Wednesday, September 17, 2025
Homeलेख'लालबत्ती' ( ३४ )

‘लालबत्ती’ ( ३४ )

रूपा आणि चीमु शाळेकडून येताना दिसले. रूपा शाळेत कशासाठी गेली असावी असा प्रश्न मनात आला आणि रूपा माझ्या समोर येऊन थांबली. मी काही बोलण्या आधीच रूपा म्हणाली, “ताई, आता मी जास्त दिवस वाचणार नाही माझ्या चीमुचं काय होईल माहिती नाही. शाळेत चौकशी करायला गेली होती मी. मला चिमुला शाळेत जाताना बघायची आहे. मला तिचं खूप कौतुक वाटलं आणि आश्चर्य पण वाटलं चीमु फक्त दोन वर्षाची होती. आता तिला कोण शाळेत घेणार. अंगणवाडी तून तिला शाळेत प्रवेश मिळणार होताच पण त्याला आणखी दोन हवीत. रूपा ने बरोबर हेरलं होतं मला आश्चर्य वाटतेय म्हणून. पण मी तिला काही बोलले नाही.

तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं आणि चीमु ची काहीतरी व्यवस्था करू असं तिला सांगून मी निघणार तर रूपा मला म्हणाली, “ताई विहारात चला ना. बानो दिदी पण आहे तिकडे”. रुपाला काहीतरी सांगायचं होतं कदाचित म्हणून ती विहारात येण्याचा आग्रह करत होती. वस्तीच्या थोडं बाहेर एक हॉल होता. तिथे लहान कार्यक्रम किंवा हेल्थ कॅम्प वगैरे होत असे. मी रुपाला नाही म्हणु शकले नाही

आम्ही तिघी वीहार ला गेलो. तिथे काही महिला आणि मुलं बसली होती. बानो पण तिथेच होती. आम्ही सगळ्या चीमु सोबत खेळत होतो. काही वेळात चीमु रूपाच्या मांडीवर जाऊन बसली. तिचे केस कुरवळताना रूपाचे डोळे भरून आले होते. बानो ने तिच्या पाठीवरून हात ठेवला आणि तिला म्हणाली, “किस किस चीज के लिये रोने वाली हैं तू रूपा. चीमुका का ध्यान रख और अपना भी”. मी पण तिला समजावलं.

रूपा डोळे पुसत म्हणाली, “काय करावं दुःख आज संपतील उद्या संपतील असं वाटलं होतं पण आता तर आयुष्याचं संपायची वेळ आली”. तिला काय म्हणावं हेच कळेना. रूपा पुढे म्हणाली, “आई देवदासी होती पण मला देवदासी बनायचं नव्हतं म्हणून रडून रडून मामाकडे रहायला गेली. तिथे राहून शिक्षण करायचं होतं. दहावी पर्यंत शिक्षण केलं मी पण….”. रूपाचा गळा दाटला होता पण तिला बोलायचं होतं.

बानो तिच्या कडे बघून म्हणाली, “सब के सब जानवर मिले हमको नोच नोच कर मुर्दा बना दिया हैं. अब ना जिस्म बाकी रहा ना जान. मैं भी तो जान बचाकर भागी थी लेकीन क्या हुआ ? फिर गंदगी मे आ गई ना. उस दादी के साथ जब उस बस्ती मे पहोची थी तब लगा था बच गई मैं. लेकीन, वही से बरबादी का फिर नया किस्सा शूरू हो गया. इन दरींदो का बाजार बहोत बडा होता है, बाच के नहीं निकल सकते. कब उस बस्ती मे गाडी रुकी थी मैं भी नीचे उतर गई उस दादी का सामान उतारने लगी थी तो वो दादी तो नीचे उतरी नहीं मेरे उतरने के तुरंत बाद ही गाडी तेजी से निकल गई. उसके बाद……..”
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. राणी ताई, लालबत्ती चे लेख वाचताना मन अगदी कळवळून जाते.त्यांच्या नशीबी आलेल्या या मळकट जीवनाविषयी सहानुभूती वाटतेच. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधता,त्यांची दु:खं समाजासमोर मांडता ,हे केव्हढं महान आहे!!

  2. मँडम
    या वस्ती चे अतिशय विदारक चित्र तुम्ही तुमच्या समर्थ लेखणीतून आमच्या सारख्या सर्व सामान्य लोकांना दाखवता आहात
    किती भयानक कहाणी असेल तिरल्या प्रत्येक व्यक्ती ची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा