निरोप तुजला सरत्या वर्षा देऊ कसा आता
बांधावरल्या क्षितिजा पल्याड सुर्य डूबला होता
गेले वर्ष सरून सारे कळले नाही आता
गत वर्षाचा एक एक दिवस महत्त्वाचा होता
कसा गेला एक एक दिवस काय सांगू मी कथा
तूच समजून घे आता आमच्या जीवनाची व्यथा
आनंदात दुःख दुःखात आनंद तुच दिले आम्हास
असेच जीवन जगण्याचा आहे आमचा प्रयास
गेल्या वर्षांत अनेक घटना जीवनात घडल्या होत्या
निरोप देतांना आज त्या आठवणीत राहिल्या होत्या
श्रृष्टिचे हे जीवनचक्र सदा असेच फिरत असते
एक एक दिवस संपत जातो वर्ष संपून जाते
— कवी : चंद्रशेखर कासार. धुळे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
