वळणा वळणावर दचकतो मी..
रस्ता कुठला तरी पकडतो मी….
बरोबर असलो की हरकतो मी….
कळली चूक की पस्तावतो मी….
का बरं वळणाला धडपडतो मी…..
काटेरी पाहून ती घाबरतो मी…
जीवन शिक्षक खूप गिरवतो मी….
वळणांची ची कोडी सोडवतो मी…
प्रारब्ध माझा सारथी ना डगमगतो मी…
अवघड वळणे चढून मग घडतो मी….
पुन्हा नवीन वळणांना कवटाळतो मी….

– रचना : सर्जेराव पाटील.
(कौलवकर – नाशिककर), ऑस्ट्रेलिया