Friday, October 18, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
नवरात्रीनिमित्त आपल्या पोर्टल वर दररोज प्रसिद्ध झालेल्या, त्या त्या दिवशीचे महत्व सांगणारी व अमेरिकेतील नवदुर्गा या दोन्ही लेख माला वाचकांना आवडल्या. रोजच्या रोज या लेखमाला लिहिल्याबद्दल लेखिका सौ पौर्णिमा शेंडे, मुंबई आणि चित्रा मेहेंदळे, अमेरिका या दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार.
या लेखमाला, साप्ताहिक लेख माला आणि अन्य लेखनास वाचकांचा मिळालेला प्रतिसाद पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ. (संपादक)


पूर्णिमा शेंडे ह्यांनी सलग नऊ दिवस देवीच्या विविध रुपांची माहिती देत, समारोपाला विजया दशमी सणाचे महत्त्व छान शब्दात वर्णन केले आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना व न्यूजस्टोरी च्या संपादक वर्गालाही विजया दशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा .
— मृदुला राजे. जमशेदपूर.

चित्राताई तुमच्यामुळे छान छान अमेरिकेतील कर्तबगार महिलांची ओळख व माहिती कळत आहे छान लेखमाला सुरू केली आहे.
— उषा फाल्गुणे. अमेरिका

चित्रा, नीता रांगणेकर नाबर आणि वयाची 80 पार केलेल्या सुलभाताई पंचवाघ काय ! एखाद्या गोष्टी विषयी आवड असली की वय, देश, भाषा काही आड येत नाही हेच खरं आहे.दोघींना सलाम! तू पण प्रत्येक नवदुर्गेची माहिती आमच्या पर्यंत पोहोचवतेस. त्यासाठी धन्यवाद !🙏
— मीना पुरोहित. पुणे

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या चित्रा मेहेंदळे मॅडमच्या ‘अमेरिकेतील नवदुर्गा’ या लेखमालेचे नऊ भाग क्रमशः ‘न्यूज स्टोरी टुडे’ या आंतरराष्ट्रीय मराठी वेब पोर्टलवरती नुकतेच प्रकाशित झाले. दुर्गोत्सवाच्या निमित्तानं अमेरिकास्थित नऊ मराठी भाषिक महिलांच्या कार्यमहतीच्या स्वरूपात आधुनिक काळातील नवदुर्गांची नऊ रूपे घेऊन लेखिका चित्रा मेहेंदळे वाचकांच्या भेटीस आल्या आहेत. दुर्गोत्सवात माता शैलपुत्री, माता ब्रह्मचारिणी, माता चंद्रघंटा, माता कुष्मांडा, स्कंदमाता, माता कात्यायनी, माता कालरात्री, माता महागौरी व देवी सिद्धिदात्री या नवदुर्गांची मनोभावे पूजा-आराधना करण्यात येते. आज महिलांचं कार्यक्षेत्र फक्त ‘चुल आणि मुल’ पुरता मर्यादित नसून, ‘हरहुन्नरी’ हे विशेषण त्यांनी सार्थ ठरवलं आहे. माननीय वसुंधरा पर्वते, पूर्णिमा कर्‍हाडे, मानसी पालकर, नीता रांगणेकर नाबर, सुलभा पंचवाघ, अश्विनी क्षीरसागर, यशस्विनी गोरे लिमये, सुधा माटे व पूर्वल घाटे या अमेरिकास्थित नऊ महिलांनी उपजत कलागुण, मनःशक्ति, चिकाटी, सौंदर्य, संयम, कार्यकुशलता, विचारसंपदा यांच्या उत्तम सादरीकरणानं विदेशात आपल्या नावाची न मिटणारी अशी छबी उमटवली. विदेशात मराठमोळ्या संस्कृतीचा ठेवा जतन करत ‘मराठी पाऊल पडते पुढे…’चं गीत त्यांनी अभिमानानं गायलं. इतकंच नव्हे तर अवघं विश्व त्यांनी कवेत घेतलं आहे. पोर्टलवरती त्यांची सचित्र कार्यमहती वाचताना प्रेरणेचा झरा उत्स्फूर्तपणे वाहताना दिसतो. लेखिका चित्रा मेहेंदळे मॅडम यांच्या लेखनकार्याचं देखील विशेष कौतुक. प्रत्येकीची व्यक्तिरेखा रेखाटताना सखोल अध्ययन करून, ती माहिती तितक्याच दर्जेदार स्वरूपात त्यांनी वाचकांसमोर मांडली आहे. या कल्पक लेखमालेची निर्मिती करताना चित्रा मॅडमनी घेतलेली प्रचंड मेहनत त्यांच्या प्रत्येक लेखातून दिसून येते. पुढील लेखनकार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा

चित्राताई, तुमचा नवदुर्गा हा उपक्रम अतिशय मनोज्ञ असा आहे. तुमच्या लिखाणाची साधी सरळ शैली, उत्तम भाषा आणि दुसऱ्या कुणाच्या कतृत्वाबद्दल सांगण्याची प्रामाणिक कळकळ- हे सर्व या मालिकेत प्रगट झाले आहे. तुमचा हा उपक्रम केवळ स्तुत्य नव्हे तर प्रेरणादायी आणि समृध्द करणारा आहे.
डॅा. अरुणाताई ढेरेंच्या ‘विस्मृतिचित्र्ये’ या पुस्तकाची आठवण झाली. तुम्ही हा उपक्रम चालू ठेवून या लेखांचे संकलन करून पुस्तक प्रसिध्द केलेत तर भारतातल्या लोकांनाही याचा आनंद घेता येईल. तसेच या लेखांचे इंग्लिशमध्ये भाषांतर केल्यास आपली इथे वाढलेली पिढीपण ते वाचू शकेल.
तुमच्या पुढील लेखन प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा ! 💐
— भाग्यश्री बारलिंगे. अमेरिका

माझी जडणघडण भाग १९ वरील अभिप्राय…

अतिशय उत्तम लेख ..
योग्य बॅलन्सींग आणि योग्य वेळी अपघात टाळण्यासाठी ब्रेक्स लावणे. आयुष्य जगत असताना या “ब्रेक्स”चे महत्त्व फार जाणवले.. अतिशय सुंदर वाक्य… जीवन जगण्यासाठी अति महत्त्वपूर्ण शब्द… “ब्रेक्स..!! खूप छान… सायकलच्या चाका सोबत गोल गोल फिरणाऱ्या आठवणी… आणि पुन्हा तेच.. त्या आठवणीत गोल गोल फिरताना महत्त्वाचे काय तर ब्रेक्स… मारावीच लागेल.. नाही तर माझी प्रतिक्रिया लेख चे रुप धारण करेल..
— मानसी म्हसकर. बडोदा

आठवण अगदी अलगदपणे उलगडून दाखविली… त्यातून घेतलेली आयुष्यभराची शिकवण/धडा सहजपणे सांगितलाय 👌🙏🏼
— नीलिमा खरे. पुणे

छान ! सायकल शिकण्याची मजा मी पण चाकली आहे त्याची आठवण आली
नंदिनी चांदवले. पुणे

फारच छान आपली आजारपणं आपल्या आयूष्याला ब्रेकस् च लावतात. धावण्यार्‍या मनाला अंतर्मुख करतात.
— अरुणा मुल्हेरकर. मिशिगन

ठाण्यातील वास्तव्याच्या आठवणी छान लिहिल्या आहेस. सायकल चालवायला शिकणे हा एक गमतीशीर अनुभव असतो. मी तर आधी खूप घाबरत असे, नंतर शिकले. समतोल राखणं त्यामुळे आपण शिकतो हा विचार छान ! 😊🌹
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

माधुरी ताम्हणेंच्या “माध्यम पन्नाशी “बाबतची प्रतिक्रिया …
माधुरी वहिनी, सुरुवातीला तुम्ही सांगितलेल्या काही आठवणी, काही वर्णन केलेले प्रसंग हे वाचून जितकी मजा वाटली तितकेच पुढचे वाचून मी तर भारावून गेले !! साक्षात गो.नि.दां चे तुमच्या कथेला अनपेक्षितपणे मिळालेले अभिप्राय. हा तर तुम्हाला त्यांनी दिलेला अनमोल आशिर्वाद !! खरच खूपच भाग्यवान आहात तुम्ही.
— मनीषा शेखर ताम्हणे. बोरीवली, मुंबई

अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…


मराठीला अभिजात दर्जा मिळाला पुढे काय ? या महत्वाच्या विषयावर माध्यम तज्ञ श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेला लेख मनापासून आवडला. त्यांनी जगभरातील मराठी भाषिकांनी मराठीत बोलावे. दैनदिन जीवनात मराठी भाषेतच संवाद साधावा. माध्यमांनी मराठी लेखात इंग्रजी शब्दांचा वापर टाळावा, शासनाने मराठी धोरण ठरविण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. वैगेरे अनेक सुचना अतिशय उपयुक्त आहेत. आपल्या लेखात अभिजात मराठी दर्जा वरचा संपूर्ण इतिहासही लिखित केला त्यामुळे हा लेख शासनासह सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा झाला आहे. यावर मुंबईचे डॉ.चंद्रशेखर देशमुख यांनी काव्यासह अनेक उत्तमोत्तम सुचना केल्या आहेत. ”न्युज स्टोरी टुडे’ या लोकप्रिय पोर्टलचे मराठी भाषेला दर्जा मिळताच सर्व प्रथम तातडीने यावर व्यासंगपूर्ण विवेचन सुरू केले याचा मला अभिमान वाटतो. श्री देवेंद्र भुजबळ यांचे मनस्वी अभिनंदन…
— सुधाकर तोरणे. नासिक

वेलणकर यांचा ‘असे होते रतन टाटा’ लेख अप्रतिमच…. छान👌👌
— महावीर दुरुगकार. सोलापुर

छान अंक. विशेष म्हणजे रतन टाटा वर आपण प्रकाश झोत टाकला आहे.अभिनंदन व शुभेच्छासह .
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई


नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी जन्मलेले रतन टाटा हे खरे सांगायचे झाले तर ते नुसते भारतरत्न नव्हते तर विश्वरत्न होते.
झाले बहु, होतील बहु, परंतु या सम होणे नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
अमर रहे रतन
कहता है मेरा वतन.
— प्रकाश पळशीकर. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

Previous article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन