नीरवतेला छेदत छेदत
चिरेबंदि ढासळते आहे
देवघरातिल ज्योत बापुडी
तेलाविण फडफडते आहे
आकांक्षांचा गळतो मोहर
जाणिव देठातुन तुटलेली
बधिर जाहल्या चित्तवृत्तिला
वैराग्याची कफनी चढली
गर्भाच्या डोहात पाहिली
थरथर स्वप्ने विरती आता
चिरंतनाची शीग गाठण्या
उणा जाहलो हे भगवंता !
ऐऱ्यागैऱ्याच्या हसण्याची
कीव करावी तितुकी थोडी
अथांगात मज रोजच माझी
लोटावी लागतसे होडी
— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

सुंदर