रेड झोन मधील निष्पाप, निरागस लेकरांच्या संवेदनशील सत्यकथा आपल्या सगळ्यांसमोर 47 भागांच्या लेखमालेतून गेले वर्ष दीड वर्ष मांडल्या.
‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टल या माझ्या परिवाराने मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले.
श्री देवेंद्र भुजबळ सर आणि सौ अलका मॅडम यांचे आशीर्वाद आणि जिव्हाळा मला कायमच या न्युज पोर्टल शी जोडून ठेवणार आहे.
भारत आणि इतर 86 देशातील माझ्या प्रिय वाचकांचे आभार न मानता मी अखंड आपल्या प्रेमात आणि ऋणात राहू इच्छिते.
“चौथा स्तंभ” हा अत्यंत मानाचा पुरस्कार, एकता पुरस्कार आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार नुकतेच या पोर्टल ला प्राप्त झाले आहेत, याचा खूप आनंद होतो.
या न्युज पोर्टल या द्वारे मी असंख्य मान्यवर मंडळी यांच्याशी जोडल्या गेले याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद आहे.
माझ्या लेखांच्या माध्यमातून आपण सगळे या बालकांच्या जीवनाशी जोडल्या गेले. त्यांच्या व्यथा जवळून समजून घेतल्या. वेळोवेळी आपले संदेश माझ्या पर्यंत पोहोचले आहेत.
या लेकरांना आपण सगळ्यांनी प्रेम माया आणि आशीर्वाद दिला आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे.
लवकरच एक नवीन विषय घेऊन मी आपल्या भेटीला येणार आहे. आपले प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या सोबत असणारच आहे असा मला आत्मविश्वास आहे.
अगदी थोड्या काळासाठी आपली रजा घेत आहे.
“नतमस्तक माझी लेखणी
आपल्या प्रेमा पुढे”

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800