बानो आता माझ्या शेजारी नव्हतीच. तो गोड चहा प्यायल्यावर चक्कर आल्यानंतर तिने ज्या ठिकाणी डोळे उघडले त्या विश्र्वातून ती माझ्याशी बोलत होती जणु.
बानोच्या डोक्यावरची ओढणी वाऱ्याने खाली खांद्यावर ओघळली. एरवी सतत ओढणी सावरणारी बानो यावेळी मात्र ओढणी न सावरता तशीच पुढे बोलू लागली.
“आँखें खुली तो इतना अंधेरा था के दिन हैं या रात, ये भी समझ ना आ रहा था. आँखें मलती रही बहोत देर तक. पेट मे मरोड उठ रही थी भूक के मारे. उल्टी सी हो रही थी. वहा और भी बच्चे थे. लेकीन कूछ दिखाई नहीं दे रहा था. बस सबके रोने, सिसकने, चींखने की अवाजे आ रही थी. मेरी तो आवाज ही नहीं निकल रही थी. अंदरही कही दफन हो गयी थी. लेकीन इतना तो जान गयी थी मैं के किसी गलत जगह पर हुं.
मैं वहा क्यू, कैसे पहुची थी ये सब सोचने ही लगी थी तो, मोंमबत्ती लिये कोई चाचा कमरे मे आये और, सबकी तरफ गुस्से से देखने लगे, चिल्लाने लगे. सारे बच्चे चूप हो गये. मैं तो अभी रोई भी नहीं थी. वो चाचा एक थैली मे बिस्कुट लेके आये थे. बिस्कुट दिखाकर बोले, “ये चाहिए तो गला फाडना बंद करो और जो मैं बोलू करते जाओ चुपचाप.” सबने हां वाली मुंडी हिला दी.
हम सब न जाने कब से भूके थे. लपक लिये बिस्कुट पर. लेकीन पानी नही दिया उस चाचा ने किसीको भी. हम रो रो कर पानी मांगते रहे. चाचा बाहर चले गये. बाहर से ताला लगा दिया था.
इस तरह चार दिन मे खाली दो बार बिस्कुट मिला और एक बार पानी. हम सब को वहा क्यू रखा था ये समझ नहीं आ रहा था. फिर चार दिन बाद मेरे साथ तीन लडकियो की आँखो पर पट्टी बांधकर ले जाया गया. न जाने कहा जा रहे थे. हात, मुह सब बंधा था. बस घसिटकर ले जा रहे थे. सिर से चिपका दुपट्टा पता नहीं कहा गुम हो गया था”.
बानो एक टक समोर बघत होती. हे सगळं ऐकताना मी सुन्न झाले होते. किती ही दुष्टता ? कोणावर विश्वास ठेवायचा ? बानोच्या वडिलांना ज्या माणसाने लहानाचं मोठं होताना बघितलं त्याच माणसाने बानो ला या भयानक विश्वात ढकलण्यात मदत केली होती. पालकांनी किती सजग रहायला हवं. आपल्याच माणसावर विश्वास ठेऊ नये अशी शिकवण द्यावी लागते मुलांना. माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे. आपल्याच गावातील, घरातील आजोबा, काका, मामा, दादा यांच्या सोबत वावरताना अविश्र्वासाने वावरायचं हेच शिकवावं लागतं मुलांना. कशी घडणार ही लेकरं या असुरक्षित वातावरणात ?
क्रमशः

– लेखन : डॉ राणी खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.