ऋतुराज वसंत आला आला
मंगल ध्वनी पहा निनादला
सप्तरंगानी दिशा विलसल्या
कोकीळकंठी मैफीली रंगल्या
मंद सुगंध गंधाळला वारा
चांदण्यात न्हाला चंद्र बावरा
पाखरांचा स्वर धुंद लाजिरा
सुवर्णात न्हाला सूर्य साजिरा
नवपर्वाची चाहुल लागली
वसंतरंगी अवनी सजली
शुभ्र आभाळास सुंदर लाली
शुष्क गवतास हरिता आली
लोभस रंगी सुमने फुलली
वसंत मानसी मने हर्षिली
चमचमणारी उन्हे दाटली
कणाकणांत उभारी भरली

– रचना : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
खूप सुंदर शब्दरचना. शब्द आणि भावनांचा सुरेख मेळ. वसंताच्या हिरव्या रंगात न्हाल्याचा खूप छान अनुभव.
सुंदर शब्दांची गुंफण करून वसंताला बहार आणला आहे 🙏🌹
🌹खूपच छान वर्णन केलं आपण. 🌹
मनाला भावलं, आता असं होत नाही.
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
महाड रायगड
वसंत ऋतुचे वर्णन मनाला भावले.
वाह..! वसंताचं विलोभनीय वर्णन..!
.. प्रशांत थोरात, पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था,
9921447007