Thursday, December 19, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात….

वाचक लिहितात….

नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टलवर लेखक, कवी भरभरून लिहीत असतात आणि त्यांना वाचक मंडळी ही भरभरून प्रतिसाद देत असते. आता तर इतका मजकूर येत असतो की,त्यातून निवड करणे, त्याचे संपादन करणे,मांडणी करणे याला आम्ही दोघे ही कमी पडत आहोत. असो.
आता वाचू या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)

श्री मधुकर निलेगावकर यांच्या “चल उठ रे मुकुंदा” या सामाजिक प्रबोधनात्मक भावगीतावर (भूपाळीवर) आधारित सामाजिक प्रबोधनाच्या भावगीतावर, (भूपाळीवर) त्यांना काव्यरसिकांच्या प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया, अभिप्राय खालीलप्रमाणे आहेत.
१.
तुम्ही सध्याच्या मानवाला दूष्कर्मांचा पसारा आवरून त्वरीत
जागा होवून पर्यावरण चांगले करण्यासाठी व सत्कर्म करण्यासाठी, चांगली कामे करण्यासाठी मानवाला परत जागृतीचा इशारा दिला आहे. नदीच्या किनाऱ्यावरील झाडे मानवाला आर्त हाक देत आहेत. रानलक्ष्मी निघून चालली आहे. ती आपल्या जागेवर परत आणून पर्यावरणाचे, सर्व जीवांचे व निसर्गाचे रक्षण करावयाचे आहे. त्यासाठी, मानवाला जागा होण्याचा तुमचा एक प्रयत्न हा खूप सत्य आहे. अशा सुंदर कवितांसाठी तुम्हाला मन:पुर्वक शुभेच्छा ! तसेच, थंबचे स्टीकर पाठवून ग्रेट असे लिहिले आहे.
श्री.आपटेकाका, सातारा
२.
कविता छान आहे.
— सौ.जोशीकाकू
३.
छानचे अभिप्रायाचे स्टीकर
— सौ.अनुजा कल्याणकर.पुणे
४.
सहज सुंदर शब्दांत महत्वाचे प्रबोधन केले आहे. असा
काव्यानंद द्यावा. मन:पुर्वक अभिनंदन !
— श्री. सुहास रानडे. पुणे
५. 
Nice ! 
— श्री.एम.एस.जाधव, पुणे
६. 
छान ! स्टीकरद्वारे अभिप्राय !
— श्री.विष्णु चन्ने. छत्रपती संभाजीनगर
७. 
छान ! आशयघन आहे कविता ! अभिनंदन !
— सुनिल गायमुखे. पुणे
८.
बहोत बढीया ! हाताचे अभिनंदन स्टीकर
— श्री.संजय आंबेकर. पुणे

“सुरेल, सुचित्र अभिरुची जोपासना” या माझ्या वृत्तांतावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया….

सर, मी हि रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनिच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होतो. तसेच, विनय सहस्त्रबुद्धे तिथे संचालक असताना मी एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. विजय बोधनकर माझा खुप जवळचा मित्र आहे. खुप छान कार्यक्रम झालाय. सुंदर लिहिलय तुम्ही सर 👏💐
— गणेश जोशी. व्यंगचित्रकार, ठाणे

देवेंद्र अल्लड फुलपाखरा प्रमाणे साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक फांदी वरच्या उमललेल्या फुलावर मुक्त बागडणाऱ्या प्रतिभाताईला आगामी वर्षांसाठी मनापासून शुभेच्छा
— प्रकाश पळशीकर. पुणे

अशा कार्यशाळा व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि समाजातील सकारात्मक विचारसरणीची रुजवात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आजच्या युगात केवळ ज्ञान संपादन करून चालत नाही, तर त्याला जीवनदृष्टीची जोड देणे गरजेचे आहे. या सत्रांतून मिळालेली शिकवण आणि अनुभवांचा ठसा खूप काळ आपल्या विचारांवर राहील.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅटिक लीडरशिप या संस्थेचे कार्य नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. याच धर्तीवर इतर शहरांमध्येही अशा कार्यशाळा होणे गरजेचे आहे, ज्या युवकांना नवी दृष्टी आणि आत्मविश्वास देतील.
सारांश: तुमच्या वृत्तांतामधून हे स्पष्ट होते की, अभिरुची जोपासना कार्यशाळा केवळ ज्ञान देत नाही, तर सर्जनशीलतेला आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला व्यापक बनवते. यातील सहभागाचा अनुभव नक्कीच समृद्ध करणारा ठरला असेल.
— नेहा चव्हाण. बीड

‘प्रतिभा’ ला वय नसतं !
या मी लिहिलेल्या यश कथेवर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत..


प्रतिभाजींचे अनोखे दर्शन घडविणारा लेख आवडला. खरे आहे.. अशा उत्फुल्ल सदैव टवटवीत राहणाऱ्या व्यक्तींना वय नसतेच मुळी.. त्यांचे अंदमान वरील लेख मी वाचलेच आहेत.. आमच्या तर्फे ही अभिनंदन आणि शुभेच्छा.
— स्वाती वर्तक. मुंबई

हॅलो, सुप्रभात 🙏🫖☕
मराठी वृत्तपत्र लेखक संघाची मी आजीव सदस्य असल्यामुळे खूप वर्षांपासून प्रतिभाची आणि माझी ओळख झाली. त्यानंतर  आम्ही साहित्य संमेलनाला भेटत राहिलो. उपनगरी साहित्य संमेलनाला बोरीवली पूर्व येथे तिला मी निमंत्रित केले होते. असो.तिचा मोबाईल नंबर मिळाला तर तिला शुभेच्छा द्यायला मला आवडेल 🙏🌷
— कवयित्री सुरेखा पाटील. मुंबई

“माध्यम पन्नाशी” लेखमालेबाबत आलेले अभिप्राय.

“अनोळखी पाऊलवाटा” ह्या सदराचा शुभारंभ सुहासिनीबाई मुळगावकरांसारख्या प्रसन्न आणि महान व्यक्तिमत्वाशी झाला.खूपच छान!! हा प्रवास तुमच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरला हे  तुम्ही माध्यमाच्या जगात आजपर्यंत यशस्वीपणे उभ्या आहात ह्यावरुन सिध्द होत आहे.तसेच ही लेखमाला देखिल माध्यम क्षेत्रातील नवोदितींना नक्कीच मार्गदर्शक ठरेल हे देखिल तितकच खरं आहे.
— सौ.मनीषा शेखर ताम्हणे. बोरीवली

रश्मी हेडे यांचा माय टाईम। लेख छान आहे.स्त्री ने स्वतः कडे लक्ष देणे नक्कीच गरजेचे आहे
शिल्पाताई म्हणतात तसे सोशल मीडिया फेसबुक यातील प्रतिमा भिन्न असतात ..स्वतः चे नीट अवलोकन करू मनात झाकून बघणे अत्यावश्यक आहे ..धन्यवाद शिल्पाताई.
सुहासिनीबाईंची शिकवण अतिशय बोलकी, वाचनीय..आत्मविश्वास हा महत्त्वाचा सूर आहे.
आशाताईंनी ज्ञानियाच्या राजाचे सुरेल गुणगान केले आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई

सर, जयु भाटकर दुरदर्शनला निर्माते असताना १९९६ मधे “युवदर्शन” कार्यक्रमा मध्ये “ब्रशच्या गुदगुल्या” असा कार्यक्रम झाला होता. या मध्ये माझी मुलाखत व  व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके सादर झाली होती.

जयु भाटकर अजुन ठाण्यात रहातात का ? त्यांचा मोबाईल नंबर   असल्यास द्यावा हि विनंती.
— गणेश जोशी. व्यंग चित्रकार, ठाणे

नमस्कार मित्रांनो 🙏💐
मी रमेश मारुती पाटील,
आज ग्रुप वरील *मनाच्या गहनस्थळी* हा सुनील देशपांडे यांचा लेख वाचला अप्रतिम आहे …पण आज मला वाचन ह्या गोष्टीवर थोड बोलावं वाटले म्हणून … पुढील काही . ….
वाचन ही विकासाची केवळ पहिली पायरी आहे. मनन, चिंतन, विश्लेषण, अनुभावन आणि अनुसरण या मोठ्या व कठीण पायऱ्या पुढेच आहेत. बहुतांशी लोक वाचनाच्या पहिल्याच पायरीवर अडकून बसतात व आयुष्यभर ग्रंथसंग्रह व शब्दसंग्रह करत राहतात. हे शाब्दिक ज्ञान एवढे वाढत जाते की आपण खरोखरच ज्ञानी असल्याचा अहंकार वाढत जातो पण प्रत्यक्ष आचरण शून्य जीवन जगत राहतात. केवळ वाचन करत राहणे त्यापेक्षा मी वाचन का करतो आहे याविषयी सावध राहा. एकाने एखादे पुस्तक वाचले तर मी ते वाचलेच पाहिजे असे काही नाही. तुम्हाला तो विषय आतून पटला तरच वाचा. प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात ….
आपला स्नेहांकित
— रमेश मारुती पाटील.

माझी जडणघडण भाग २६ अभिप्राय

काय म्हणावे तुझ्या लेखनसामर्थ्याला!
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

शाळेच्या दिवसाची आठवण झाली व पुन्हा एकदा बालपण आठवले.
— सुषमा पालकर. ठाणे

👌🙏समृद्ध बालपण
— अस्मिता पंडीत. पालघर

अगं, कित्ती छान आठवणी !
तू तुझ्या घरात हे खूप मौल्यवान क्षण अनुभवले आहेस ! त्यामुळे तुझा वाचन लेखनाचा व्यासंग इतका मोठा झाला! आज मला हा लेख वाचताना माझ्या वडिलांची ही खूप आठवण झाली. ते असेच इंग्रजी, संस्कृत, मराठी चे चांगले वाचक होते !
— उज्ज्वला सहस्रबुद्धे. पुणे

“पसारा” वाचताना अख्खा पसारा जो पप्पांसाठी आणि आपल्यासाठी नसायचाच, सर्व काही जसेच्या तसे चक्षूंसमोर उभे ठाकले. डोळ्यांच्या कडा पाणावल्या ! Hats off to your memory !!
— आरती नचनानी. ठाणे

बिंबा तुझ्या पपांचा साहित्यिक पसारा वाचून मी अवाक झाले ग 🤭
तुमची रविवारची सकाळ, संध्याकाळचं सेंट्रल मैदान.. सगळंच‌ कसं रम्य 👌 एक मात्रं जाणवलं की *ज. ना*. तुम्हां मुलींचे मित्र होते.👍🏼
बिंबा किती सविस्तर आठवतंय तुला आणि  लिहिलंयस पण‌ किती ओघवतं. तुला  🫡
— अलका वढावकर. ठाणे

रधिकाताई किती छान लिहिता तुम्ही. अगदी साधा प्रसंगही रंगवून सांगता. लेख वाचताना आपणही ते अनुभवत असतो.
आमचे आईबाबा अतिशय शिस्तीचे होते. त्यामुळे काम झाले की ती वस्तू लगेच जागच्या जागी ठेवायला लावत. आणि रविवार म्हटलं की आम्ही क्रिकेट खेळायला सकाळीच बाहेर पडत असू. खेळून आल्यावर bat Ball सुध्दा जागेवर ठेवले नाही तर ओरडा खावा लागत असे. त्यामुळे आम्ही भावंडं सर्व गोष्टी जागेवर ठेवायचो, असो.
खूप छान शब्दांकन.
👍👍
— अजित महाडकर. ठाणे

आपुलिया बळे
नाही मी बोलत
सखा कृपावंत,वाचा त्याची।
साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी
शिकविता धनी वेगळाचि॥
हा संत तुकारामांचा परमेश्वराप्रती असलेला कृतज्ञताभाव आणि राधिकाताईंचा आपल्या पप्पांसाठी असलेला कृतज्ञताभाव यात तिळमात्र फरक नाही आणि तो असायलाच हवा इतका त्यांच्या जडण-घडणीत  त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे.ते नुसते भाषाप्रभु किंवा प्रकांड पंडित नव्हते त्यांनी आपल्या मुलींना हंसत खेळत दिलेलं ज्ञान, संस्कार, वेळ त्यांची भावनिक गुंतवणूक हे राधिकाताईंनी नेहमीच्या सहजतेने त्यांच्या ‘पसा-या’तून प्रभावीपणे मांडले आहे.
— साधना नाचणे. ठाणे

हवाहवासा वाटणारा “पसारा” आहे तुमचा  राधिकाताई. या पसार्‍यातच तुम्हांला साहित्यिकांची ओळख झालेली दिसते. पप्पांचा व्यासंग कळतो नक्कीच.
छान  व्यक्त झाले आहात तुम्ही.
— छाया मठकर. पुणे
१०
रविवारच्या दिनक्रमाचं वर्णन छानं रंगवलंय.‌
— प्रमोद शृंगारपुरे. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Purnima anand shende on निसर्गोपचार : ३
Manisha Shekhar Tamhane on निसर्गोपचार : ३