Tuesday, September 17, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे.
गेल्या रविवारी शास्त्रज्ञ डॉ जी डी यादव यांच्या हस्ते मला उत्कृष्ट संपादक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचे व्यक्तिगत यश नसून सर्व लेखक, कवी, वाचक, पोर्टल अधिकाधिक देखणे, आकर्षक, वाचनीय कसे होईल या साठी सतत प्रयत्न करणारी माझी पत्नी, पोर्टल ची निर्माती सौ अलका, असे सर्वांचे हे सामूहिक यश आहे.
आपला सर्वांचा स्नेह, विश्वास, प्रतिसाद कायम राहील, असा विश्वास आहे.

आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला
देवेंद्र भुजबळ. संपादक

मला उत्कृष्ट संपादक पुरस्कार
प्राप्त झाल्या बद्दल आलेल्या काही प्रतिक्रिया….


देवेंद्र भुजबळ यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार,,
बातमी वाचून अतिशय आनंद झाला, अनेकांना बरोबर घेऊन निघालेला हा अवलिया समाज्यासाठी एक दिपस्थंभ आहे, प्रकाश वाटाड्या आहे. आपणाकडून नम्रता, शालीनता, लीनता, असे कितीतरी गुण घेण्यासारखे आहेत, तुम्ही एवढे मोठे असूनही अगदी जमिनीवर आहात, याचं खूप कौतुक वाटते,
खऱ्या अर्थाने तुम्ही या पुरस्काराचे मानकरी आहात.
वाचून आम्हाला खूप आनंद वाटला. तुम्ही प्रकाशित केलेली पुस्तके हे फक्त साहित्य नाही, तर ते समाजाला दिशा दर्शक आहेत, वाटाड्या आहेत. मराठी साहित्यात दिपक आहेत, मराठी वाड्मय समृद्ध करणारे आहे. तुमचे मनापासून कौतुक
— कवयित्री, लेखिका. आशा दळवी. फलटण, सातारा.


पुनश्च तुमचे अभिनंदन💐
न्यूज स्टोरी टुडे या प्रसार माध्यमाच्या सहाय्याने आपण बऱ्याच नवोदित लेखकांना प्रोत्साहित करतात ही अतिशय आनंदाची बाब आहे तसेच समाजसेवेची एक आगळी वेगळी संकल्पना तुम्ही साकारतात.
आपले लेखन तसेच विचार सगळ्यांनाच प्रोत्साहित करत असतात. आपल्या हातून असेच बहुमूल्य कार्य घडत राहो. तसेच आपणास अधिकाधिक पुरस्कार लाभोत या आमच्या थोरवे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

— सुधीर थोरवे. पर्यावरण तज्ज्ञ, नवी मुंबई.

सौ आश्लेषा गान यांनी “हलकं फुलकं” या सदरात लिहिलेल्या “कुलकर्णी आणि कुलकर्णी ” या लेखाला मिळालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.


“कुलकर्णी आणि कुलकर्णी” खूप छान. पुष्कळदा असे होते. — उध्दव भयवाळ. जेष्ठ साहित्यिक, छ. संभाजीनगर


“बेगानी शादी मे अब्दुला दीवाना” असे काहीसे झाले तुमच्या बाबतीत. फारच मजेशीर किस्सा.
— शितल अहेर, खोपोली


वाचून मजा आली, हा हा हा.. — अपूर्व मंजुळे. अमेरिका


सुंदर वर्णन.. – अंशुमन गान. सातारा


मस्त, keep it up…. – डॉ. रोहित मंजुळे. नागपूर

राधिका भांडारकर लिखित, माझी जडण घडण भाग १३ वर प्राप्त झालेले अभिप्राय…


खुप छान. — सुलभा गुप्ते. इजीप्त


खूप सुंदर ! एकसारखं वाचतच रहावंस वाटतं. – अरुणा मुल्हेरकर. अमेरिका


घरातलीच माणसं समजून घेणारी आणि बळ देणारी पाठीशी असले की खरोखरच माणूस मुक्त आणि निर्भर होऊन आलेल्या संकटांना सामोरा जातो किंबहुना अपयश आलं तरी ते धीराने पचवतो हे अगदी खरे.
घरातल्या उन्हाळी कामाला शिबिर हे नाव खूपच गोड आणि समर्पक वाटते. शोसाठी शिबिर नसून व्यक्तीची खरोखर जडणघडण आणि व्यक्तिमत्व विकास होतो.
— लता छापपेकर. जळगाव.


खूपच छान! तुमचं लिखाण वाचताना त्यांत गुंग होऊन जायला होते ! — उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे


खूप सुंदर लिहिलं आहे. प्रत्यक्ष बालपण उभे राहत. राधिका ताई आपण खूप सुंदर लिहिता असंच लिहित रहा वाचायला आनंद मिळतो.
— सोनाली जगताप. मुंबई


सुंदरच लिहीतात ताई तुम्ही. वाचन संपूच नये असे वाटते . -अस्मिता पंडीत. पालघर.


मुक्त, मोकळं, स्वतंत्र म्हणजे स्वैर, बेशिस्त, मोकाट नाही या पहिल्याच वाक्यात राधिकाताईंनी पाच बहीणींच्या जडणघडणीबद्ल, त्यांना घडवणा-या आई-वडील व आजीबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्या व त्यांच्या बहिणी ‘सक्षम आणि निर्भय’ बनण्याचं कारणही पटण्यासारखंच आहे. ‘सुरक्षित घर’ ‘वज्रमूठ’ , बालमनावर ‘बटारी’ने केलेला आघात, धाकट्या बहीणीचा ‘निजाम’ आणि बहीणींची स्वभाव व गुणवैशिष्ट्ये नेहमीच्याच साध्या आणि अखंड वाहणा-या प्रवाहासारख्या शैलीत प्रभावीपणे मांडली आहेत.
— साधना नाचणे. ठाणे


हे वाचताना मला तुम्ही सर्व बहिणी माझ्या डोळ्यासमोर दिसताहेत…
— पूनम मानुधने, जळगाव


छान !! तुझ्या memories फारच छान आहेत. Good.
— सुषमा पालकर. पुणे

१०
जडणघडणचे सर्व भाग वाचले. अगदी भाव व्याकूळ करणारे आहेत. खूप आवडलं. पुढची प्रतिक्षा.
— मीनाक्षी सरदेसाई.

११
कुटुंबातल्या सर्वांचा, विशेषत: बहिणींचा आपापसात किती घट्ट बॉन्ड होता ते सांगताना बहिणींच्या भांडणातले‌ उणेदाणे हळूच सांगता सांगता त्यांचं कौतुक करायचं ही सुद्धा एक कलाच आहे. बटूबाईचा किस्सा वाचताना अजूनही तिच्यावर तुझे डोळे वटारलेलेच असावेत असं वाटतं.
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

माधुरी ताम्हणे लिखित, माध्यम पन्नाशी भाग चार वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया…


माध्यम पन्नाशी भाग चार.. अतिशय मार्मिक 🌹🌹
— कविवर्य अशोक बागवे.

हे सर्व वाचताना तुमच्या बद्दल जो आदर होता, तो अजून खूप वाढला.
— प्रशांत देशपांडे, दादर

सर्वच लेख छान. माध्यम पन्नाशी हा लेख फारच भावला. — वंदन कुलकर्णी. निवृत्त दूरदर्शन निर्माता.

माहितीतील आठवणी..या सदरात मी लिहिलेल्या “बॉस होतो ऐसा” या आठवणींवर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया….


भुजबळ साहेब, बाॅस एकदम मस्त ! बाॅस इज ऑलवेज राईट हेच खरं आहे. — गोविंद देशपांडे. निवृत्त माहिती अधिकारी, पुणे.


Dear Bhujbal sir i read your reminiscences in information department. Instead of sitting idle,you have engaged yourself in writing and making others to write is quite inspirational. A sampling of News Story Today planted by you few years back now shaped into a banyan tree. It’s journey is amazing. This portal a brain child of your daughter and nourished by you and Alka vahini is now developed into a full fledged news portal within a very short time for which you all three owe great credit . In your above article there appears an iconic character of Torne saheb that you have painted in such a way which induces great respect for him.
— Ranjitsinh Chandel. Yavatmal.


श्री.देवेद्र भुजबळांनी आदरणीय श्री. तोरणे साहेबांच्या व्यक्तिमत्वाच यथायोग्य वर्णन केलेले आहे.अहमचा लवलेशही त्यांच्या स्वभावात आढळत नाही.त्यांच्या स्रुजनशील व्यक्तिमत्वाचा अनुभव आम्ही सर्व मित्र ज्येष्ठ नागरिकांच्या विरुंगळा सभेत घेत असतो.त्यांनी विविध पुस्तकांवर लिहिलेले परीक्षण मी नियमित वाचत असतो.मराठी भाषेवर त्यांचे जबरदस्त प्रभूत्व आहे. आठवणीतल्या साठवणी भरपूर लिहिता येतील. येथेच थांबतो. भुजबळ साहेबांना धन्यवाद देतो. स्नेहाभिलाषि
— अनंत वाणी. नाशिक.

मोहना कारखानीस, सिंगापूर यांनी लिहिलेल्या, “कॅनडा: बेलेवू हाऊस” या पर्यटन लेखावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत..


व्वा मोहना,किती अभ्यासपूर्ण, सखोल माहिती दिली आहेस “बेलेवु हाऊस’ ची ! खूप सुंदर वास्तु आहे. बाकी अन्य माहितीही छान लिहिली आहेस,त्यावर तुझे स्वतःचे विचार मांडले आहेस ! मस्तच. — गौरी कुलकर्णी. मुंबई


खूपच छान माहिती. अगदी वेगळी वास्तू आणि त्या बद्दल माहिती मिळाली.
😊- अलका पाठक. सिंगापूर


छान केले आहे वर्णन. — श्रीरंग केळकर. सिंगापूर


छान वर्णन केले आहे. बेलेवू हाऊस… अप्रतिम.. अरूण म्हात्रे. मुंबई


खूपच छान 👌👌👌 — मनिषा वामन. सिंगापूर


खूप छान वर्णन केले आहेस, प्रत्यक्ष भेट दिल्यासारखे वाटले 👍🏼– नंदिनी नागपूरकर- दुबई


सुंदर आहे. बेलेवु हाऊस मध्ये फिरून मजा आली– चित्रा मनोहर. सिंगापूर


मोहना छान परिचय करून दिला आहेस बेलेवू हाऊस चा. रंजक सफर घडवलीय. आपल्या आवडी सारख्या आहेत खुपशा. — अंजना कर्णिक.


मोहना, खूप सुंदर वर्णन केले आहेस- नंदा चौधरी. मुंबई

१०
मोहना, खूप छान लिहिले आहेस.. तुझ्यामुळे आम्हालाही छान छान माहिती मिळते. प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटते..
असेच लिहित राहा… All the best..👍💐
— माधवी चिवटे. रत्नागिरी

११
सुंदर शब्दांकन. — अजित महाडकर. ठाणे
१२
खुप छान लिहिले आहे ताई🙏🌹👌🏼📚– संतोष खाड्ये

१३
Khupach Sunder ! Agadi tya thikani firun aalya sarakhe watale.👌👌👌❤️– पूजा पेठे. सिंगापूर

१४
Va! Mohana खूप सुंदर वर्णन केलं आहेस “बेलेवु हाऊस” च. वाचन करताना बेलेवु हाऊसचा जिवंत देखावा डोळयासमोर येतो, जसे कि मी प्रत्यक्षात टूर करते.

— प्रतिभा बडे. अमेरिका

१५
खुपचं सुंदर लिहीलं आहे अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं😃👌👌👌👍👍 – अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया

१६
खूप छान आणि सविस्तर लिहिले आहे. — अरूण मनोहर. सिंगापूर

१७
खूप छान वर्णन कॅनडा चे…. बेलेवु हाऊस बद्दल मस्त माहिती….. लक्षात राहणे कठीण आहे 😃 पण वाचनाचा मस्त आनंद मिळाला 👏👏👍

  • — विशाखा टिपणीस. मुंबई

१८
वाह, मोहना तुझी सिल्वर जुबली छान स्मरणीय झाली.. तू बेलेवू हाऊस चे केलेले वर्णन अतिशय सुंदर आहे..ते वाचताना मी सर्व घर फिरून आल्यासारखे जाणवले.. इतके हुबेहूब वर्णन केले आहे.. घरातील प्रत्येक दालनातून सैर केल्याचा अनुभव तुझ्या लेखणीतून आला.. खूप छान ..

  • — संजना सावंत.

१९
खूप छान लिहितेस. जगावर असं प्रेम करणं जमलं पाहिजे. तुझी नजर म्हणजे टिपकागद आहे सगळं टिपून दिसतेस आणि भाषा हृदयाची असते.

  • — मेघना साने. ठाणे
  • २०
  • सुंदर वर्णन मोहना जी…अगदी हुबेहुब चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. परदेशातील स्त्रीयांविषयीचे शेवटच्या पॅरातील वाक्य म्हणजे a bit new thinking आहे but very true as well. Several other examples also highlights it.
  • — उपेंद्र कुळकर्णी. सिंगापूर

अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.


‘न्यूज स्टोरी टुडे’ या आंतरराष्ट्रीय मराठी वेब पोर्टलवरती प्रसिद्ध झालेला लेखक/संकलक श्री. लहूजी गायकवाड यांचा ‘अशी आहे संस्कृत’ हा लेख वाचला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आत्मविश्वासाने वावरताना आजच्या पिढीला संस्कृतसारखी अत्यंत प्राचीन भाषा ज्ञात असणंही आवश्यक आहे. लेखक लहूजी गायकवाड यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं संस्कृत भाषेचं ऐतिहासिक महत्व या लेखातून विशद केलं आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा संस्कृत दिन भारताप्रमाणे विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्तानं त्यांनी लेखणीबद्ध केलेला हा लेख वाचनीय तर झालाच आहे, पण तो ज्ञानवर्धक देखील आहे. सदर लेखात संस्कृत भाषेच्या व्याकरणातील बारकावे सरांनी हळूवार टिपले आहेत. अर्थात; ते नीट आकलनात उतरण्यासाठी वाचकांनी कमीत कमी चार वेळा या लेखाचं वाचन करणं भाग आहे. एवढा सविस्तर लेख जर काही भागांमध्ये प्रकाशित करता आला असता; तर ते वाचकांना संस्कृत व्याकरण अध्ययनाच्या दृष्टिकोनातून अधिक सौलभ्यदायी ठरलं असतं.

अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती !
व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात्!
हे सरस्वती, तुझ्याकडे विद्यारूपी विलक्षण खजिना आहे. अशी ही विद्या वाटल्यानं वृद्धिंगत होते व स्वत:पाशीच साठवून ठेवली, तर मात्र तिचा क्षय होतो.

या सुभाषिताप्रमाणे लेखक लहूजी गायकवाड यांनी उत्तम संकलन करून हे ज्ञानभंडार वाचकांसाठी खुलं करून दिलं आहे. भाषांची मायमाऊली असलेल्या ‘संस्कृत’ भाषेचं भाषिक नंदनवन अखंडपणे फुलवत ठेवण्यासाठी संस्कृत भाषा शिकायला व शिकवायलाही हवी. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ‘वाग्वै सम्राट परमं ब्रह्म’ असा या भाषेचा गौरव केला आहे. या भाषेच्या अध्ययनामुळे केवळ उच्चार सुस्पष्ट होतात असं नव्हे, तर एक सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते. संस्कृत श्लोक व सुभाषितं आज जगाच्या नकाशावरती सर्वत्र कोरलेली दिसून येतील. संस्कृत भाषेचं ‘शब्दशः’ व ‘अर्थशः’ अशा दोन्ही प्रकारे आकलन होण्यासाठी सुभाषितं, श्लोक, संस्कृत पाठ्येतर, वेद-पुराणांतून ज्ञान ग्रहण करणं आवश्यक आहे.
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा


सेतू माधवराव पाटील..
इतिहासाचे थोर, ज्ञानी, अभ्यासक ज्यांच्यामुळे खरा इतिहास समजून त्याची गोडी व आवड निर्माण झाली त्याना नम्रपणे वंदन. — विलास प्रधान. मुंबई.


जरी सरकारने महिलांना पी एच डी पर्यंत मोफत शिक्षण दिले आणि अशा महिलांना कलकत्ता मधील राजकीय पुढारी मारून टाकत असतील तर उपयोग काय ? — बळवंत रानडे. पुणे


“ऋणानुबंधांची गुरूदक्षिणा” खूप ह्रद्य अनुभवलेखन आणि छान विचार मांडणी.👌👌 अनुजा बर्वे. मुंबई.


आदरणीय सुधाकरजी !!
“अनोख्या दुकानाच्या गोष्टी !टया पुस्तकाचे समीक्षण वाचले.आपल्या ओघवत्या लेखनशैलीमुळे पुस्तकाचा समग्र आशय समजला.गंरजवंतांना मदत कलण्याचे काम निस्वार्थपणे करणार्या अलकाताईंच्या दुकानात सर्व प्रकारच्या वस्तुंचा साठा केला जातो.व तो संपतो.हे काम अव्पाहतपणे करणार्या अलकाताईंच्या दुकानाला वेळेचे बंथन नसते.जाहिरात द्यावी लागत नाही.कॅश काऊंटर नाही.सर्व काही मोफत मिळते.नोकर चाकर नाहीत फिरते अनोखे दुकान.अनोख्या गोष्टी !!💐
— अनंतराव वाणी. जेष्ठ नागरिक, नासिक.


अनुजा बर्वे यांच्या झटपट लघुकथा वाचताना मजा वाटली..
सध्या असेच चालले आहे.
— राधिका भांडारकर. पुणे


कोणालाही न दुखवता आपल्या मनासारखं जगता येणं ही एक कला आहे आणि ती ज्याला साध्य झाली त्याचं जगणं सुंदर होणारच यात काही शंका नाही……सौंदर्य हा दृष्टिकोनाचा तर आनंद हा मनाचा ..ही राधाताईंच्या लेखातील वाक्ये मोहवितात. छान आहे लेख. आज च्या काळात सायबर अटक हा अतिशय महत्वाचा विषय …नांगरेजींचा विडिओ देऊन उत्तम कार्य केले आहे. कृष्ण चिंतन सुंदर ..आणि त्यातील कविता मुलांना वेड लावणारी आहे. आवडली. डॉ महाजनजींची कविता छान.

  • — स्वाती वर्तक. मुंबई.


हलकं फुलकं “अशी झाली गंमत” उद्धव भयवाळ यांची आठवण खूप छान. आम्ही पण असाच एकदा जीरे पुड टाकून ‘जीरे चहा’ केला होता. त्या चहाची आठवण झाली. मस्तच. ‘बापाचे तळपाय’ खूप भावस्पर्शी रचना.
— अरुणा गर्जे. नांदेड


‘पायाभूत प्रकल्प – माध्यमांची भूमिका’ या विषयावर आधारित चर्चासत्रात प्रमुख वक्ते श्री. देवेंद्रजी भुजबळ व इतर सहभागी मान्यवरांनी श्रोत्यांना केलेलं माहितीपर मार्गदर्शन सकारात्मक भूमिका मांडत आहे. एकंदरीतंच सदर कार्यक्रमाची धुरा सांभाळणार्‍या सर्व सदस्यांचे मनस्वी अभिनंदन व त्यांच्या आगामी चर्चासत्रांमध्ये देखील समाजोपयोगी माहितीची देवाण-घेवाण व्हावी, हीच सदिच्छा.

  • — प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा.

१०
पायाभूत प्रकल्प या संबंधीच्या माहितीपूर्ण चर्चासत्रात देवेंद्र भुजबळ यांनी मांडलेले विचार समतोल आणि देशाच्या विकासासाठी सहाय्यक आहेत. मत स्वातंत्र्य हे लोकशाहीतील सामान्य नागरिकांचे साधन असते.माध्यमांनी विकासात त्या संबंधी जन जागरण करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.

  • — प्रा डॉ सतीश शिरसाठ. इंग्लंड.

  • — टीम एन एस टी. ☎️ 9869484800
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments