नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात….सदरात आपलं स्वागत आहे. आधी जाहीर करण्यात आल्यानुसार आपल्या पोर्टल चे लेखक, कवी, वाचक, हितचिंतक यांच्यासाठी उरळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रमात सुरू असलेले विशेष शिबिर छान सुरू आहे. त्याचा वृत्तान्त आपण वाचतच असालच. आपण ही निसर्गोपचारची कास धरा आणि आनंदी, निरोगी आयुष्य जगण्याचा निश्चित प्रयत्न करा. असो…
आता गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पाहू या.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)
माधुरी ताम्हणे यांच्या “माध्यम पन्नाशी” वरील अभिप्राय ….
१)
— उल्का गोळे. अहमदाबाद
माधुरी खूप खूप सुंदर! तू खूप छान लिहितेस. जिवंत चित्रण असतं तुझ्या लेखनात! तुझा प्रत्येक लेख हा ट्रिट असतो आमच्यासाठी .ऑल द बेस्ट.
२) श्री. गोविंद गुंठे निवृत्त केंद्र संचालक नवी दिल्ली
माध्यम पन्नाशी अतिशय सुरेख !
३) श्रीकांत खानोलकर. ठाणे
माध्यम पन्नाशी मस्त !
४) श्यामा कुलकर्णी. ठाणे
बापरे ! काय काय दिव्यातून गेलीस तू ! सगळा प्रवासच कठीण होता आणि तेही इतक्या लहान वयात! या प्रवासात एक एक परीक्षा देत देत वर वर चढत गेलीस. तेही कोणावरही न रागवता आणि उगाचच खंत ही न बाळगता. धन्य आहे तुझी. कमालीची चिकाटी आहे तुझ्यात! मला तुझे लेख वाचायला खूप आवडतात. अशीच खूप खूप प्रगती कर
५) चंद्रकुमार मधुकर देशमुख. गोरेगाव
सौ. माधुरी ताई यांनी त्याकाळी दूरदर्शनच्या पडद्यामागील वास्तवाचे अतिशय प्रभावीपणे दर्शन घडवले आहे. त्यांच्या कार्यावर आणि कलेवर अन्याय झाला. तरीसुद्धा प्रचंड ज्ञान, अनुभव, आत्मविश्वास आणि अथक परिश्रमामुळे तरुण संचालिका म्हणून त्या उत्कृष्ट ठरल्या. त्यांच्या योगदानाचे कौतुक करायला हवे. पण त्याऐवजी अन्यायकारक परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागला. तरीही त्यांच्या संस्कारी बंधनांनी आणि आईच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यांचे सुंदर लेखन आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या थेट अंतःकरणाला भिडते. त्यांनी असेच लेखन करून आम्हा सर्वांना नवीन दृष्टिकोन आणि माहिती देत राहावे. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
६) अंजली चौबळ. पुणे
बापरे! काय अनुभव ग! शहारे आले. खरंच आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांमध्ये केवढी ताकद होती! नेहमीप्रमाणे छान लेख.
७) शुभांगी थबडगाव. ठाणे
माध्यम पन्नाशी आत्ताच वाचले. खूप सुंदर लिहिता तुम्ही. तुमचे सगळे लेख मी वाचते. .मला ते खूप आवडतात.
८) मो.र. अंजारिया. कळवा
आकाशवाणी दूरदर्शनच्या प्रवासावरून आपलं व्यक्तिमत्व कसं घडलं याच छान चित्रण आपण उभं केलं आहे. पदोपदी आलेले अनुभव व त्यातून घडलेले प्रसंग आपण छान मांडलेत. प्रसंगी असे कणखर व्हावे लागते हेच खरे! सुहासिनी बाईंसारख्या कडक शिस्तीच्या व्यक्ती पुढेही आपण सडेतोडपणे आपली प्रतिक्रिया दाखवली. त्यातून आपला कणखरपणा दिसून येतो. खूप छान लेख! खूप आवडला. दुसऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असाच लेख आहे.
९) जयश्री साने. ठाणे
तुझा प्रत्येक लेख खूप छान.
१०) आशा शिंदे. पुणे
तुमचा लेख पूर्ण वाचला. खरंच किती अवघड प्रसंगातून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यश मिळवले आहे. खूप कौतुक आहे. पण खरं सांगू ? यामधून मिळणारे मानसिक समाधान खूप महत्त्वाचे असते.
११) शौनक ताम्हणे. तळेगाव
भन्नाट अनुभव. मस्त लेख. दणादण वाचून काढला.
१२) प्रशांत देशपांडे. दादर
लेख खूप आवडला. पुढे काय झालं याची उत्सुकता आहे.
राधिका भांडारकर यांच्या ‘माझी जडणघडण’ भाग २७ वर प्राप्त झालेले अभिप्राय..
१
*ARUN*….
नाती बिघडली तरी चालतील, पण ती तुटता कामा नयेत. हा फार मोठा संदेश यातून मिळतो.
शिस्तबद्ध जरूर असावे, पण त्या साठी हेकेखोर व तापट वृत्ती असता कामा नये हे ही तितकेच खरे.
एकंदर ही जडणघडण वाचताना माणसांचे स्वभाव हे किती भिन्न असू शकतात याचे ज्ञान होते….
संशय कधीच नसावा. नाहीतर, विषप्रयोग होईल ही भीती वाटली नसती.
नात्याचे अनेक प्रकार यात अनुभवावे लागतात.
२.
लेख वाचनीय आहे….
🙏🌹🙏🌹✅🌹🙏
— अरुण पुराणिक. पुणे
३.
‘अण्णा’ हे सुतराम परिचयाचं नसलेलं व्यक्तिमत्त्व राधिकाताईंच्या ‘खास’ शैलीतून डोळ्यासमोर साकारलं.कोणाचेही दोष निर्भीडपणे सांगताना त्या सभ्यतेची मर्यादा ओलांडत नाही आणि प्रत्यक्ष कोर्टात आपल्या विरुद्ध लढणा-या व्यक्तितलं ‘माणूसपण’ टीपायलाही त्यांचं संवेदनशील मन चुकत नाही किंबहुना त्यांच्यातली प्रामाणिक लेखिका त्याचा आवर्जून उल्लेख करते. ‘नाती बनायची, बिघडायची पण तुटायची नाहीत’ या एका वाक्यात मध्यमवर्गाची मानसिकता, सहिष्णुता, क्षमाशीलता सारं काही सामावलंय.
कोर्टाबाहेर पप्पा आणि अण्णा यांचं वक्ता आणि श्रोता असणं, अण्णांचं पाणावलेल्या डोळ्यांनी घरातल्या ‘समस्या’ सांगणं, पप्पांनी त्यांचं ‘सांत्वन’ करणं, अण्णांचं पप्पांसाठी खरवस आणणं यातून त्यांच्यात तेढ निर्माण व्हायला ‘परिस्थिती’ जबाबदार होती, मोहापेक्षा जास्त जुन्या वास्तुतली भावनिक गुंतवणूक महत्वाची होती, ही जीवनातली ‘रस्सीखेच’ म्हणजेच ‘जीवन-संघर्ष’ हेच राधिकाताईंनी सुचवलंय.
— साधना नाचणे. ठाणे
४.
Kay sunder balpani cya aathvani savistar utarvilya janu kahi ase watate ki tumhi aamchya samor basun sangat aahat. Wachtanna aamhi etake ramun jato ki bhanch Rahat nahi.as watat te sampu ch naye.te kapat pustakan ch kadhi bandch hou naye .khoopch chhan Radhika tai !!
— मीना वाघमारे. अमरावती
५.
कशी अंतरंग असतात माणसांची. वास्तूविषयी असलेले प्रेम, कृतज्ञता म्हणून विनाकारण कोर्टकचे-यांच्या जंजाळात बांधून घ्यायचे आणि परत घरमालकापाशी अगदी मनमोकळेपणाने आपलं हक्काचं माणूस समजून आपल्या अडी अडचणींना वाट मोकळी करून घेत त्यांच्याकडूनच छानसा सल्लाही घ्यायचा. माणसाच्या अथांग मनाचा थांग लागणं शक्य नाही हे मात्र खरे 🙏
— अस्मिता पंडीत. पालघर.
६.
राधिकाताई, खरंच खूप सुंदर असं तुम्ही तुमचं आणि अण्णां सोबतच नातं इथे व्यक्त केलेत… माणूस काणूस नव्हता राहिला.. खूप छान … केस संपली परंतु नात्यातला गोडवा मात्र तसाच राहिला…खूप सुंदर.. त्या आठवणी तुम्ही इथे लिहिल्या..अप्रतिम.. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत..
— मानसी म्हसकर. बडोदा
७.
अण्णा गद्रे आणि तुझे वडील यांच्यातील वाढत गेलेली संबंधांची गुंफण छान विणली आहेस. त्यावेळचे वातावरण डोळ्यासमोर उभे राहते. कुठेही ताणतणाव नसलेले कोर्टातील प्रसंग यांची आठवण आली. घरात आजोबा, वडील – दोघे वकील. ते दिवस आठवले. सगळं खेळीमेळीत चालायचं. अण्णांच्या जागेत गुंतलेल्या भावना समजल्यावर मन हळुवार होतं.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई
८.
एकाच वेळी वैरभाव आणि मैत्रभाव असू शकतो. हा विरोधाभास छान टिपला आहे.
तसेच जो मनुष्य इतरांना कठोर, पाषाण ह्रदयी वाटतो त्याच्या अंतरंगातूनही छोटासा जिव्हळयाचा झरा वहात असतो हे शेवटी क्लॅयमॅक्स सारखे सुंदर दाखविले आहे.
शिवाय हे सर्व सत्य आहे. कुठेही काल्पनिक नाही.
त्या बालवयात कळत नकळत मनावर ठसलेल्या या गोष्टी त्यातून झालेले संस्कार.
वैर आणि मैत्री यातली रेषा किती पुसट असू शकते हे खरवसच्या उदाहरणाने छान समजावलेत.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
अन्य प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.
१.
योगशिक्षक श्री. सतीश सोनावने सरानी. प्राकृतिक दिनचर्या महत्व फारच छान तर्हेने सागितलं.
या शिबिराला येता न आल्याने फार खंत आणि खेद वाटला.
सर्व शिबिरार्थिना शुभेच्छा आणि शुभचिंतन.
— राम खाकाळ.
निवृत्त दूरदर्शन निर्माता, ठाणे
२.
श्री गिरीश देशमुख यांची छायाचित्रे, लिखाण अप्रतिमच आहे. त्यांना मी सर्व गोष्टी संकलित करण्याची सूचना दोन वर्षापूर्वीच केली होती. त्या प्रमाणे त्यांनी सुरुवात केली आहे. त्यातील निवडक लिखाण आणि छायाचित्रे यांचे एक सुंदर पुस्तक प्रसिद्ध करण्याची संकल्पना आहे. त्या साठी आपण सर्वजण निधी आणि इतर गोष्टीच्या रूपाने सहयोग देवू या, हे लिखाण आपल्या माहिती आणि जनसंपर्क
महासंचालनालयाचा एक ठेवा ठरेल असे वाटते.
— निरंजन राऊत.
निवृत्त वरिष्ठ सहायक संचालक, माहिती विभाग, मंत्रालय, मुंबई.
३.
निरंजनांच्या भुमिकेशी सहमत.. गिरीश देशमुख यांची स्मरणशक्ती अत्यंत तरल आणि ठणठणीत आहे. अनेक मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, शेकड्यांनी अनेक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री त्यांनी अत्यंत जवळून पाहिले आहेत आणि छायांकित केले आहेत. त्याशिवाय महाराष्टातले महनीय, थोर नेते, संत महंत पाहिले आहेत. त्यात भर म्हणजे अनेक साहित्यिक, नाट्य चित्रपट कलावंत, गायक गायिका देखील आहेत. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शासकीय निमशासकीय समारंभाचे गिरीश महत्वाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या विविध प्रकारच्या आठवणी, गमतीसह दुर्मिळ छाया चित्रांसह आणि समृद्ध लेखनासह छानपैकी पुस्तक प्रकाशित केले तर तो एक चांगला संदर्भ ग्रंथच तयार होईल. यादृष्टीने प्रकाशन व्यवसायात यशस्वी भरारी मारणा-या माध्यम सम्राट देवेंद्र भुजबळ यांनी जरूर विचार करावा आणि या बाबतीतल्या अनेक प्रकारच्या समन्वयासाठी आमचे उत्साही सहकारी श्री निरंजन राऊत यांनी आणि त्यांच्या मदतीसाठी सहकारी मित्र परिवारांनी पुढाकार घ्यावा असे मला सुचवावेसे वाटते. प्रथम गिरीशने आता लेखनाला त्वरीत सुरुवात करावी…
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
४.
“आई तू लढ लढाई” कविता अत्यंत हृदयस्पर्शी. कवयित्री ला माझा सलाम.
— रणजितसिंह चंदेल.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ
५.
सरजी, पोर्टल अप्रतिम आहेच कारण यातील महत्त्वपुर्ण माहिती सर्वांना उपयोगी तसेच बोधक विचार लेख, कविता वजा माहिती सर्वांगाने परिपुर्ण आहे. परंतू पेपरच्या माध्यमातून बातमीपत्र आले तर भविष्यात खुप मोठी मागणी असेल असे मला वाटते. विषेश पोर्टल तेवढेच दमदार आहे वाचक डोक्यावर घेतात याचे कारण सार्वभौम माहिती देत असल्याने कधी पोर्टल वाचावयास मिळेल अशी उत्सुकता जाणवते. होय, आपली मेहनत फळास मिळेल जे आज कष्ट घेत आहात उद्याचे भविष्य उज्ज्वल आहे कारण जोडलेली मित्रमंडळी प्रत्येक खेडेगाव ते शहर व्यापलेली आहे हीच खरी ती जमेची बाजू आहे.
पुढील प्रगतीस हर्दिक शुभेच्छा.
आपला
— खंडू रघुनाथ माळवे.
तथा डॉ खं र माळवे-खरमा. मुंबई
६
माधुरी ताई आणि आईचे अभिनंदन ..शुभेच्छा
राधिका ताईंचे..आण्णा गद्रे सारखे व्यक्ति पूर्वी फार दिसत ..वर्णन आवडले.
डॉ आठल्ये यांची कविता सुरेल आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई
७.
अरुणाताई, खूप सुंदर लेख लिहिला आहेत .🙏😊
— सौ मृदुला राजे. जमशेदपूर
८.
‘रुची’ म्हणजे एखाद्या गोष्टीत असलेला ‘रस’ किंवा ‘आवड’. ‘रुची’ या शब्दाला ‘अभि’ हा उपसर्ग जोडला असता, ती विकसितावस्थेकडे झुकते. नाट्य, लेखन, चित्रकला, समीक्षण, शास्त्रीय संगीत, गायन-वादन, शिल्पकला, इ. कलांमधून मिळणारा कलात्मक आनंद जोपासण्यासाठी सर्वप्रथम ‘रुची’ हा घटक महत्वाचा ठरतो. या सर्व कलांचं परमोच्च शिखर गाठण्यासाठी कलोपासकांना ‘अभिरुची’च्या जान्हवीत यथेच्छ विहार करणं भाग आहे.
याच विषयावरती वाचकांचं लक्ष केंद्रित करणारा व लेखक, संपादक श्री. देवेंद्रजी भुजबळ यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेला ‘सुरेल, सुचित्र अभिरुची जोपासना’ हा वृत्तांतवजा लेख नुकताच वाचनात आला. उत्तन येथील ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या त्रिदिवसीय अभिरुची जोपासना कार्यशाळेत सरांना प्राप्त झालेला अभिरुचीसंपन्नतेचा रसडोळस अनुभव म्हणजे कलेच्या माध्यमातून साजरा झालेला ‘आनंदोत्सव’च जणू. कलेच्या विविध शाखेतील मुरब्बी मंडळींकडून कार्यशाळेत प्राप्त झालेलं हे मार्गदर्शन निश्चितंच मोलाचं असून, भावी पिढीच्या कलाभिरुचीला वृद्धिंगत करणारं देखील आहे. आजच्या काळात अशा कार्यशाळा भरवण्याची आवश्यकता तर आहेच परंतु त्यात सहभागी कलोपासकांची संख्या सुद्धा तितकीच वाढायला हवी. हेच सर्वार्थानं ‘अभिरुची’ला अभिप्रेत आहे.
— प्रियांका शिंदे जगताप, कॅनडा
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800