बानो
बानो जन्नातला शाळेत सोडून परत येताना माझी तिची भेट झाली.
बानो च्या हातात एक वही होती. मी दिसताच तिने माझ्या हातात ती वही दिली आणि म्हणाली, “दीदी ये जरा पढो तो जन्नत ने क्या लिखा हैं ?” मी वही बघितली. एका पानावर जन्नत ने आजू बाजूला सुंदर फुले काढली होती. त्यात सुरेख रंग भरले होते आणि लिहिलं होतं ‘एक सपना’ !
रेड लाईट मधल्या मातांची मुले जन्मापासूनच अनेक आव्हानांना तोंड देत मोठी होतात. साध्या साध्या जीवनावश्यक गरजा देखील त्यांना सहजपणे उपलब्ध होऊ शकत नाहीत.
या मुलांसाठी काम करताना खूप सूक्ष्म अभ्यास करण्याची गरज असते. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. बालपणापासून परिस्थितीशी दोन हात करत असताना त्यांना अश्या अनेक सवयी जडतात ज्यांचे अत्यंत नकारात्मक परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसीक आरोग्यावर होत असतात.
आज अनेक वर्षे या बालकांसोबत काम करत असताना जे जे शिकायला मिळालं त्याला अनुसरून काम करत गेले. बालकांचा शैक्षणिक प्रश्न सुटला तर त्यांना सामान्य प्रवाहात येण्यासाठी मार्ग मोकळा होईल. म्हणून त्या दिशेने अनेक प्रयत्न केले. काही यशस्वी पण झाले. तरी आता आणखी बालकांच्या शिक्षणाची व्यवस्था होणं खूप आवश्यक आहे. ते या वस्ती पासून लांब जाऊन आपलं भविष्य सुरक्षित करू शकतील यासाठी त्यांनी शिक्षण घेणं महत्त्वाच आहे.
आपण सगळे वाचक आता या बालकांच्या व्यथा समजू लागले आहात. गोल्डन लेटर्स बालविकास फाऊंडेशन या ट्रस्ट च्या माध्यमातून आम्ही या बालकांच्या शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अनेक बालकांना आमच्या पाटी पुस्तक या प्रकल्पअंतर्गत मदत मिळत आहे. या प्रकल्पाची सविस्तर माहिती माझ्या कडून आपणास मिळू शकेल.आपल्या छोट्याश्या प्रयत्नांनी ही बालके शिकू शकतील आणि आपली स्वप्न पूर्ण करू शकतील.
समाजाच्या सकारात्मक आणि स्विकारात्मक विचारांनी निश्चितच ही फुले बहरतील.
क्रमशः

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
अध्यक्ष, बाल कल्याण समिती. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800