Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यवर्धा साहित्य संमेलन लेखमाला : वाचक लिहितात...

वर्धा साहित्य संमेलन लेखमाला : वाचक लिहितात…

वाचकहो, मी तुमचा ऋणी आहे.
वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाहून आल्यानंतर मी एकूण ११ लेखांची मालिका लिहिली.
ती वाचून ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक मा. देवेंद्र भुजबळ यांनी ती या पोर्टल वर प्रकाशित करण्याचे ठरवले. त्यासाठी लेखांना अनुरूप अशी छायाचित्रे ही माझ्याकडून मागून घेतली याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे.

प्रत्येक दिवशी (रविवार सोडून) न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलवर ही मालिका प्रकाशित झाल्यावर चहू कडून या लेखमालेवर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला. तेव्हा त्या प्रतिक्रियांना सामावून घेता येईल असा एक समारोपाचा लेख लिहावा असे मला मा. देवेंद्र भुजबळ यांनी सुचवले. त्याचा परिपाक म्हणजे हा लेख होय.

लेख वाचून सुरवातीलाच कल्याणचे अध्यात्मिक कवी मा. अरूण गर्गे यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. ते लिहितात, “कल्याणचे काव्यभूषण व योग्य शब्दयोजक श्री . प्रवीण देशमुख यांची साहित्यसेवा व कार्य हे वाचकांना अंतर्मुख व आनंददायक ठरले आहे.
शब्दातील माधुर्य हे त्यांच्या स्वभावांत मुरलेले असलेने प्रत्ययशील माणुसकी त्यांच्या सहवासांत असलेल्यांना जाणवते. सुंदर शब्द समायोजनाने जशी त्यांची कविता फुलते, तसेच जिव्हाळा व आपुलकीने “माणूस” जोडण्याचा त्यांचा स्वभाव आपल्याला त्यांच्या मित्रपरिवाराचा विशाल परीघावरुन समजुन येतो.
त्यांच्या कार्यशीलतेला व सृजनात्मक काव्यहुंकारांना माझ्या अमेय सदिच्छा ! ! 🌹🕉️”

त्यानंतर प्राप्त झालेल्या काही निवडक प्रतिक्रिया या प्रमाणे :-
माझे मित्र डॉ. बळीराम गायकवाड, प्राचार्य कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालय यांनी लिहीले,
“अभिनंदन सर 👏👏💐💐
साहित्य संमेलन सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या लेखमालेची सर्वांना अत्यंत मदत होईल आणि या निमित्ताने ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्याचा लेखाजोखा ही शब्दबद्ध होत आहे याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन”👏💐

डॉ. दिपक वैद्य यांनी कौतुक करतांना म्हटले,
“वर्धा साहित्य संमेलनात तुला कवी म्हणून निमंत्रित करण्यात आले, ही कौतुकास्पद व अभिमानाची गोष्ट आहे.
तुझी काव्य व साहित्यातील प्रगती पाहून खूप आनंद वाटला.
तुझ्या नवीन,’ सांज् वात’ काव्यसंग्रहाला खूप शुभेच्छा.”

मा. उज्वलाताई मेहेंदळे कार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या लिहित्या झाल्या.
“फार छान आणि बारकाईने केलेले विस्तृत विश्लेषण!”

प्रा. नरेंद्र पाठक,
सदस्य साहित्य अकादमी, कार्याध्यक्ष अ.भा.सा.परिषद महाराष्ट्र, यांनी लिहीले,
“मी सर्व लेख वाचले, अनुभव, साहित्य विचार, आणि सकारात्मक कथन आहे.”

मा. डॉ. राजेंद्र मुंढे, लेखक, वर्धा यांनी कळविले,
“कविवर्य मित्रा, फारच सूक्ष्म आणि अचूक निरीक्षणावर आधारित लिहिले. आवडले. धन्यवाद.”

मा. माधुरी वैद्य, प्रख्यात लेखिका व कवी यांनी लिहीले,
“आपण शेवटी म्हणालात ते अगदी खरे. आपल्याला संमेलनात प्रत्यक्ष भाग घेता आला, अनेकांची भेट झाली, ओळखीही वाढल्या असतील, आपले पुस्तक प्रकाशित झाले. त्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन ! मराठी भाषा संवर्धन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. एका संमेलनामधून सर्वच अपेक्षा रातोरात पुऱ्या होतील हे शक्यच नाही. पण त्या दिशेने वाटचाल होत असेल तरी थोरच काम म्हणायचे. आपले पुनश्च अभिनंदन !👍🙏💐💐💐💐💐”

मा. श्रीधर खंडापूरकर, पाणी वाचवा चळवळीचे प्रणेते, कवी व संपादक, लिहितात,
“कवी मित्र श्री.प्रविणजी आपले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथील सर्वच लेख अतिशय अभ्यासपुर्ण आहेत. जणु आपणच हा आनंद घेत आहोत हा अनुभव प्रत्ययास आला.🌹👌🙏🏼”

मा. कवी मनोहर मांडवले यांनी लिहीले,
“सर, साहित्य संमेलनाबद्दलचा तुमचा हा “ऑखों देखा हाल” फारच सुंदर आणि संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभं करणारा आहे. 👌👌👍🏻👍🏻🙏
खूपच सुंदर, सविस्तर आणि यथार्थ असे हे तुमचे लेखांक आहेत सर! 👌👌👍🏻👍🏻🙏
सर्वच लेख मालिका छान विवेचनात्मक झालीये ! 👍🏻👍🏻💐🌺💐🌺💐”

मा. कैलास बडगुजर, शिक्षक व कवी हे लिहीतात,
“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अतिशय सुंदर वर्णन 👌
एकूण वार्तांकन एकत्र पीडीएफ स्वरूपात तयार केल्यास छान होईल. 👍
सर्व भागांची मांडणी उत्तम व प्रवाही, अगदी क्रिकेट सामन्यांचे समालोचन प्रमाणे झाली आहे. अगदी स्वतः त्या संमेलनात सहभागी असल्याचा आनंद मिळतो 🙏🙏”

मा. प्रकाश आठवले, पुणे यांनी लिहीले,
“आपण खूपच छान व सविस्तर माहिती देत आहात त्यामुळे प्रत्यक्ष येता आले नाही तरी घरी बसून आनंद मिळत आहे, असेच लिहा”

माझे स्नेही व रा.स्व.संघाचे क्षेत्रीय प्रचार प्रमुख मा. प्रमोद बापट यांनी लिहीले
“मनःपूर्वक अभिनंदन.. चिमुकल्याची आर्त हाक काळजात कालवाकालव करून गेली. प्रस्तुतीही सुंदर…”

पुण्याचे मोहनीराज भावे लिहीतात “साहित्य संमेलनाला उपस्थित राहता येत नाही त्यांना थोडक्यात तेथील वृत्तान्त या लेखमाले मधून कळेल. साध्या पद्धतीने मांडल्याने अनुभवता येते. दूरचित्रवाणी माध्यमे फक्त राजकारण दाखवत असताना यातून छान माहिती मिळाली.
धन्यवाद 🙏”

संवादिनी वादक व संगीत दिग्दर्शक मा. अनंतराव शेवडे यांनी लिहीले,
“वर्धा साहित्य संमेलनात तुम्हाला प्रत्यक्ष कार्याध्यक्षा तर्फे निमंत्रण आले हीच फार आनंदाची गोष्ट आहे. शिवाय “सांजवात” हा तुमचा काव्य संग्रही छापून तयार झाला. तुम्ही प्रतिभावंत कवी आहातच. आपल्या गुरूवारच्या भजनी मंडळात देखील नेहमी स्वरचित अभंग सादर करता व स्वत: :उत्तम गाता. आम्ही तुमच्या कलेचा आदर करतो. असेच कायम लिहीत रहा. वर्धा साहित्य संमेलना साठी पुन:श्च खूप खूप शुभेच्छा ..💐”

मित्र दिलीप काळे लिहितात,
“खुपच छान वर्णन केले आहेस. प्रत्यक्ष बघायला फारच छान वाटले असेल. तुझ्या लिखाणातून तु प्रत्यक्ष संमेलन स्थान वाचकांसमोर उभे केलेस. खुप खुप धन्यवाद.”

सौ. संपदा राजेश देशपांडे यांनी लिहीले,
“प्रवीण देशमुख सर वर्धा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे यथायोग्य आणि परीपूर्ण असे वर्णन आपण आपल्या ओघवत्या शैलीत केले आहे. प्रत्यक्ष हजर न रहाताही सर्व संमेलन आपण शब्दरुपाने डोळ्यांसमोर उभे केले आहे.”

कादंबरीकार सौ. मिनल मोहनीराज वसमतकर यांनी लिहीले “न्यूज स्टोरी टुडे’ यात प्रवीण देशमुख यांचे लेख वाचले. त्यातील अखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा, इथे झालेल्या संमेलनाचा साध्या आणि सोप्या भाषेत दिलेला सुंदर असा वृत्तांत खुप काही सांगून जातो. तसेच वाचत असताना संमेलनाचे चित्र समोर उभे राहते. इंग्रजी बोली मुळे मराठी भाषा लोप पावते आहे असे म्हटले जाते. पण हिंदी साहित्यकार विश्वनाथजी तिवारी यांनी मराठी भाषेबद्दल गौरव उद्गार काढून संतसाहित्याचे दाखले दिले. तर मुख्यमंत्र्यांनी साहित्यक्षेत्रात राजकीय दबाव नसेल असे सांगितले. असे सुंदर विवेचन या लेखांत दिसते.”

विनायक लळीत या बदलापूरच्या गझलकारांनी लिहीले, “सगळे लेख अप्रतिम आहेत… आज निवांत बसून वाचले…. एखादी व्यक्ती वर्ध्याला गेली नसेल तरी ही लेखमाला वाचून साहित्य संमेलनात प्रत्यक्ष असल्याची अनुभूती नक्कीच घेईल यात संशय नाही.. सर्व घटनाक्रमाचे शब्दांकन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏”

पत्रकार संदीप बोडके नवीन पनवेल हे लिहितात,
“वाह… छान आहे लेखमाला… आपल्याबरोबर साहित्य संमेलनात फेरफटका मारल्याचा आनंद मिळाला…”

लेखिका व कवी वृंदा टिळक यांनी लिहीले,
“खूपच छान लिहित आहात ही लेखमालिका. मी सगळे भाग वाचले. सगळे वर्णन वाचताना आपण अगदी प्रत्यक्ष तिथे आहोत असेच प्रत्येक वाचकाला वाटले असेल.
तुमच्या कवितेचे हृदयस्पर्शी सादरीकरण प्रत्यक्ष पाहिले, ऐकले होतेच. घराघरात असणारी परिस्थिती अगदी सोप्या शब्दांत तुम्ही मांडली आहे.”

या प्रमाणे अगणित वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया कळविल्या. फोन करून माझा उत्साह वाढविला. त्यात निवृत्त संघ प्रचारक मा. बाबा जोशी, अजेय संस्थेचे मा. गौरव संभूस, शिक्षिका सौ. सायली कुलकर्णी, ऋतुजा गवस, मा. ज्योतिताई शेटे, सौ. संध्या म्हात्रे, प्रा. प्रमोद काळे, अभिनेते मा. सुधाकर वसईकर, निवेदक मा. सुधीर चित्ते, दुकानदार मा. तारक माळी, ग्रंथपाल मा. विलास धारप, ॲड. प्रसाद शिर्के, पोलीस अधिकारी बाळकृष्ण वाघ, वृत्तपत्र विक्रेत्या सौ मंगला कांगणे, सार्वजनिक वाचनालयाचे सरचिटणीस व लेखक मा. भिकू बारस्कर , प्रा.डॉ. ऋता खापर्डे, डॉ. निशांत भावे, डॉ. शिरीष ठुसे, सौ योगिनी बाक्रे, सौ. संजीवनी जगताप, मा. रविंद्र भालेराव, सौ. प्रतिभा देशमुख, सौ. नयना देशमुख, मा भास्कर साठे, मा. किशोर घैसास, मा. समीर देवळे, डॉ एन. जी. इंगळे यांचा समावेश आहे. यांनी अशा अनेकांनी लेख वाचून प्रतिक्रिया दिल्या याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

सर्वात शेवटी माझे मित्र, स्व.लतादीदींवरील ज्यांचे गाणे नुकतेच संगीतबद्ध झाले असे डॉ. दीपक वझे यांनी मला जी काव्यमय प्रतिक्रिया पाठविली त्याने मी भारावून गेलो. ती काव्यमय प्रतिक्रिया पुढे देत आहे.त्याचबरोबर माझी ही लेख मालिका काही हजार मराठी वाचकांपर्यंत ज्यांनी पोहोचविली त्या ‘न्युज स्टोरी टुडे’ चे संपादक मा. देवेंद्र भुजबळ यांचे पुनश्च आभार मानून मी माझ्या लेखणीला विराम देतो.
इति लेखनसीमा…………..

प्रवीण देशमुख

– लेखन : प्रवीण देशमुख. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments