Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार, मंडळी.
आपल्या न्यूजस्टोरीटुडे चा विस्तार आणि लोकप्रियता आपल्यामुळे वाढतच आहे. याचं एक बोलकं आणि छान उदाहरण म्हणजे, “मनातील कविता” सदर लिहिणाऱ्या डॉ गौरी जोशी – कंसारा अमेरिकेत, त्यांच्या नियमीत वाचक सौ लीना फाटक इंग्लंडमध्ये, तर संपादक, म्हणजे मी भारतात ! असा त्रिवेणी संगम या आठवड्यात जुळून आला.

हे विश्वची आपले घर” ही आपल्या पोर्टलची भूमिका आहे. त्यामुळे असे अनुभव अधिक काम करायला अधिक प्रेरणा देतात. असो….

या आठवड्यात प्राप्त झालेल्या निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे. आगामी आठवड्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक

चंद्रकांत शेटे यांच्याविषयी ऐकून होते. पण आत्ता जे सविस्तर कळले ते वाचून नतमस्तक झाले. उत्तुंग व्यक्तिमत्त्व. आणि पत्नी, सुनांचेही कौतुक की एक व्यवसाय उत्तम असताना आराम, चैन करण्याचे सोडून स्वतःचा दुसराच व्यवसाय सुरू करून तो यशस्वी केला.
शेटे कुटुंबास सलाम. भारतात आले की त्यांना भेटायला नक्की आवडेल आणि देवेंद्र जी यांचे आभार, की त्यांनी ही ओळख करून दिली.

डॉ. अर्चना आणि डॉ. हेमंत जोशी फार मोठे कार्य करीत आहात. अनेक बालकांचा दुवा तुम्हाला असेल. ALL THE BEST FOR FUTURE WORK.

Congratulations, Dr.Sharda
नीला बर्वे, सिंगापूर.

वा खुपच छान सुंदर.
शेटे अण्णांची जीवन गाथा खुपच सुंदर शब्दांत सांगितली 👍 Newsstorytoday चे हे खुप छान वेगळे पण आहे. इथल्या बातम्या व लेख सुंदर विचार करायला लावणारे असतात हेच वेगळे पण मनाला भावते.
असेच छान माहिती पूर्ण लेख नेहमी वाचायला मिळो.
आमच्या कडून खुप खुप हादीॅक हादीॅक शुभेच्छा 👍💐
– मंदा शेटे, मुंबई.

अण्णांचा जीवनप्रवास खरोखरच स्फूर्तिदायक.
– सुनील देशपांडे, नाशिक

जय शिवशंकर. भाऊ शिवशंकर भाऊ पाटील यांचे कार्य यांचे खरोखरीच महान आहे. यांच्या कार्याची व त्यागाची बरोबर कोणीही करू शकत नाही. त्यांचे नम्रपणे जीवन हा त्यांचा महान संदेश आहे.
आपण त्यांची खूप चांगली ओळख करून दिली आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
– विलास सरोदे, औरंगाबाद

नेहमीप्रमाणे फार सुंदर रसग्रहण केलं आहे. मी प्रत्येक रसग्रहण आवर्जुन वाचते. प्रतिसाद मात्र दरवेळी दिला जात नाही. सगळ्या कवींचा, त्यांच्या काव्याचा सखोल अभ्यास डाॅ. गौरी करतात. त्या स्वत: उत्तम कवी आहेत हे त्यांच्या शेवटच्या कवितेतून लक्षांत येतेच. असाच आनंद दरवेळी मिळो.
– सौ. लीना फाटक, इंग्लंड.

आपले मनापासून आभार 🙏🏻
आपल्या सारख्या रसिक वाचकांमुळे लेखनाचा हुरूप वाढतो.
पुनश्च आभार 🙏🏻
– गौरी जोशी – कंसारा, अमेरिका.

लेखिका अमेरिकेत, वाचक इंग्लंडमध्ये, संपादक  भारतात ! काय त्रिवेणी संगम आहे ! हे विश्वची आपले घर ☺️ असंच जग एकत्र येत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा💐
– देवेंद्र भुजबळ, भारत.

महान वंदनीय श्री.शिवशंकरभाऊ पाटील हे सेवाव्रत कसे असते,
ह्याचे सर्वोत्तम उदाहरण.
आम्ही शेगावला नियमित जात होतो. तेव्हां काहीना काही निमित्ताने भाऊंची गाठ पडायची. कधीही मी एवढ्या ‘श्रीमंत’ संस्थानाचा विश्वस्त आहे, ह्याचा उल्लेख काय नामोनिशाणीही त्यांच्या वागण्या-बोलण्यात आढळला नाही. असे निस्पृह, निस्वार्थी सेवावर्ती फक्त शेगाव संस्थानातच आढळुन येतात.
श्री शिवशंकरभाऊ ह्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली.
– रविंद्र वेळापुरे.
💐🙏💐🙏🙏💐💐🙏🙏

शेगांवचे कर्मयोगी शिवशंकरभाऊंना विनम्र अभिवादन
– प्रीति परदेशी

अप्रतिम लेख.
सलाम डॉक्टर राणी यांच्या कार्याला.
– विलास कुलकर्णी मिरारोड

गाण्याचे रसग्रहण उत्तम आहे तरीही गाण्यातील नायकाच्या प्रणयाच्या आतुरतेचा उल्लेख करायलाच हवा असे मला वाटते
– सुनिल शिरसाट

अरूण्यऋषी मारूती चितमपल्ली यांच्या वनक्षेत्रात अर्थात निसर्गाच्या सान्निध्यात राहून विविध प्राणी जगताचा, वनस्पती शास्त्रीय पद्धतीने जे काम केले ते अद्भूत करणारेही आहे. ही महनीय कार्य करणाऱ्या ऋषीतुल्य व्यक्तीचे स्थान ओळखून आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि त्यांच्या विद्यापीठातील सर्व सहका-यांनी त्यांच्या कार्याचा बहूमान ओळखून या अरूण्यऋषींचा जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनाचे महत्त्व ओळखून आमच्या चौकस विचाराचे मित्र सन्मा. देवेंद्र भुजबळ साहेब यांच्या सकस लेखणीतून या वृत्ताचे संपादन केले आहे त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. !!
– राजाराम जाधव

अतिसंवेदनशील कथा आहे. खुप काही सांगून जाते ही कथा. धन्यवाद.
– आकांक्षा गोखले नवी मुंबई.

भावे सर, खूप छान. नव विवाहित स्त्री च्या मनाचे अंतरंग छान उलगडले आहे. खूप सुंदर रितीने ‘नाही कशी म्हणू तुला म्हणते रे’ गीत उलगडून दाखवले आहे. धन्यवाद व शुभेच्छा.
– निलाक्षी पिसोळकर

आनंदी आनंद डांगरे 👌 Anandji is evergreen person and alway positive person…
Many things we can take from him
Best regards to Anandji…
– Nandkumar Kolapkar

नवविवाहित तरूणीची घालमेल आणि तिचच्या वागण्यावर आलेल्या मर्यादांचं छान स्पष्टीकरण रसग्रहणात आलेलं आहे.
– डाॕ. अंजुषा पाटील

फ्रोजन हॉर्स फारच रंजक वाटले पुस्तक कधी वाचतोय असे झाले धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
– अतुल एस गरगडे औरंगाबाद

About the tree and fruits mentioned by Shri Jaiprakash Dagade,
Its name is kIngelia but commonly is called a Sausage tree. refer to Sausage like fruits,
Family : Bignoniaceae consist of species Kigelia africana , which is surprisingly only one species.
Tree : evergreen in rainy season and leaves falls in autumn and grows new ones in spring.
Flowers : bell shaped , orange to maroon in colour
Fruit : about 7kg in weight ,but some times 10 to 12 kg too. 60 cm ie 2 feet long and poisonous and purgative but are eaten by giraffes, elephants, baboons, monkeys, hippopotamus, bushpigs etc.
though poisonous, useful for skin diseases and can use for consumption after drying, roasting etc.
In Africa, the hard shell of fruit is hollowed out and is used as diff shapes of containers. by fermenting the fruits they make sweet beer.
– Neela Barve, Singapore.

लातूरची मुळं आफ्रिकेत.
अत्यंत दुर्मिळ अशा फुलांचा शोध… आणि त्यावरील सविस्तर लेखन… खुपच छान….
– महावीर दुरुगकर

अनिलराव नागपूरकर यांची कार्यप्रणाली, जिद्द, आणि समाजभान ठेवणारी वृत्ती, यामुळेच आज आपण यशवी वेक्ती आहात, आपले भविष्य सतत उजवल राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना , श्री जय आडकूजी महाराज.
– डॉ संजय कानोडे

सेल्फ मेड धडाडीचे उद्योजक
श्री अनिल भाऊ नागपूरकर
यांच्या जीवनातील संघर्ष करून एक यशस्वी उद्योजक आणि सामाजिक जीवनातील भान ठेवून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या अनिलभाऊ बद्दल रश्मीताई हेडे यांच्या सकस लेखणीतून आणि सन्मा. देवेंद्र भुजबळ साहेबांच्या कल्पक संपादनातून समाजातील होतकरू आणि जाणीव ठेवणा-या भाऊंची कहानी अतिशय प्रभावी व प्रेरणादायी अशीच आहे. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी आमच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा !!
– राजाराम जाधव, नवी मुंबई

श्री मिलिंद ठेकेदार ह्यांची उद्योजक म्हणून झालेली अत्यंत यशस्वी वाटचाल त्यांच्या मेहनतीचे, सचोटीचे व कर्तृत्वाचे द्योतक आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
मेघनाताई, मिलिंद ठेकेदारांची खरी व पूर्ण ओळख आपण व हेमंतजींनी करून दिलीत त्याबद्दल आपले आभार व शुभेच्छा ! 💐💐
– गिरीश ताम्हाणे

कहाणी एका उद्योजकाची👌
पावस व्यथा एक वास्तव चित्रण
– संजय आढाव अहमदनगर

पावस व्यथा👌
सुरेख केरळचे निसर्ग सौंदर्य
वर्णन अप्रतिम आहे
आम्ही जाऊन आलो आहे, आपले लेख वाचून परत जावेसे वाटते.
– प्रकाश वैद्य, नाशिक

आम्ही लाखखिंडकर…
जीवनाची जडणघडण. त्यासाठी केलेले प्रयत्न हा एक प्रवास प्रेरणादायी आहे.
– एकनाथ गोफणे

एकच पक्षातून 11वेळा आमदार, दोन वेळा पराभूत म्हणजे 60 / 65 वर्षे सतत राजकारणात सक्रिय राहून गरीब जनतेसाठी तळमळीने निस्वार्थी पणे काम करणारा सच्चा नेता काळाच्या पडद्या आड गेला.
आमदार असताना किंवा नसताना एस टी ने प्रवास करणारा आमदार. आदरणीय गणपतराव देशमुख यांस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹
– मोहन आरोटे

मूर्तिमंत साधे गणपतराव देशमुख
आदरणीय गणपतराव देशमुख यांस भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏 त्यांनी निस्वार्थी पणे समाजाशी ठेवलेली बांधिलकी व त्यांच्या कार्यास सलाम !🙋सुंदर लेख.
— सौ. वर्षा महेंद्र भाबल.

माझी मीच
माझा मीच असताना माझी मीच निवांतपणे वाचताना मन आनंदुन गेले. अनेक वर्ष अमेरीकेत राहूनही शिल्पा ताईंचे मराठी भाषेवर इतके असीम प्रेम आणि अगदी ठेवणीतल्या शब्दांचा प्रचंड साठा जतन केल्याचा अभिमान वाटला. शब्द सुरांची सुरवट, व्यस्त दैनंदिनीचे रहाटहाडगे (आमच्याकडे त्यास रहाटगाडगे म्हणतात) सोन्याहून पिवळं सगळं काही लोभसवानं वाटलं. स्पेन दौरा एकटीने करणं जीवनाला सार्थक करुन एक नवी दिशा देणारे आवाहन आहे. प्रत्येकाने कधितरी स्वत:मधे हरवून गेले पाहिजे हा अनमोल संदेश अगदी सहजपणे दिला. खरंच मनस्वी अभिनंदन 👍👏👏👏👏👏
– डॉ. रमेश वाघमारे

पुनम सुलाने यांची कविता उभारी खरच आयुष्याला उभारी दिल्याशिवाय राहत नाही. शब्दरुपी पाऊसात उभारी घेत मनसोक्त न्हाऊन निघालो..अप्रतिम शब्दरचना
– संजय अहिरे, नंदूरबार 👍🏻

आईचं दूध उपयुक्त लेख ..
अण्णांवरील लेख वाचून खूप छान वाटले .. जुन्या आठवणींना उजाळा ..
🙏नेहा हजारे, ठाणे.

शिवशंकरभाऊ यांचा परिचय व मुलांच मन वाचून छान वाटले… तसेच तुमची करीअर संबंधी मुलाखत पण नेहमीप्रमाणे उत्तम..👍
– लक्ष्मीकांत विभूते नवी मुंबई.

बेकरी बिस्किटं अन …..
दिल्लीतील मैफिल समूहाने
श्री मिलिंद जहागीरदार या मराठमोळ्या तरुणाने जवळपास ३० वर्षांपासून बेकरी उद्योगजगतात आपला दबदबा निर्माण केलेला आहे अशा यशस्वी व्यवसायकाची मुलाखत
घेऊन त्याचा गोषवारा N S T च्या सर्व सदस्यांना उपलब्ध करून दिलाय छान केलेत.
दिल्लीतील मैफिल कुटुंबातील
सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईच्छा

कवयित्री परवीन कौसरजी
नमस्कार.
घरापासून दूर बेंगलोर जाऊन
बसायचे आणि मग घर दूर राहिले
म्हणून खन्त करायची हा कोणता न्याय ?
ईटूकली पिटुकला
कविता भावली विशेषत : खालील पंक्ती

( जरी ) वाट ही खडतर झाली

( तरी ) चालणे हाच होता पर्याय
( कंसातले शब्द माझे आहेत )
माफी असावी
आपण फक्त सोळा ओळीच्या
कवितेतून लाख मोलाचा मन्त्र
दिलात
जीवनात यशस्वी व्हावयाचे
असेल तर न थाम्बता
तू चाल गड्या तुला भीती कशाची ?
हा एकच पर्याय उरला !
– प्रकाश पळशीकर, नोएडा

नीला बर्वे यांची कविता खूप छान आहे 👌
– वर्षा फाटक, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी