Home साहित्य लाड़की लेक

लाड़की लेक

2

माझी गोजीरी सोनुली
लेक लाडाची साजिरी
किती करावे कौतुक
जशी तुळस मंजिरी।

लेक मायेची पणती
उजळी हे घरदार
साऱ्या प्रकाश ज्योतीने
देई घरास आकार।

माय बापाचा हा ठेवा
जपावा हा काळजात
जसा उजळी अंधार
कोरी नाज़ुकशी ज्योत।

लेक सुखाची मंजिरी
लेक काळजाचा ठेवा
माय बापाची लड़की
प्रेमे करतसे सेवा।

असे माहेर सासर
जोड़ी लेक दोन घरे
लेक पणती तेवती
उजळी दोन्ही ते उंबरे।

– रचना : अनुपमा मुंजे. नागपुर
– संपादन : देवेंद्र भुजबळ.. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. लेकीचे कौतुक करताना ती कुटुंबासाठी किती मोलाची असते हे छान वर्णन केलंय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version