Friday, December 19, 2025
Homeसाहित्यलावणी : पहिला पाऊस

लावणी : पहिला पाऊस

अहो दिलबरा, ऐका की जरा…हौस माझी पुरवा
पहिल्या पावसात संगतीने लोणावळा फिरवा //धृ//

कडकड हा उन्हाळा
अंगाची झाली काहिली
धडधड ह्या उरात
वाट तुमची पाहिली
भरजरी आता हो राया, शालू आणा मला हिरवा
पहिल्या पावसात संगतीने लोणावळा फिरवा //१//

टपटप हा पाऊस
मन धुंद फुंद झालं
गरगर ही गिरकी
अंगात वारं शिरलं
माझ्या काळ्याभोर केसात माळा तुम्ही आज मारवा
पहिल्या पावसात संगतीने लोणावळा फिरवा //२//

हुडहुडी ही भरली
हळूच घ्या जवळी
तडफड या जीवाची
अजून ना शमली
आता माझ्यासाठी तुम्हीच प्रेमाचा धडा हा गिरवा
पहिल्या पावसात संगतीने लोणावळा फिरवा //३//

शिल्पा सकळकळे

– रचना : शिल्पा सकळकळे. गुरुग्राम, हरियाणा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. खुप सुंदर लावणी
    अशाच छान छान कविता करा
    पराग देशपांडे
    खामगांव

  2. 🌹पहिला पाऊस 🌹
    अप्रतिम रचना
    🌹धन्यवाद शिल्पा मॅडम 🌹
    अशोक साबळे
    अंबरनाथ, ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on माहितीतील आठवणी : 37
सौ.मृदुला राजे on चित्र सफर : 58
गोविंद पाटील सर on बहिणाबाईं…