Sunday, October 19, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी
उद्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उद्या आपण विशेषांक प्रकाशित करीत आहोत, तो आपल्याला आवडेल अशी आशा आहे.
गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
सर्व लेखक, कवी आणि वाचकांचे मनःपूर्वक आभार.💐
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक

छंद झाला उद्योग….
छान लिहिले आहे। एक नवीन घरगुती उद्योगाचा परिचय करून दिला। इतरांना प्रेरणा देणारे लिखाण। अभिनंदन
– राजेश राजोरे

आम्ही यवतमाळकर…
यवतमाळचे रेखाटन अप्रतिम
– विलास कुडके

करिअरसाठी पर्याय असावेत – देवेंद्र भुजबळ
भुजबळ सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे. करिअर चे इतके पर्याय नक्कीच युवकांच्या विचारांच्या क्षितिजांना अधिक विस्तारित करतील.
धन्यवाद भुजबळ सर🙏🏻
डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका

नमस्कार
करिअर कट्टा मध्ये आदरणीय श्री भुजबळ सरांनी फार सुंदर मार्गदर्शन केले आणि ते आजच्या तरुण पिढीला आवश्यक आहे आणि त्यात सरांनी आपला स्वतःचा आयुष्याचा प्रवास कसा केला ते अनुभव सांगितलं.
फार सुंदर माहिती आहे त्याच्या फायदा आजच्या तरुण पिढी ने घेवून आपल्या स्वतःच्या आयष्य सुधारण्यास मदत होते.
आदरणीय भुजबळ सरांचे आणि शेषराव वानखेडे सरांचे खूप खूप आभारी आहोत.
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.

करियर कट्टय़ावरील, करियरचे अनेक पर्याय देवेंद्र सरांनी आजच्या युवकांसमोर, अगदी सोपे करून मांडले होते. व ते वानखेडे यांनी संकलित करून वाचकांसमोर सादर केले.खूप आभार !
– विजयकुमार कुलकर्णी

करिअरसाठी पर्याय असणे आवश्यक आहे. केवळ आयएएस, आयपीएस, हेच जीवनाचे अंती मध्ये अंती मध्ये अंतिम ध्येय नसावे. आय. ए. एस. झालो म्हणजे सर्वकाही झालो असे म्हणता येणार नाही. कारण अशा उच्च पदासाठी सर्वांचीच निवड होईल हे सांगता येणार नाही. तेव्हा आपण इतरही खूप महत्त्वाचे अभ्यासक्रम समाजात आहे. आपण खूप तपशीलवार मध्ये करिअरचे अनेक पर्याय चांगल्या प्रकारे सांगितले आहे. शेषराव वानखेडे यांनी खूप चांगली माहिती संकलित करून सादर केली आहे त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन…
– विलास बाबुराव सरोदे

क्रांतिदिन : पडद्याआडचं नाट्य,
बातमीदारी करताना
Informative and important article by
Prof. ( Dr.) Kiran Thakur. Thanks to him
for this article, useful to all people as well as students of Journalism/Communication.
– Vijaykumar Ganesh Kulkarni

दिव्यांगांची दिव्यार्पण मॅरेथॉन
खुपच सकारात्मक आणि उत्साहवर्धक वाटले
असेच रंगीबेरंगी सुंदर जीवन त्यांना लाभो ही इश्वरचरणी प्रार्थना🙏🙏
– सुजाता येवले

रणरागिणी कांचन दोडे
कांचन ताई दोडे यांचे कार्य खरेच थोर आहे. कित्येकांचे आयुष्य त्यांनी मार्गी लावले आहे. किती स्त्रियांना उध्वस्त होण्यापासून वाचवले आहे. खऱ्या धडाडीच्या आहेत. त्यांचा मार्ग खडतर आहे पण त्या जिद्दीने तेथे ठाम आहेत.
एक काळ होता की स्त्रिया अबला होत्या. आता कांचन सारख्या समाजसेविका त्यांना हिम्मत देतील तर त्याही अन्यायाविरुद्ध तलवार उपसतील.शब्दांनाही धार असते. योग्य वेळी योग्य गोष्टीचा उपयोग करावा लागतो.

दिव्यांगांची marathon पाहून आम्हाला उत्साह वाटला.या काळात सुध्धा किती सकारात्मक विचार असू शकतो त्यांच्या मनात!
ही दिवाळी त्यांच्या रंगीत पणत्यांनी उजळून जावो.
– मेघना साने

दिव्यांगांची दिव्यार्पण मॅरेथॉन 👌

अभिनंदन कांचन ताई यांचे आणि शुभेच्छा
– रवींद्र तोरणे

ओठावरलं गाणं
शान्ता शेळके यांच्या आपण रसग्रहण केलेल्या गाण्याचा खरंतर विसरच पडला होता. आपल्या रसग्रहणाने गाणे आठवणीत आले.रसग्रहण फारच भावले.
– आशा लिंगायत.

क्षण अभिमानाचा…
सप्रेम नमस्कार विनंती विशेष असे की,नाशिक मधील पोलिस अकादमी च्या माध्यमातून बायो डायव्हरसिटी पार्क उभारून रिंग बेडचा वापर करून सुमारे दोन लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करण्याची किमया केली आहे. त्याबरोबरच विविध वृक्षारोपण करून पर्यावरणबरोबरचं जैव विविधता चे रक्षण करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. सदर काम कोरोना काळातही सक्षमपणे केल्याबद्दल सर्व स़बंधित विभागाच्या विभाग प्रमुख आणि सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
‌‌आपलाच शुभेच्छूक,
– राजाराम जाधव, उलवे, नवी मुंबई,

मूकक्रंदनात….
सुंदर कविता
– विराग भावे

खूप छान उलगडून सांगीतलं. हळवी कविता आहे
खूप छान रसग्रहण
– विवेक भावे

शांता शेळके यांनी या गाण्यांमध्ये ‌‌‌”एकला चलो रे” ही भावना व्यक्त केली आहे. एका. चांगल्या गाण्याचे आपण केलेले रसग्रहण सुध्दा चांगले झाले आहे. पुन्हा एकदा विस्मृतीत गेलेले चांगले गाणे ओठावर गुणगुणण्याचा योग आला. छान.
डाॕ. अंजुषा पाटील

एकटेच येथे येणे एकटेच जाणे या शांता शेळकेंच्या काव्य पंक्तीतून जीवनातल्या अनुभवांचे पदर उलगडून दाखवले आहेत.
शेवटी आपणचं आपले असतो. कधी कधी एकांत सुद्धा छान वाटतो.
फक्त तो आपण स्विकारला पाहिजे.
मग त्याचा त्रास होत नाही. छान रसग्रहण.
– गौरव हजारे

नमस्कार मित्रांनो,
डॉ. पंजाबराव देशमुख आएएस् अकादमी अमरावती च्या माध्यमातून २१ वर्षांपूर्वी रोवलेल्या रोपट्याचे आता डेरेदार वृक्षात रूपांतर होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी अनेक मान्यवरांच्या सहकार्याने आणि डॉ कठोळे परिवाराच्या सततच्या पुढाकाराने आज अनेक ज्ञानवंत, यशवंत विद्यार्थी अनेक पदांवर निवड व नियुक्ती झाली आहे ही गोष्ट या संस्थेच्या वाटचालीत निश्चितच स्पृहणीय आहे.

मिशन आयएएस : नाबाद २१…..
महाराष्ट्रातील डॉ. पंजाबराव देशमुख आएएस् अकादमी संस्थे सारख्याच इतर अनेक संस्थांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडताना अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धा परीक्षांसाठी इच्छित उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अशा सर्व संस्थांना आणि या महत्वपूर्ण कामगिरीसाठी राज्याचे मिशन आयएएस चे समन्वयक सन्मा. देवेंद्र भुजबळ साहेब यांचे आणि सर्व संबंधित अधिकारी व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
– राजाराम जाधव,

Very Inspiring work for all the younger Generation.
– Dr.T.N.Lokhande

देवमाणूस उद्योजक चंद्रकांत शेटे
त्यांच जीवन खरोखर आनंद देउन जाते
देवेंद्र लाखोले, नेरुल

एकटीच या वळणावर…..
नमस्कार मित्रांनो,
समाजातील विधवा आणि उपेक्षित महिलांनी त्यांच्या जीवनात आलेल्या एकटेपणाला मोठ्या धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देणारे “एकटी या वळणावर” हे डॉ. शारदा महांडुळे यांनी लिहिलेले पुस्तक कथासंग्रह अतिशय प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. डॉ शारदा महांडुळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
– राजाराम जाधव

“विकास मित्रांचा अभ्यास दौरा” ही संकल्पना घेऊन विविध वयोगटातील आणि क्षेत्रात काम करणाऱ्या पांच मित्रांनी एकत्र मिळून आपल्या राज्यात अनेक कारणांमुळे प्रसिद्धीस आलेली अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या दोन गावातील कर्ममहर्षि अण्णा हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परिसरातील अनेक सामाजिक वनीकरण व इतर विकास कामांचा आढावा घेऊन अशी विकास कामे आपल्या गाव परिसरात आपल्याला करता येईल काय ? असा मनोदय घेऊन अशा विकसीत कामांचा अभ्यास दौरा आयोजित करणे ही नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यामुळे समाजातील अनेक तरुणांना व कार्यकर्त्यांना अशा अभ्यास दौ-यांचे आयोजित करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात ज्या पांच विकास मित्रांनी हा अभ्यास दौरा काढल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या भविष्यातील चांगल्या उपक्रमासाठी शुभेच्छा !!
शुभेच्छूक,
राजाराम जाधव, उलवे, नवी मुंबई,

विकास मित्रांचा अभ्यास दौरा या शीर्षकाखाली सर्व विकास व विकासाभिमुख मित्रांनी एकत्र येऊन नुकताच स्वखर्चाने अभ्यास दौरा केला सदर दौऱ्यात अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार विकास तीर्थांना भेटी दिल्या याचा आनंद वाटतो आहे. आपापल्या परिसराच्या विकासासाठी नक्की काय करता येईल याची सर्वांना प्रेरणा मिळाली आहे हाच सर्वांचा फायदा आहे.
– विलास बाबुराव सरोदे

चंद्र’भेगा
खूप भाव स्पर्शी कविता
अजून चांगली तुम्ही लिहू शकता

हळूवार हाताळ जरा….
सुकू (सुचिता कुलकर्णी)
किती कमी कविता पण सगळ्याच सुंदर
मला गर्व वाटतो तुझा .असेच लिहित रहा.
– विलास कुलकर्णी

देवमाणूस उद्योजक चंद्रकांत शेटे
अण्णांचा हा अखंड प्रेरणादायी प्रवासाला सलाम, आम्हाला पण प्रेरणा मिळाली, फार छान वाटले अण्णांचा जीवन प्रवास आम्हाला ऊर्जा देणारा आहे
– युवराज सदाशिव टंकसाळे

देवमाणूस उद्योजक चंद्रकांत शेटे
होय खरंच देवमाणुसच आहेत आण्णा. त्यांनी त्यांच्या व्यवसाया बरोबर आपल्या समाजकार्याच भान ठेवून समाज बांधवाना व्यवसाया आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही आज त्याच धंद्यात आहोत. त्यांना शतशः नमन.👏
– सुरेंद्र मांगले. कांदिवली, मुंबई

खुपच छान लेख वाचणेस मिळाला !!
शेटे आण्णा यांचा जीवनप्रवास वाचून खरोखरच छान वाटले. त्यांचे जीवन प्रेरणादायीच आहे. आण्णा सतत हसतमुख असतात व समाजकार्याचे वेळी देहभान विसरून काम करतात.
शेटे आण्णा यांना मानाचा मुजरा !!!
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छूक
–  मदन कोकीळ, कराड .

हळूवार हाताळ जरा
अप्रतिम रचना आहे👌🏻👌🏻
खरोखर अशी किती चित्रे, जपून ठेवावीत…मनात…आणि हळूवार हाताळावीत… मोरपीसांसारखी
चौथे कडवे फार तरल आणि सुंदर !
मनापासून आभार इतक्या सुंदर रचनेसाठी 🙏🏻
– डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका

आण्णांविषयी भरपूर ऐकून होते. आज मात्र त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास वाचून खरोखरच छान वाटले. प्रेरणादायी जीवन. अण्णांना मानाचा मुजरा व खुप खुप शुभेच्छा.
– सौ भारती खुटाळे

नमस्कार मित्रांनो,
गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने श्रीमान देवेंद्र भुजबळ साहेबांच्या कल्पक संपादनातून या जगप्रसिद्ध कवी, लेखक, निसर्ग चित्रण करणारे महान चित्रकार, शांतीनिकेतनचे महामहीम, “गीतांजली या महान काव्यरचनेचे” रचनाकार ज्यामुळे या काव्य रचनेला जागतिक स्तरावरील नोबेल पारितोषिकने सन १९१३ मध्ये सन्मानीत करण्यात आले. ज्यांच्या अद्भूत लेखणीतून आपले “जनगणमन” हे राष्ट्रगीत प्रसवले, अशा महान देशभक्तांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या विविधांगी कार्याला नतमस्तक होऊन आदरांजली अर्पण करतो.
– राजाराम जाधव,

खरंच देवमाणूस. खडतर प्रवास करून शुन्याला महत्व प्राप्त करून, तळमळीने समाज कार्य करण्याची भावना, साक्षात दंडवत ! खूपच छान लेख वाचावयास मिळाला.
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.

डॉ. जोशी आपण नोकरदार महिलांना त्यांच्या नवजात बालकास, आईचे दूध म्हणजे अमृत आहे, हे पटवून हक्काची रजा मिळवून दिलीत.आपल्या कार्यास मनापासून सलाम।
– सौ वर्षा भाबळ

शेटे आण्णा हे कासार शिरंबे गावचे एक अनमोल रत्न आहेत, स्वछ्य आणि गंगेसारखे निर्मळ मन असलेले ते एक देवस्वभावी व्यक्ती,सतत हसतमुख आणि उत्साही असणारे आण्णा देहभान विसरून समाजकार्य करतात
त्यांना कालिका माता उदंड आयुरारोग्य आयुष्य देवो ही नम्र प्रार्थना
– सुनील पाटील

चंद्रकांत शेटे यांच्याविषयी ऐकून होते पण आत्ता जे सविस्तर कळले ते वाचून नतमस्तक झाले. उत्तुंग व्यक्तिमत्त्व. आणि पत्नी, सुनां चेही कौतुक की एक व्यवसाय उत्तम असताना आराम, चैन करण्याची सोडून स्वतःचा दुसराच व्यवसाय सुरू करून तो यशस्वी केला. शेटे कुटुंबास सलाम. भारतात आले ki त्यांना भेटायला nakki आवडेल आणि देवेंद्र जी यांचे आभार की त्यांनी yanchi ओळख करून दिली.

आईचं दूध….
डॉ. अर्चना आणि डॉ.हेमंत जोशी फार मोठे कार्य करीत आहात. अनेक बालकांचा दुवा तुम्हाला असेल. ALL THE BEST FOR FUTURE WORK.
Congratulations Dr. Sharada !
– नीला बर्वे, सिंगापूर

साप आपला सखा‘ सुंदर लेख आहे. मात्र आपल्या देशातील अंधश्रद्धाळू लोक सापाला दूध पाजतात, जो कधीच दूध घेत नाही. धार्मिक कर्मकांडाच्या नावावर अंधश्रद्धा पसरवणे संविधानाच्या अनुच्छेद 51A(8) नुसार अवांछनीय आहे.
– भि म कौशल, निवृत्त माहिती संचालक, नागपूर

“साप आपला सखा “हा लेख वाचला. काही उपयुक्त माहिती मिळाली.
“हिरवे प्रेम” ही कविताही उत्तम आहे.
हिरवाईच्या दूर दूर वाटा
जशा सावलीच्या पाऊलवाटा….!!
खुप छान
– अरुण पुराणिक, पुणे.

वर्षा फाटक यांचा लेख आवडला जुन्या आठवणी जाग्या झाल्या.धन्यवाद..🌹
– सुधाकर धारव, निवृत्त माहिती उपसंचालक, यवतमाळ

देवेंद्रजी,
माझ्या काय कदाचित सर्व सदस्यांच्या
लक्षात आले आहे की कासवाच्या
गतीने का होईना पण
News StoryTodayची घोडदौड International
News Story Todayच्या दिशेने कधी झाली हे लक्षात आलेच नाही. आता हा “अश्वमेध” कोणी थांबवू शकणार नाही. सर्व N S T प्रमुख संपादक श्री देवेंद्रजी भुजबळ सह संपादिका सौ अलकाताईं भुजबळ आणि अर्थातच
देवश्री भुजबळ आणि इतर सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन सर्व रसिक, अभ्यासू आणि चोखंदळ वाचकांना ही बाब अभिमानास्पद आहे.
– प्रकाश पळशीकर, नोएडा

प्रिय मित्र
राजाराम जाधव, खिंडलाखकर यांच्या व्यक्तिमत्त्वा विषयी दोन शब्द आयुष्यातील तब्बल ३३ वर्ष लाल दिव्याचा गाडीत बसलेला एक प्रशासकिय अधिकारी तेवढ्याच उत्साहाने आजही पूर्वीसारखाच गावातील हनुमान मंदीराच्या धुळीने माखलेल्या ओट्यावर बसून तरूण मंडळी सोबत ग्राम विकासाच्या कामाची आखणी करतो, असं सांगितलं तर कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण हे एक दुर्मिळ सत्य आहे.
दारव्हा तालुक्यातील एका छोट्याशा गावचा मुळ रहिवासी आणी माझ्या सुखदुःखाचा सहभागी माझा परम मित्र तोच हा एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा धनी राजाराम गोबरा जाधव नुकताच त्यांनी पोस्ट केलेला  “आम्ही खिंडलाखकर” हा त्यांचा ब्लॉग मी वाचला. त्यांच्या संपूर्ण जीवन शैलीचा आलेख वाचून मी अक्षरशः भारावून गेलो. आपल्या जन्मभूमी वर असणारं प्रेम, काळ्या मातीशी जुळलेलं नातं, मित्र मंडळी सोबत आजही असणारा तोच खेळकर भाव, वडिलधाऱ्या जेष्ठांसोबत असणारा आदरभाव, शालेय जीवनातील संस्कारक्षम गुरुजनांविषयी असणारी कृतज्ञता हे सारे गुण त्यांच्यात नियतीने उदार हस्ते भरलेले आहेत.
माझा त्यांचे सोबत असणारा मैत्री संबंध हा इयत्ता ११ वी मध्ये शिकत असताना जुळला. त्या वेळी तो जसा खेळकर आणि जिव्हाळ्याचा होता तसाच तो प्रशासकिय अधिकारी असताना आणि आज सेवानिवृत्तीनंतर सुध्दा तसाच आहे. अत्यंत बेताच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगत असता त्यांचे पाय जसे जमिनीशी संलग्न होते तसेच लाल दिव्याच्या गाडीतून फिरतांनाही होते. उच्च पदावरून जीवनाची गरुडझेप घेतांना शेतशिवारातील काळ्या मातीचा आणि अठरा विश्व दारिद्र्यात जगत असलेल्या मित्र मंडळीचा त्यांना कधीच विसर पडला नाही. माझ्या शब्दात मी एवढंच म्हणेन

“माणुसकीचा मागोवा घेत–
आयुष्याच्या खडतर वळणावर
हसत खेळत मार्गक्रमण करणारा
एक जगावेगळा जीवन प्रवासी
म्हणजे राजाराम जाधव ”

त्यांचा आदर्श जीवनपट हा आधुनिक काळातील युवा पिढीला उत्कृष्ट मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे. आजचा समाज हा पाश्चात्य संस्कृतीने पछाडलेला आहे. एकत्र कुटुंबपद्धती, आई वडिलांची सेवा, श्रेष्ठांचा आणि गुरुजनांचा आदर ह्या संकल्पना फक्त कवितेत लिहिण्या पुरत्याच उरल्या आहेत. अशा समाज व्यवस्थेत प्रवाहा विरुद्ध जाऊन द्या, क्षमा, शांती समाधान, आदरभाव आणि मातापित्यांची सेवा अशी जीवनमूल्ये जोपासणारा राजाराम जाधव सारखा पुल. चा “वल्ली” आता विरळाच म्हणावा.
त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🙏🏻

क्षमा शांती समाधान
या सारखे नाही धन
पदरी ज्याने बांधले
तोच खरा धनवान ||
– रामदास घुंगटकर, पुसद

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप