शाळेच्या अंगणातील घुडघाभर चिखल बानोच्या आयुष्याचा चिखल करणार होता याचा अंदाज देखील नव्हता त्या छोट्याश्या बानोला जी हसत खेळत ते पावसाचे शुभ्र थेंब आपल्या तळ हातावर घेत होती.
बानोचा चेहऱ्यावर भूतकाळातील तो दाह स्पष्ट दिसू लागला होता. ती पुढे म्हणाली, “हम तीनो बहोत मजे कर रहे थे बारिश की बुंदे अपने हतेली से उडा रहे थे. बीजली कडक रही थी जोरो से. स्कूल के चौकीदार चाचा हमको देख रहे थे. आज चाचा थोडे अजीब लग रहे थे. कुछ मे अंधेरा सा छाने लगा था. बदल भारी हुए जा रहे थे. फित चाचा चिल्लाकर बोले अंदर क्लास मे बैठो. उनकी बात सुनकर हम तीनो क्लास मे जकार बैठ गयी. वहां भी छत टपकती थी. हम एक एक कोने मे बस्ता सिरपर रखे खडी रही.
थोडी देर मे चाचा क्लास मे आये और हम तिनो चाय के कप दिये. हमारे अब्बु के जमाने से बुढे चाचा स्कूल मे काम करते थे. जैसे घर के ही हो गये थे. हम तिनो खुश हो गयी चाय देखकर, क्युकी सलवार कमीज और सिर पर ओढा हुआ दुपट्टा भी भिग कर बालो से चीपक गया था. हमने लपक कर चाय के कप अपने हातो मे ले लिये. चाचा हमारी तरफ देख रहे थे और चाय पिने का इशारा कर रहे थे. चाय पुरी भर भर कर लाये थे चाचा. हम गरम गरम चाय हसते हसते पी गयी.
“बानो चा गळा दाटून आला होता. बोलून बोलून गळा कोरडा पडतो पण बानो चा ओलाव्याने जड झाला होता. ती डोळ्यांच्या डबडबलेल्या कडा ओढणीने दाबू लागली. तिच्या ओढणीला पापणीचा केस चिटकला होता. तिने हसून माझ्याकडे बघून तो केस मला दाखवला आणि म्हणाली, “ये दुआ वाली पलक है दिदी उसके उलटे हातपर रखकर फुकने से जो दुआ मंगी जायें वो दुआंये कुबुल होती हैं. बचपन मे हम तो कितनी पलके खुद ही नोंचकर दुआये मांगती थी. दूआंये भी जरा जरासी होती थी. आज मिठा खाने को मिल जाये, ये भी दुआ कई बार मांगी थी. और मजे की बात ये हैं दिदी की, वो झुटी पलके भी दुआंये कूबुल करवती थी. न जाने कौनसे अल्ला से. और वो चाय तो बिना दुआ मांगे मिली थी. स्कूल मे टीचर जो कप मे चाय पिते थे उस कप मे हम तिनो चाय पी रही थी. चाय ना हो जैसे आबे हयात हो. इतनी मिठी चाय कभी नहीं पी थी हमने. या फिर खुशी के मारे वो मिठी लग रही थी पता ही नहीं चला…..
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ ९८६९४८४८००.
साॅरी ( बानोची) कथा
लालबत्ती कथेतून लेखिका खेडेकर यांनी राणीची जीवनकहाणी समर्थपणे उभी केली आहे.