Friday, December 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
संपादक

१. भुजबळ साहेब, तुम्ही गावडे मॅडम विषयी नेमके लिहिले आहे. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि कामावरील निष्ठा मी पाहिली आहे.
“अजातशत्रू” असे त्यांचे वर्णन केले तर वावगे ठरणार नाही !
पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा !
— वर्षा शेडगे. निवृत्त माहिती उपसंचालक, पुणे

२. गावडे मॅडम वरील लेख खुप सुंदर सर जी. नवनवीन वाचायला मिळतं.
— संतोष महाडेश्वर. मुंबई.

३. मा.गावडे मॅडम, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला पत्रकारांबद्दल आदर आहे. कारण मी नौकरीला लागण्याआधी ६/७ वर्षे पत्रकारिता केली आहे.
पुन्हा‌ आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
— राजीव रसाळ. निवृत्त तहसीलदार, नेवासा.

४. भुजबळ सर, अतिशय उत्तम लेख लिहून एका प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाचा सुंदर परिचय करून दिला आहेत. गावडे मॅडम ह्यांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांना ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💐
— सौ मृदुला राजे. जमशेदपूर.

५. देवेंद्रजी तुम्ही फार महत्वाची गोष्ट सांगितली आहे. खरच अपयश हे क्षणभंगुर असते. त्याला तोंड देता आले पाहिजे. आत्महत्या हा पर्याय कधीच असू शकत नाही. तरुणांनी तसेच शेतकऱ्यांनी किंवा इतर कोणीही कधीच आत्महत्या हा पर्याय निवडू नये. तो एक फार मोठा गुन्हा आहे हे लक्षात ठेवावे.
— प्रा सुनीता पाठक. छ.संभाजीनगर

६. भुजबळ सर, तरुणाईला मार्गदर्शन करणारा अतिशय उत्तम लेख लिहिला आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात “परीक्षेतील यश हाच जीवनातील सफलतेचा एकमेव मार्ग” असे समीकरण बनत चालले आहे. त्यामुळेच असे अपयश आले तर विद्यार्थीच काय, पालक सुद्धा ते पचवून घेऊन जीवनात पुढे जाण्याचे मार्ग शोधत नाहीत, त्याऐवजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. अशा बालक आणि पालकांना मार्गदर्शन करणारे तुमचे स्वानुभव आणि तुम्ही लिहिलेली दोन्ही पुस्तके त्यांच्या जीवनाला नक्कीच सुयोग्य दिशा दाखवतील, असा विश्वास आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि अशा प्रेरणादायक लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐
— सौ मृदुला राजे. जमशेदपूर

७. तरुणांना प्रोत्साहन देणारी व उत्साह वाढविणारी खूप छान मुलाखत.
— अरुणा गर्जे. नांदेड.

८. देवेंद्रजी, आपली अतिशय उत्तम मुलाखत भारतसत्ता या चॅनल वर पाहायला मिळाली.आपण   विषयाची जी मुद्देसूद मांडणी केली ती पाहून आपल्या अभ्यासूपणाची आणि व्यासंगाची जाणीव झाली. अशीच उत्तरोत्तर रंगत वाढत जावो ही सदिच्छा.
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.

९. राधिका ताई, *माझी जडण घडण* मधून त्यांच्या बालपणातील आठवणी सांगतात. या केवळ आठवणी नाहीत, त्या बद्दल मागे वळून पाहताना त्याबद्दल आज वाटणाऱ्या भावना मोकळेपणाने लिहितात. खूप प्रामाणिक असे लेखन आहे त्यामुळे ते मनाला भावते. तो काळ, प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्ती यांचे यथोचित वर्णन त्यांनी केले आहे म्हणून अजून लेखांची आम्ही वाट पहात आहोत 🙏
— डॉ. शुभदा कुलकर्णी. जळगाव

१०. माझी जडणघडण  अतिशय हृदयद्रावक. — सुलभा गुप्ते. पुणे. ह. मु. इजिप्त.

११. भुजबळ सर, रविराज गंधे यांच्या “भिरभिरं” या ललित लेख संग्रहावर आम्हीं ‘दिलासा : ज्येष्ठांसाठी मुक्त व्यासपीठ’ या लोकमान्य सेवा संघाच्या एका शाखेत एक विशेष कार्यक्रम केला होता, तेंव्हा ते स्वतः उपस्थित होते. लोकमान्य सेवा संघाच्या बहुतेक कार्यक्रमात त्यांची भेट होते.
आपल्या लेखामुळे त्यांचा तपशीलवार परिचय झाला. लेख शेअर केल्याबद्दल मनःपुर्वक आभार.
— आशा कुलकर्णी. मुंबई.

१२. Art of letting go ही एक कला आणि शास्त्रही आहे. मनातील नकारात्मक भावना, कटु स्मृती आणि तशाच आठवणींवर मात करून आनंदी जीवन जगण्याचा तो रामबाण उपाय आहे. यावर सुरेख पुस्तक परीक्षण वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
— प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे, ह. मु.इंग्लंड.

१३. वाह, सुधाकाका, फार च छान परिक्षण …. आधी, लेखकांच अती भारदस्त नाव वाचून… हे सगळं फार च जड असावं, असं वाटलं.. पण संपादकांनी तुमच्या बद्दल लिहीलेलं वाचून तुमच्या बद्दल जास्त च अभिमान वाटला… २१ तंत्र छान सांगीतलीयत …ते वाचून आपण किती गोष्टी ” लेट गो”केल्यायत आणि अजून ही करू शकतो..ह्याची पुरेपूर जाण झाली… खरंच ‌सुरेख परीक्षण…
— सौ रेखा भावसार. मंडी, हिमाचल प्रदेश.

१४. रविराज यांना माझ्याही शुभेच्छा कळवाव्यात 💐 — सुनील चिटणीस. पनवेल

१५. अप्रतिम कविता मुलींची पहिली शाळा — अशोक घोडके. पनवेल

१६. तुमचे जिवलग मित्र रविराज ह्यांना वाढदिवसाच्या माझ्या शुभेच्छा.
— प्रतिभा पिटके. अमरावती

१७. सन्माननीय रविराज साहेबांना वाढदिवसाच्या खंडीभर शुभेच्छा.
— डॉ कारभारी जाधव.
निवृत सहायक संचालक (आरोग्य)

१८. रविराज गंधे यांचे दूरदर्शन वरील कार्य आठवते .. त्यांच्यावर आणखी एक लेख वाचला होता ..बहुदा लेखक. डॉ केशव साठ्ये असावेत. आपण दिलेल्या शुभेच्छा भावल्यात आमच्यातर्फे ही सत्तरीच्या शुभेच्छा.
पद्मा गोळे यांच्या कविता मला आवडत.. त्यांच्याबद्दल छान माहिती दिली आहे .. संगीता ताईंना धन्यवाद
अंतरीचा डोह.. परीक्षण वाचून पुस्तक वाचण्याची इच्छा होतेय. यातच ज्योती ताईंचे श्रेय सामावले आहे.
भिडे वाडा काव्य महोत्सव आणि मुलींची पहिली शाळा .. स्तुत्य.
— स्वाती वर्तक. मुंबई.

१९. आजचा अंक छान. रविराज 👌🏻
अवयव दानाची माहिती 👌🏻
तुझ्या पुस्तकाची परीक्षणे देखील 👌🏻
— चंद्रकांत बर्वे.
निवृत्त दूरदर्शन संचालक मुंबई

२०. रविराज गंगे नगरचे आहेत, हे वाचून नगर बद्दलचा अभिमान अजूनच वाढला. धन्यवाद.
— प्रा सुनीता पाठक. छ.संभाजीनगर.

२१. रविराज वरचा लेख छान आहे.त्याची बहीण धर्मशीला गंधे माझ्या ओळखीची होती. ती खूप सुंदर दिसायची. वसुधा पण माहिती आहे.
— सरोजिनी कुलकर्णी माटे. पुणे.

२२. देवेन्द्रजी, रविराज गंधेंबद्दल तुम्ही सर्वंकष माहिती सादर के़लीत. रविराज यांची आपल्या विभागातील बहुतेकांची या ना त्या कार्यक्रमामुळे थोडीफार ओळख आहेच, शिवाय दूरदर्शनवर मुलाखत घेतानाचा त्यांचा त्या वेळचा हसतमुख चेहरा, गोड वाणी कोणी विसरणार नाही. त्यांच्याबद्दल अधिकची माहिती छानच वाटली. तुमचंही त्याबद्दल अभिनंदन.
— वीणा गावडे.
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक, माहिती विभाग, मंत्रालय, मुंबई.

२३. रसिक राज रविराज यांचा देवेंद्रजी आपण जो दिलखुलास परिचय करून दिला आहे तो आपल्या लेखन शैली आणि कौशल्याचा उत्तम नमुना आहे. अतिशय प्रामाणिकपणा त्यात दिसून आला. “दूरदर्शनचा झगमगाट ते स्टुडिओ, पडद्यावर झळकणारे प्रत्यक्षात पाहिलेले थोर मंडळी आणि प्रारंभी आपण नवखे यामुळे बुजून बुजून रहात असतांना रविराज आणि आपली केमेस्ट्री जुळली “हे वाक्य आपल्या प्रामाणिकपणाचे द्योतक आहे. आपली परिचय लेखन शैली फारच उत्तम आहे.त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. रविराज यांचे आमच्या जेष्ठ नागरिक संघाच्या सभेत खुमासदार भाषण झाले. त्यावेळी आपल्या उल्लेखासह अनेक आठवणी जाग्या झाल्या होत्या. (आमच्या इंदिरानगर हास्य क्लबचे घनिष्ठ मित्रांचे ते जावई आहेत. याचे समाधान झाले. असो). आपला परिचय लेखन मात्र दूरदर्शनवर जशी मान्यवरांची ओळख हसत खेळत करून देतात त्या स्टाइलवरच वाटली.. आपले पुनश्च अभिनंदन.
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक.

२४. धन्य ती वीर पत्नी हे दुःख पचवणं इतकं सोपं नाही ज्याचं जात त्यालाच कळतं कोणीही हे समजू शकत नाही.सभोवतीचे लोक विसरुन जातात.आई पत्नी मुलांना हे कधीच विसरू पडत नाही. स्मृतीची काय अवस्था असेल हे मी जाणू शकते समजू शकते कारण मी ही याच अवस्थेतून जात आहे 😭
मरण आपल्या हातात नाही जगणं तर भाग आहे. काहीतरी आपल्या हातातून चांगले घडणार असेल म्हणून तर आपण येथे राहिलो आहे. नियतीचा हा खेळ  कोणाला  न समजला.
— अनिसा शेख. दौंड, पुणे

२५. धन्य ती वीर पत्नी स्मृती अन् विनम्र अभिवादन तिच्या शूरवीर सैनिक पतीस.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई

२६. चिटणीस साहेब, कृत्तानेक साष्टांग, सस्नेह वंदन.
आपलें सिंहावलोकन…. आम्हाला किंबहुना सर्वच रसिक वाचकांना आदर्शवत. खूप मनमोकळे व्यक्त जाहले आहात.
आपल्या लेखणीत विलक्षण आपुलकीची ताकद आहे, प्रत्येक शब्द रसिकतेने फुलवता, त्याला मनस्वी बहर येतो…उदा. गंधाळलेले सुख… अशी वाक्य मनाचा नितांत ठाव घेतात…. आणि सर्वात ज्या वाक्याने भारवलो ते… पाऊस व्हायला आवडेल… वा क्या बात…
आपल्या शब्द रुपी पाऊस सरिनी… आपुलकीच्या भावनेने मनसोक्त भिजवले हो…. वाटल…
खरंच… यांना जीवन कळले हो….
आम्ही आपले बारीक सारीक दुःखे कुरवाळत बसलोय आणि आपण आयष्यातील सर्व अडथळे पार करत त्या परे एक आनंदाचा ठाव घेत समाधानाने वयाच्या अवघ्या बहात्तरीत… पुन्हा जीवन शैली बहरवत नितांत समाधाने जगत आहात… हे कौतुकास्पद… आपल्या या समाधानी जीवनासाठी मनःपूर्वक, कृतज्ञतापूर्वक अभिनंदन आणि पुढील शतायुषी आयुष्या साठी निरंतर शुभेच्छा..
आपलं विपुल साहित्य नक्कीच वाचायला आवडेल, बघू कधी योग येतो….
तो पर्यंत इति लेखन सिमा…
आपलाच  एक स्नेही, फॅन आणि हितचिंतक
— भाऊ कार्ले. खेड, चिपळूण

२७. सुनिल चिटणीस यांचा आज  वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देतेच त्यांची व माझी ओळख झाली आणि धडल असं की फार थोड्या अवधीत त्यांच्या चांगुलपणाची ओळख अनुभवाला आली ती वाढतच राहिली.
पावसाळ्यात जन्मलेले व 72 पावसाळे पाहिलेले सुनिलभाऊ पावसासारखे मैत्रीने मन भिजवून टाकतात.
आपुलकीचे कोंब कधी उगवतात समजत देखील नाही आणि त्याचे स्नेहाच्या झाडांत सहज रुपांतर होते. हे सारे मी अनुभवले आहे. त्यांच्या भोवती असलेले सुऋद हे त्याचेच उपवन आहे.
त्यांचा पत्नी वियोगही मी ऐकला आहे व त्या केवळ 53 वर्षाच्या होत्या हे आजच कळले व त्यावियोगाचा त्यांच्यावर झालेला
अपरिमीत परिणाम आज उलगडला पत्नी जाताना त्यांना एक सखी देउन गेली जणूं. प्रतिभा
एकही अवाक्षर न लिहीलेल्या सुनिलभाऊनी इतकं ताकदीचं लेखन केलं हा एक चमत्कारच आहे.
आज मी त्यांना सद्इच्छेचं पारितोषीक देते. सुनिलभाऊ लिहीत रहा खूप खूप आणि दर्जेदार लिहीत रहा अगदी शतकं भर!
— भारती राजे देशपांडे. वरळी, मुंबई

२८. मर्चंट नेवीचा अनुभव नवीन. — चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक मुंबई

२९. I was also Captain in Merchant Navy. Nature of Job is Very Very Interesting. Still Now days I DO NOT Recommend to Intelligent and Willing Hardworking Good Boys to Join Merchant navy.
— Captain Yogesh Abhyankar. Pune

३०. समाज बदलत आहे ..हे खरे सुचिन्ह आहे.. माझे मत हेच आहे की माणूस येथून तेथे सर्वदूर सारखाच असतो. त्याचा जात, धर्म, देश याच्याशी संबंध नाही. हे सर्व व्यक्तीगत आहे. माझी जाऊ नेदरलँड ची डच स्त्री होती. पण तिचे न माझे सख्ख्या बहिणीप्रमाणे संबंध होते. माझा भाचे जावई ख्रिश्चन आहे पण अगदी मुला प्रमाणे सर्व करतो.
श्री विश्वनाथ साठ्ये यांची मुलाखत वाचनीय आहे.
कॅनडाच्या माँन्ट्रियल बंदरातील अनुभव थरारक आणि माहितीपूर्ण आहे .. ते पत्नी साठी म्हणतात… she was the man on the spot … हे पटले आणि आवडले.
चित्राताईंचे म्हणणे बरोबर आहे. जनरेशन गॅप वाढतोय .माझी 6 वर्षांची नात जेव्हा ..हे पोर्ट्रेट आहे, हे लँडस्केप आहे हे नुसतेच मेमोरी ड्रॉइंग आहे …अशी बडबड करते तेव्हा मी अचंबित होते.
मी  विचारले ..तुला काय माहीत ? तर उत्तर देते..
यू ट्यूब !
मी सहा वर्षांची असताना आठवते.. त्रिकोणी डोंगर, मधून निळ्या रंगाची वाहणारी नदी, एक झोपडी यातच सारे चित्रकला विश्व सामावले होते ..नाही का ?
स्वाती दामले यांची कथा आवडली.
या ओळी आवडून गेल्या…
अपेक्षाभंगाच दुःखच नाही
मग हे असं कां म्हणून
पुसण्याची गरजच नाही.
— स्वाती वर्तक. मुंबई.

३१. ‘मर्चंट….अनुभव’  सुरेख मुलाखत आणि शब्दांकनही सुरेख : अशी प्रतिक्रिया मी दिलेली आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे. ह.मु. इंग्लंड..

३२. खूप संवेदनशीलपणे लिहिले आहे, तुम्ही माधवी कुंटे यांच्याबद्दल.एका अर्थी ते योग्य ही आहे कारण माधवी ताईंनी दाखविलेल्या जिद्द, सहनशीलता, प्रेम, या बरोबरच त्यांनी सर्वसाधारणपणे  gone case असे म्हटले असते अशा आपल्या मुलाला प्रचंड कष्ट घेऊन त्याला त्याच्या पायावर उभे केले आहे. नुसते तेवढेच नाही तर तो जे काही करतो त्यात त्याने प्रावीण्य ही मिळवले आहे. त्यांच्या आणि अजितच्या जिद्दीला, चिकाटीला, प्रयत्नांना सलाम.
लेख खूप छान झाला आहे हे सांगायला नकोच.
— एस शिंदे, विलेपार्ले, मुंबई.

३३. धन्य ती वीरपत्नी या लेखातले स्मृती अंशुमन सिंग यांचे देशासाठी शहीद झालेल्या पती विषयीचे गौरवोद्गार मनाला भिडले. अशा वीरपत्नीला त्रिवार सलाम !
— राधिका भांडारकर. पुणे

३४. जयवंतीणबाई समोर उभी राहिली 🙏 — लता छापेकर. जळगाव

३५. अगदी मनापासून लिहिलं आहे हे जाणवतं. — अजित महाडकर. ठाणे

३६. राधिका ताई, *माझी जडण घडण* मधून त्यांच्या बालपणातील आठवणी सांगतात. या केवळ आठवणी नाहीत, त्या बद्दल मागे वळून पाहताना त्याबद्दल आज वाटणाऱ्या भावना मोकळेपणाने लिहितात. खूप प्रामाणिक असे लेखन आहे त्यामुळे ते मनाला भावते. तो काळ, प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्ती यांचे यथोचित वर्णन त्यांनी केले आहे म्हणून अजून लेखांची आम्ही वाट पहात आहोत 🙏
— डॉ. शुभदा कुलकर्णी. जळगाव

३७. नमस्कार, शुभप्रभात, आत्ता *जडणघडण भाग ६*  लेख वाचला. तुमच्या जडणघडणीतील एका टप्प्यावर जे एक दुर्दैवी दांपत्य बराच काळ तुमच्या डोळ्यासमोर जगलं त्यांचं व्यक्तीचित्र तुम्ही नेमक्या शब्दात मांडले आहे. ‘वांझोटी’ सारखे निर्दयी शब्द त्या जुनाट, अवैज्ञानिक काळाचे ठळक लक्षण होते. जगण्याचा परीघ अत्यंत संकुचित असल्याने आसपासच्या व्यक्ती, कुटुंबे, परिचित/अपरिचित लोक यांवरच फोकस असे. त्यातून अवगुणांचं दर्शन सहज होई आणि त्या वर्णनासाठी वरील प्रकारचे शब्द वापरले जात असावेत. असो‌. तुमची लेखनशैली छान, as usual. या लेखातील एक जोडशब्द मला खूप आवडला. “अप्रसन्न शांतता” ! खूपच छान जोडशब्द तयार केला तुम्ही !  अशाच लिहित राहा. शुभेच्छा !
— पुरुषोत्तम रामदासी. पुणे

३८. जडणघडण : ६ समाजाच्या कोत्या मनोवृत्तीचे यथार्थ वर्णन करणारे जयवंतीण हे स्फुट काळजाला भिडते. वाचून कोणाही सहृदय माणसाला अशा सामाजिक प्रवृत्तीची चीडच येईल. अभिनंदन!
— डॉ. निशिकांत श्रोत्री. पुणे

३९. जडणघडण : ६ अतिशय सुंदर ! आमचं बालपण कायम स्वतंत्र बंगल्यात, कुटुंबातल्या सदस्यांबरोबर गेल्यामुळे समाजमनाचं ओंगळ स्वरूप कधी अनुभवलंच नव्हतं. तू त्याचं सोदाहरण दिलेलं स्पष्टीकरण फारच विदारक आहे.
जिजीकडून मिळालेल्या संस्काराचा ओझरता उल्लेखही ‘जडण-घडणीत’ला फार महत्त्वाचा भाग आहे. कसं नसावं साठी मथुरेबाई हव्यात आणि कसं असावं साठी घरात एक जिजी हवी.
— सौ. साधना नाचणे. ठाणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९