Tuesday, July 1, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टल ला २२ जुलै रोजी ४ वर्षे पूर्ण झाल्या बद्दल खूप जणांनी छान लेख लिहिलेत, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

आजच्या वाचक लिहितात… मध्ये आपण प्रथमत: ४ वर्षपुर्तीनिमित्त लिहिलेल्या लेखांवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया वाचू या. त्या नंतर अन्य प्रतिक्रिया. धन्यवाद.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)

न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ला ४ वर्षपुर्तीनिमित्त लिहिलेल्या लेखांवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया.

१. सुनील चिटणीस साहेब, आपला न्युज स्टोरी टुडे पोर्टल वरचा माहितीपूर्ण लेख फारच सुंदर आणि माहितीपूर्ण झालाय. आपल्या साहित्य लिखाणातली समृद्धि आणि कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. तुमच्या साहित्य प्रवासात त्यांची झालेली मदत आपण कृतज्ञ भावनेने उद्धृत केली आहे. लेख वाचल्यावर समाधान आणि आनंद झाला.
— कवी, लेखक शरद अत्रे. निवृत्त आयकर अधिकारी, पुणे

२. सुनील चिटणीस यांचा लेख सविस्तर आणि कृतज्ञतापूर्वक लिहिला आहे.
— राधिका भांडारकर. पुणे

३. आपल्याला काही आवडले, कोणी आवडले तर त्यांचे कौतुक करणे हे देखील आपले कर्तव्यच असते.. फार उशीर केला आणि राहून गेले तर चुटपुट लागते. प्रतिभाताईंनी वेळेत दिलेली दाद देखील कौतुकास्पदच आहे.
मेघना साने यांनी दिलेली माहिती वाचनीय आहे.
प्रीती रोडे आणि लीना फाटक यांचे न्यूज स्टोरी बद्दलचे विचार सत्य आहेत.
— स्वाती वर्तक. मुंबई.

४. रश्मीताई, न्यूज स्टोरी टुडे वर खूपच सुंदर लिहिले आहे. तुमचे लिखाण असेच कायम सुरू रहावे. तुमच्या लिखाणाला नेहमी उत्तम प्रतिसाद मिळावा आणि नेहमी उत्तरोउत्तर प्रगती व्हावी. पुढील लिखाणासाठी  हार्दिक शुभेच्छा.
— प्राजक्ता सासवडे. सातारा

५. रश्मीताई, थोडया वेळापूर्वीच आजच्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वरचा तुझा लेख वाचला. खरंच हा छोटेखानी लेख लिहून श्री देवेंद्र आणि सौ अलकाताई यांचे तुला पाठबळ मिळाले म्हणूनच तू इतकी मजल मारू शकली, परिवारातील अन्य सदस्यांसमोर अभिमानाने कथित केलेस. भुजबळ उभयतांचे ऋण  शब्दांनी मानणे अशक्यच आहे.
त्यांच्या चरणी लीन होणे एव्हढेच काय ते आपण करू शकतो. आजही तुझा लेख वाचला, लेखणी उचलली आणि जमेल तसे मन मोकळ केलय. वाट पाहीन आणखी एका भरारीची. दमलो पण हरलो नाही.
— प्रकाश पळशीकर. पुणे

६. अनेक नव्या जुन्या लेखक-कवींना आणि वाचकांना न्यूज स्टोरी टुडे’ ने एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. 
विलास कुडके यांच्यातील लेखनाच्या सुप्त गुणांना याच पोर्टलने वाव दिला तर तोरणे साहेबांनीही नव्या जुन्या पुस्तकांची दर्जेदार ओळख करून देण्याची पालखी दीर्घकाळ वाहती ठेवली. याच व्यासपीठावरून अनेक नवी पुस्तके जन्माला आली आणि विशेष म्हणजे देशोदेशीचे लेखक कवी वाचक एकमेकांशी जोडले गेले. एकंदरीत ही फार मोलाची कामगिरी आहे.
— प्रल्हाद जाधव.
नाटककार, लेखक, निवृत्त माहिती संचालक, मुंबई.

..”आणि शाहरुख भेटला !”
या आश्लेषा गान यांनी लिहिलेल्या लेखावर प्राप्त झालेले अभिप्राय …

७. थोड्यावेळ का होईना मी सुद्धा त्या लग्नसोहळा अनुभवत असल्याचा आनंद मला मिळाला. स्वप्नात का होईना मनातली ईच्छा पूर्ण झाल्याचा आनंद दिवसभर मन प्रसन्न ठेवतो.👌 छान लिहिलंय.
— सौ. शितल अहेर. खोपोली

८. वाह वाह..आश्लेषा.. मस्तच..अग मी पण गेले होते त्या शाही विवाह सोहळ्याला.. अशीच तुझा सारखी च.. आपली भेट तिकडे होता होता राहिली..
गम्मत ह.. पण लेख खूपच मस्त झालाय.. प्रत्यक्ष अंबानी लग्नात फिरुन आले म्हण ना.. अशीच छान छान लिहत रहा.. आणि हो एक चहा वाढव ह.. मी पोचते तोवर.. n सोबत तुझा हातचे मस्त पोहे पण कर..अशा वातावरणात मज्जा येईल..muaaa😘 असेच छान छान वाचायची संधी आम्हाला कायम मिळू दे.. हीच शुभेच्छा 💐💐
— आसावरी नितीन. अभिनेत्री, पुणे

९. मस्त… एका क्षणाला खरच वाटलं.. 😁

छान लिहिलयस ताई…👌
— विनायक आदिमुलम. पुणे

१०. आशू, खूप छान लिहिलंस. खूप वर्षानंतर तुझं लिखाण वाचायला मिळालं.
— सौ. प्रज्ञा नाचणकर. नागपूर

११. खूप मस्तच लिहिलंय आश्लेषा.

मला वाटते असे स्वप्न प्रत्येकींने कधी न कधी बघितले असावेत 😀
— सौ. रश्मी मांजरे. नागपूर

१२. व्वा व्वा, मस्तच.

आज देशोन्नती चे आय कार्ड घेतलेली आशू आठवली !🤗😘
— सौ. रंजिता देढे. नागपूर

राधिका भांडारकर यांच्या “जडणघडण”८ वर आलेले अभिप्राय….

१३. राधिका, अग मला वाटलं गजा आणि शकूच्या नात्याबद्दल चाळीत चघळलेली थोडी का होईना चटकदार चर्चा असेल कारण अशा गोष्टी हे नमुनेदार चाळीचं ‘गुणवैशिष्ट्य’ असतं. पण तुझा ‘नीर-क्षीर विवेक’ वापरून तू तुझ्या  एका बहुचर्चित, राजकीय  व्यक्तिमत्वाशी असलेल्या निष्पाप बालमैत्रीची गोष्ट अतिशय सहज, साधेपणाने, मोकळेपणाने सांगितलीस. त्याला साधी गणितं जमत नव्हती पण पुढे फार मोठी राजकीय गणितं त्यानी सोडवली ह्या एकाच वाक्यात ‘आनंद दिघे’ चं बालपण आणि त्याचं लोकप्रिय नेता म्हणून मूल्यांकन तू मोजक्याच शब्दात केलंय. चित्रपटाबद्दल संयत आणि चाळीबद्दल बोलकं लिखाण.
— साधना नाचणे. ठाणे

१४. प्रिय राधिकाताई,

खरंतर काय लिहू तेच सुचत नाहीये… तुमचे “माझी जडणघडण” हे सदर मी न चुकता वाचते. अभिप्राय लिहायचे प्रत्येक वेळेस राहून जातात काही ना काही कारणामुळे. पण प्रत्येक भाग वाचताना मला सुद्धा माझं बालपण डोळ्यासमोर येतं. त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. खूप सुंदररित्या तुम्ही तुमच्या बालपणीच्या आठवणी शब्दात बंदिस्त केल्या आहेत. तुमचं लिखाण इतकं भाववाही असतं की तुमच्या सोबत मी सुद्धा तिथे जाऊन पोहोचते. असं वाटतं मी सुद्धा तुमच्याबरोबर तिथे आहे. काही काही किस्से किंवा काही आठवणी मला असं वाटतं जणू माझ्यासोबत घडल्या आहेत… अतिशय सुंदर असं लिखाण… शब्दांचा खजिना असलेले तुमचे हे प्रत्येक सदर मनाला कुठेतरी झंकृत करून जातात. अचानक बालपणात हरवल्यासारखं वाटतं. खूप सुंदर प्रवाही लिखाण आहे.
आजचा लेख वाचला आणि मी त्याच्यावर अभिप्राय देण्याचा मोह टाळूच शकले नाही.. आनंद दिघे यांना तुम्ही पत्र लिहिलं आहे. या आनंद दिघेंना मी धर्मवीर ह्या पिक्चरमुळे ओळखते. तसे महाराष्ट्राच्या राजकारणाशी माझा फारसा संबंध नव्हता. पण त्यांना पिक्चर मध्ये पाहिलं असल्यामुळे त्यांच्या विषयीची माहिती होती आणि तुम्ही त्याला आंद्या म्हणून हाक मारायचात आधी हे जेव्हा वाचलं तेव्हा खरंच तुमच्यासाठी मला खूप अभिमान वाटला.
आनंद दिघे  एक राजकीय नेता नसून ते तुमच्यासाठी तुमचे बालमित्र आहेत आणि त्यांना तुम्ही जे पत्र लिहिलं ते हृदयस्पर्शी होतं. ते आपल्यातून अकाली निघून गेले. महाराष्ट्र एक चांगल्या माणसाला मुकला .पण तुमचा तो  मित्र हरवण्याचे दुःख मी सुद्धा अनुभवलं. तुमच्या या लेख वाचल्यानंतर काय बोलावे काही सुचेना पण आज आवर्जून लिहायला घेतलाच अभिप्राय. अभिप्राय नाही तर मनातील काही शब्द इथे मांडण्याचा प्रयत्न केला… माझी  जडणघडण हे सदर मी रेग्युलर वाचते. चित्र अतिशय सुंदर आहे. कशा तुम्ही काही काही प्रसंगातून शिकून घडत गेलात, एक उत्तम व्यक्तिमत्त्व तयार झालेलं आहे ते वाचायची खरंच खूप मजा येते. कितीतरी शिकायला मिळालं, जाणायला मिळालं. मुख्य म्हणजे खूप सारे शब्द मिळाले. एक उत्तम व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे याचा मला खरंच खूप अभिमान आहे आणि त्यांची जडणघडण इतकी सुंदर झालेली आहे ते वाचताना त्याहून अतिशय आनंद होत आहे. पुढच्या भागाची प्रतिक्षा आहे…
— मानसी म्हसकर. अहमदाबाद

१५. सुंदरच…

— अस्मिता पंडीत. पालघर

१६. खूप छान बालपणीची आठवण.

— अजित महाडकर. ठाणे

१७. जडणघडण खूपच सुंदर लिहिते आहेस. सगळ्या बारीकसारीक तपशीलांची उत्तम गुंफण ही तुझी खासियत आहे. मग ती कथा असो वा कुठलेही ललित लेखन. मस्तच.
— ज्योत्स्ना तानवडे. पुणे

१८. क्या बात है राधिकाताई !

— ऋचा पत्की. लातूर

१९. वा, छान !

— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

२०. तू लिहित रहा. तुझ्याबरोबर आम्हीही आमचे बालपण पुन्हा पुन्हा जगू !
— आरती नचनानी. ठाणे

२१. इतर काही कामात अडकल्यामुळे उशीरा वाचलं. इतक्या वर्षापूर्वीच्या आठवणी पुसल्या जात नाहीत हे खरं असलं तरी अगदी सर्व प्रसंग डोळ्यासमोर येतील इतकं परफेक्ट वर्णन करण्यात तुझा हातखंडा आहेच. तुझ्या आठवणीतल्या भांडारावर पण पटकथा संवाद किंवा नाटक लिहूं शकशील.
तुझ्या आणखी आठवणी क्रमशः वाचायला मिळतीलच.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

पोर्टल वरील नवीन कवयित्री कल्पना मापुसकर यांच्या मेघ मल्हार कवितेवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…

२२. व्वा व्वा खूपच सुंदर कविता.

— निलिमा नाईक.

२३. खूप सुंदर अष्टाक्षरी कल्पनाताई

— अजित महाडकर.

२४. अप्रतिम रचना
— मीना ठाकरे.

२५. व्वा ! सुंदर रचना..

— स्वाती शृंगारपुरे.

२६. फार छान

— सुवर्णा वाडे.

२७. फारच छान कविता.

— पंडित शेळके.

२८. वाह

— अरविंद विचारे.

२९. खूप छान.

— प्रकाश पाटील.

अन्य लेखनावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…

३०. अवयवदान या स्तुत्य उपक्रमाला कवितेतून दिलेली प्रसिद्धी ही न्यूज स्टोरी टुडे  पोर्टलची सामाजिक बांधीलकी अधोरेखित करते. खरंतर एखाद्या कुटुंबातील सदस्याचं निधन हे त्या कुटुंबावर कोसळलेलं मोठं दु:ख असतं. अशावेळी, निधन झालेल्या देहाचे विधीवत दहन करणं हा पारंपरिक संकेत ठरून गेला आहे.
मात्र अभिजीतच्या ऐन तारुण्यात जाण्यानं दु:खी कुटुंबानं त्याचं अवयवदान करण्याचा जो निर्णय घेतला तो निस्चित अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे.
या अनोख्या आणि समाजोपयोगी  उपक्रमाचे कवितेतून गणेश साळवी यांनी केलेले शब्दांकन अर्थपूर्ण  आणि भावपूर्ण.
इतिहासाची आस आणि भविष्याचा ध्यास घेणारी लो.टिळकांचे जीवनकार्य  उलगडून सांगणारी मीरा जोशी यांची (लोकमान्य टिळक) कविता लोकमान्यांचे जीवनदर्शन करते, तसेच ती प्रेरणादायकही आहे.
मराठीतील एक ज्येष्ठ लेखिका वसुंधरा पटवर्धन यांच्या साहित्य संपदेची ओळख करुन देणारा, संगीता कुलकर्णी यांचा  सुरेख लेख.
ललित लेखनाबरोबरच, स्त्री जीवनाचे विविध पैलू त्यांच्या लिखाणातून दिसतात. लेखनातील अष्टपैलुत्व हेच त्यांच्या अलोट लोकप्रियतेचे इंगित असावे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, ह मु इंग्लंड.

३१. परवीनताईंची रचना खूप सुंदर, छान कविता.

काजव्यांची लुकलुक दिसली
पाऊस बरसणाऱ्या पानांवर
अन तुझ्याच आठवणींचा ग
पुन्हा एकदा फुलला बहर….
— सुनील चिटणीस. पनवेल

३२. श्री.तोरणे काका, नमस्कार.

“दिव्यत्वाची जेथे प्रचिती” या पुस्तकाचे आपण लिहिलेले परीक्षण वाचले. पुस्तकाचे लेखक श्री.प्रमोद केणे यांची साधना अभुतपूर्व आहे. गिरनार पर्वताची संपूर्ण माहिती वाचल्यावर परत एकदा पर्वतावर जाऊन श्री दत्तगुरूचे दर्शन घ्यावे अशी स्फुर्ती झाली. भविष्यात पुज्य श्री.प्रमोद काकांच्या व्याखानांचा लाभ व्हावा ही अपेक्षा.
— अनंतराव वाणी. जेष्ठ शिक्षणतज्ञ, नासिक.

३३. देवेंद्रजी, नमस्कार

सलग वाचन करणं जमतंच असं नाही पण न्यूज स्टोरी वाचनात रमायला होतं.
न्यूज स्टोरी टुडे ने आम्हाला काय दिलं ? ह्या सदरातून माझ्यासारख्या नवोदितेला पोर्टलची छान ओळख होतेय.
“लाडके विद्यार्थी योजना”..
अनेक दिवसांनंतर प्रा. डॅा. विजय पांढरीपांडे ह्यांचं लेखन वाचायला मिळालं. खूप भारी वाटलं.
….आणि शाहरूख भेटला !,
अंदाज तुमचे हाल आमचे … वाचायला मजा आली.
— अनुजा बर्वे. मुंबई

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on ज्येष्ठांनो, छळवाद विषयक कायदा समजून घ्या ! – प्रमोद ढोकले
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अष्टपैलू सुचिता पाटील