Friday, December 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
कामाच्या वाढत्या व्यापामुळे, यावेळी वाचक लिहितात…. सदर प्रसिद्ध करण्यास विलंब झाला, या बद्दल क्षमस्व. पुढे गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया देत आहे.
क्रिसमसच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)

राधिका भांडारकर लिखित, “माझी जडणघडण” भाग २८ वर प्राप्त झालेले अभिप्राय पुढील प्रमाणे आहेत.

छान आणि सगळं खरं खरं लिहिलं आहेस. या लेखामुळे तुझ्या मनातील विचारही स्पष्ट झाले.तुझा हा लेख वाचतांना त्या रम्य भूतकाळात मी अगदी रमून गेले होते.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

मनात राहिलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची आठवण तर कधी खंत लेखातून समजून येते..
— उज्ज्वला सहस्रबुद्धे. पुणे

राधिका ताई,
एक अरुणा म्हणजे सकाळी सकाळी अरुण उगवता अर्थातच सूर्य उगवताच पसरते ती लाली आणि दुसरी संध्या म्हणजे संध्याकाळची वेळ. किती दोघांमध्ये विरोधाभास ! एक सकाळची लाली आणि दुसरी संधिकालाची शेंद्री रंग ओढलेली संध्या.. तरीही दोघांमध्ये अतूट नातं जरी मावस बहीण असली तरीही ती सख्ख्या बहिणीसारखी तुमच्यात राहिली आणि हा विरोधाभास असूनही दोघांमधले एकमेकांसाठीच प्रेम हेच दाखवतं की त्यांचं नातं किती अतूट असू शकते..
संध्या आणि अरुणा दोन मौल्यवान मोती.. किती छान लिहिले तुम्ही.. त्या दोघींनी कोरलेलं एक वलयांकित नातं तुम्ही खूप सुंदररित्या आमच्यासमोर मांडलं आहे … त्या वलयातून तुम्ही त्या नात्याला बाहेर काढून आमच्यासाठी खुले केले…
घरी बसल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स कर्णफुले बनवून देतात हे आजच कळलं..

दोघींचा सुंदर फोटो सुद्धा तुम्ही सोबत पोस्ट केला आहे. त्या काळचं वर्णन तुम्ही खूप छानरित्या आमच्यासमोर मांडतात जेणेकरून आम्हाला अगदी 30 /40 वर्षे मागे गेल्याचा भास होतो..
आम्ही पण तुमच्यासोबत त्या आठवणींमध्ये रमतो आणि प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या नात्याला आम्ही आमच्या नात्याची जोड लावतो आणि वाटतं जसं काही आपल्यासोबत सुद्धा घडलेलं आहे…

अरुणा आणि संध्या या दोन मध्ये जे अंतर आहे ते दुपारचे.. आणि ह्या दुपारच्या उन्हातील काही चटके लावून जाणाऱ्या तर काही सुखावणाऱ्या आठवणी तुम्ही आमच्या समोर मांडल्या .. खरंच वाचायला पण खूप मजा आली ..एक वेगळं नातं अरुणा आणि संध्या मध्ये सुद्धा असू शकतं हे आजच कळलं.. खूप छान..

उगवतीच्या रंगात मिसळलेली अरुणा सांज होता होता संध्याच्या रंगात रंगली जाते आणि हे विरोधाभासी नातं एक वेगळच रूप धारण करतं आणि ते तुमच्या लेखणीतून बहरलं.. पुढील भागाच्या प्रतीक्षेत..
— सौ मानसी म्हसकर. वडोदरा, गुजरात

‘ताई आणि संध्या’ यातल्या ताईला मी ब-यापैकी ओळखते आणि संध्याबद्दल तुझ्याकडूनच ऐकून होते. मावशीने संध्याला पहिले कन्यारत्न असूनहि आजोबांकडे का ठेवावं आणि ताईनेही अकरावीनंतर तिथे कसं काय रमावं ? ही प्रश्नचिन्ह मनात निर्माण होणं,तसंच आपल्या धोबी आळीतल्या घराबद्दलची ओढ, सामान्य परिस्थिती आणि थोडी ‘हटके’ जीवनशैली यात ‘रक्ताच्या ओढी’ला दिलेली प्राथमिकता तुझ्या आयुष्यातले प्राधा न्यक्रम आणि संवेदनशीलता दाखवणारे आहेत. उषा-निशांच्या जन्मानंतरही ‘रक्ताच्या नात्यातली शक्ती’, ‘अरुंद भिंतिंना रुंद करून सामावून घेण्याचं एक दिव्य मानसिक बळ’ ही शब्द योजना विशेष परिणामकारक ! अशा परिस्थितीत जिजीचं कुटुंबाच्या मागे पहाडासारखं उभं रहाणं, सगळंच नाट्यमय आणि भावुक करणारं !
तुझं लिखाण वाचून नेहमीच वाटतं,”साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे”.
— साधना नाचणे. ठाणे

बिंबा (राधिका) कसली भन्नाट लिहीतेस ग तू 👍🏼 ! वाचायला सुरुवात केली‌ की उत्सुकता असते …पुढे काय ? तुझ्या संध्याच्या व्यक्तीचित्रणातून डोळ्यासमोर उभी राहिली. अरुणाच्या‌ दिसण्या आणि हुशारीबद्दल तेव्हांही आम्हाला कौतुक वाटायचं. (तूही हूशारच हं👍🏼)
तुझी जडणघडण लेखमाला खूप intresting होत चाललेय.
Love you 😌
— अलका वढावकर. ठाणे

सुंदर शब्दांकन. शेवटच्या परिच्छेदात तुम्ही तुमची जडणघडण अगदी सहजपणे थोडक्यात मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अगदी सुरेख मांडली आहे ताई. 👌🙏😊
— अस्मिता पंडीत. पालघर

बिंबा, (राधिका) अप्रतिम !!
“अरूंद भिंती रुंद करून त्यात सामावून घ्यायचं बळ असतं!”
अप्रतिम वाक्य !
खूपच छान लिहिले आहेस.
ताई आणि संध्या एक धबधबा तर दुसरी संथ वाहणारी नदी !
— आरती नचनानी. ठाणे

ताई आणि संध्या दोघींचे सुरेख वर्णन केलयस कि डोळ्यापुढे उभ्या राहतात.
— रेखा राव. मुंबई

Bimba, (राधिका) many times I know the people u write about. It is so much fun to read about them. Sandhya, Aruna, these names were never taken like Sandhya n Aruna. Always together. Both were so pretty. But I used to like Aruna more. Khoop maja Ali wachayla.👌🏻👏👏👏
— संध्या जंगले. मुंबई
१०
फार सुंदर कलाटणी दिली आहेस. सगळं कितीही सोनेरी असले तरी तुझ्या मनातला तो सल किंवा काटा तू व्यक्त केलास. मी लहान होते, म्हणून मला इतके प्रश्न पडत नसावेत.
मला इतकच आठवतय की ताई घरी आल्यावर आजोळच्या गमती जमती सांगायची, बोलून बोलून तिचा घसा बसायचा पण गप्पा संपायच्या नाहीत.
तिला आपल्याशी खूप खूप बोलायचं असायचं.
— अंजोर चाफेकर. मुंबई.

माधुरी ताम्हणे यांच्या “माध्यम पन्नाशी” वरील अभिप्राय …

माधुरी खूप खूप सुंदर! तू खूप छान लिहितेस.
जिवंत चित्रण असतं तुझ्या लेखनात!
तुझा प्रत्येक लेख हा ट्रिट असतो आमच्यासाठी.
ऑल द बेस्ट.
— उल्का गोळे. अहमदाबाद

माध्यम पन्नाशी अतिशय सुरेख!
— गोविंद गुंठे.
निवृत्त केंद्र संचालक, नवी दिल्ली

माध्यम पन्नाशी मस्त!
— श्रीकांत खानोलकर. ठाणे

बापरे ! काय काय दिव्यातून गेलेस तू !सगळा प्रवासच कठीण होता आणि तेही इतक्या लहान वयात !
या प्रवासात एक एक परीक्षा देत देत वर वर चढत गेलीस. तेही कोणावरही न रागवता आणि उगाचच खंत ही न बाळगता. धन्य आहे तुझी. कमालीची चिकाटी आहे तुझ्यात !
मला तुझे लेख वाचायला खूप आवडतात. अशीच खूप खूप प्रगती कर.
— श्यामा कुलकर्णी. ठाणे

सौ. माधुरी ताईनी त्याकाळी दूरदर्शनच्या पडद्यामागील वास्तवाचे अतिशय प्रभावीपणे दर्शन घडवले आहे. त्यांच्या कार्यावर आणि कलेवर अन्याय झाला. तरीसुद्धा प्रचंड ज्ञान, अनुभव, आत्मविश्वास आणि अथक परिश्रमामुळे तरुण संचालिका म्हणून त्या उत्कृष्ट ठरल्या. त्यांच्या योगदानाचे कौतुक करायला हवे. पण त्याऐवजी अन्यायकारक परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागला. तरीही त्यांच्या संस्कारी बंधनांनी आणि आईच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. त्यांचे सुंदर लेखन आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या थेट अंतःकरणाला भिडते. त्यांनी असेच लेखन करून आम्हा सर्वांना नवीन दृष्टिकोन आणि माहिती देत राहावे. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
— चंद्रकुमार मधुकर देशमुख. मुंबई

बापरे, काय अनुभव ग !
शहारे आले. खरंच आपल्या आई-वडिलांच्या संस्कारांमध्ये केवढी ताकद होती ! नेहमीप्रमाणे छान लेख.
— अंजली चौबळ. पुणे

माध्यम पन्नाशी आत्ताच वाचले. खूप सुंदर लिहिता तुम्ही. तुमचे सगळे लेख मी वाचते. मला ते खूप आवडतात.
— शुभांगी थबडगाव. ठाणे

आकाशवाणी, दूरदर्शनच्या प्रवासावरून आपलं व्यक्तिमत्व कसं घडलं याच छान चित्रण आपण उभं केलं आहे. पदोपदी आलेले अनुभव व त्यातून घडलेले प्रसंग आपण छान मांडलेत.
प्रसंगी असे कणखर व्हावे लागते हेच खरे !
सुहासिनीबाईंसारख्या कडक शिस्तीच्या व्यक्तीपुढेही आपण सडेतोडपणे आपली प्रतिक्रिया दाखवली. त्यातून आपला कणखरपणा दिसून येतो. खूप छान लेख! खूप आवडला. दुसऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असाच लेख आहे.
— मो .र .अंजारिया. कळवा, ठाणे

‌ तुझा प्रत्येक लेख खूप छान.
— जयश्री साने. ठाणे
१०
तुमचा लेख पूर्ण वाचला. खरंच किती अवघड प्रसंगातून तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यश मिळवले आहे. खूप कौतुक आहे. पण खरं सांगू ? यामधून मिळणारे मानसिक समाधान खूप महत्त्वाचे असते.
— आशा शिंदे. पुणे
११
भन्नाट अनुभव. मस्त लेख. दणादण वाचून काढला.
— शौनक ताम्हणे. तळेगाव – पुणे
१२
लेख खूप आवडला. पुढे काय झालं ?
याची उत्सुकता आहे.
— प्रशांत देशपांडे. दादर-मुंबई
‌१३
‘माध्यम पन्नाशी” खूप सुंदर ! तुझे किती निरनिराळे अनुभव वाचायला मिळतात. त्यामुळे मीच अनुभव संपन्न होते असं वाटतं !
— केतकी कर्वे. ठाणे
१४
त्यावेळची माणसे उंच होती. विचार आणि कृतीने ! प्रमिला दातार यांनी सासूबाई आणि सहकलाकाराच्या पत्नीचा सन्मान केला. ओघवत्या शैलीत व्यक्त होणारा तुमचा हा लेखन प्रवास खूप छान होतोय.
— अशोक मुळे. डिंपल पब्लिकेशन, वसई
१५
मी “माध्यम पन्नाशी” नियमित वाचते. अतिशय उपयुक्त आणि माहितीपूर्ण सदर.
— मंगलताई गुप्ते. ठाणे
१६
प्रमिला दातार आजही तेवढ्याच सुरेख ! माणूस म्हणून अत्यंत आदरणीय आणि आवाजही तितकाच सुरेल! ऐकत राहावं असा !
लेख फारच सुरेख आहे. सुहासिनी मुळगावकरांचा वेगळा लोभसवाणा चेहरा समोर आणलास.
— लता विंझे. दादर, मुंबई
१७
अत्यंत सुंदर मस्त अनुभव ! बरंच काही शिकवणारा. तुझ्या लेखांमुळे माध्यमांचं जग प्रथमच कळतंय!
— सुरेखा देशपांडे. ठाणे
१८
तुम्ही खूप छान लिहिलं आहे. प्रत्येक लेख वाचनीय!
— अजित महाडकर. ठाणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९