Wednesday, February 5, 2025
Homeलेख'लालबत्ती' ( ३७ )

‘लालबत्ती’ ( ३७ )

उधारीचे गोकुळ…..
सुज्ञ वाचकांपुढे मी रेड झोन मधील अनेक बालकांच्या केस वर्क कहाणी रुपात प्रस्तुत केल्या आहेत. आपल्या पुढे ते वेगळं विश्व आणि तिथल्या बालकांची अत्यंत वेदनादायी स्थिती मांडता यावी आणि या बालकांना मुख्य समाज प्रवाहात सामील करता यावं यासाठी आपल्या पर्यंत सत्य आणि तथ्य प्रस्तुत केलं. आपण सगळ्यांनी अनेक वेळा आपले विचार व्यक्त केले. आपला सकारात्मक दृष्टिकोन निश्चितच माझ्या कार्याला बळ देणार आहे.

या पुढे आपल्या समोर आणखी काही अनुभव प्रस्तुत करणार आहे. विविध प्रकारे बालक किंवा बालिका या दुष्ट चक्रात सामील केले जातात आणि यातच जीवनभर अडकून पडतात.

शासनाच्या अनेक योजना मुलांची काळजी व संरक्षण हेतूने आखण्यात आल्या आहेत. आपण जागरूक राहून त्या या मुला पर्यंत पोहचवण्यात निश्चितच मदत करू शकतो.

कान्हा नावाचा सात वर्षाचा बालक आज पहिल्यांदाच शाळेत आला होता. कदाचित खूप घाबरल्या मुळे तो कोपऱ्यात बसला होता. त्याच्या संपूर्ण हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. आज पहिला दिवस असल्या मुळे कोणीही त्याच्याशी बोलत नव्हते. उलट सगळे त्याला चिडवत होते. याची दखल बाईंनी घेतली आणि त्याला आपल्या जवळ बसवले. मी वर्गात गेल्या पासून त्याच्या हालचाली कडे लक्ष देऊन बघत होते. त्याच्या हातांना कंप होता. नंतर कळलं की काही दिवसापूर्वी त्याची आजी वारली.

त्यामुळे गावी जिच्याकडे तो राहत असे तिथून तो परत आला होता रेड लाईट एरिया मध्ये. आणि आज त्याला आईने शाळेत पाठवले होते. बाईंनी त्याच्या आईला शाळेत बोलवले होते. आणि ती थोड्या वेळात येणार होती. मी कान्हा ला आपल्या जवळ बोलवले पण तो आला नाही. मग मी त्याच्या जवळ जाऊन बसले. आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले. पण कान्हा आणखी अस्वस्थ झाला. म्हणून मी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्याला शांत केलं. मी उठून बाहेर गेले तर त्याची आई समोर उभी होती. तिच्या हातात एक फाईल होती.

बाईंनी तिची माझी ओळख करून दिली. तिच्या हातावर आणि चेहऱ्यावर पण जखमेच्या खुणा होत्या. कान्हा सारख्याच. आम्ही बोलत असताना कान्हा वर्गातून बाहेर आला आणि आईचा पदर घट्ट धरून रडू लागला….
क्रमशः

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी