत जायचं होतं. पण बानो तीच्या भूतकाळातील जखमेच्या खपल्या काढू पाहत होती. ती कधीतरी कोणी कुरवळावी असं वाटणं गौर नव्हतं. मी शांतपणे तिथेच थांबले होते.
शाळेच्या अंगणातील घुडघाभर चिखल, धो धो बरसणारा पाऊस आणि त्या पांढऱ्या ओढणीने डोकं, कपाळ घट्ट बांधलेल्या तिघी लहान लहान मुली. माझ्या भोवती फिरत होत्या. संस्कृती, परंपरा समाज भान राखण्याचा सगळा भार ओढणी रूपात स्त्रियांच्या डोक्यावर त्यांच्या नकळत त्यांची इच्छा, मर्जी असताना नसताना येऊन पडतो आणि त्या तो भार आपल्या अंगाचाच भाग म्हणून मोठ्या श्रध्देने सोसत जातात.
मुलगी, स्त्री कुठेही कोणत्याही समाजाचं प्रतिनिधित्व करू दे तो भार तिच्याच पदराशी, ओढणीशी घुटमळत असतो. असं का असेल ?
बानो चा भूतकाळ आपण जाणून घेणारच आहोत पण मनात खूप मोठं द्वंद्व सुरू आहे तिच्या सोबत पुढे जे काही घडलं त्याचा विचार करून. ती आज ज्या परिस्थितीत आहे, काल ज्या परिस्थितीत होती ……या सगळ्या गोष्टी किती सहज आपण पचवून घेतो…..का पण ?
प्रिय सुज्ञ वाचक हो, तुम्ही यावर तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा. आता मी एकटीच या सत्यकथा लिहिणार नाही. तुम्ही सगळ्यांनी यावर लिखाण करायचं आहे. आपली मतं, विचार मांडायचे आहे. असे आपण सगळे मिळून या प्रश्नाची उकल करत पुढे जाऊ या.
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
खूप ज्वलंत समस्या आहेत या..
अशा कितीतरी बानो अश्रुंच्या पुरात वहात असतील…
सारंच खूप करुण आहे.