नमस्कार मंडळी.
या वर्षाचा आजचा हा शेवटचा दिवस.
उद्या पासून सुरू होणाऱ्या नवंवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
जाता जाता या वर्षाने दिलेला फार मोठा धक्का म्हणजे आपल्या पोर्टल चे नियमित लेखक, मार्गदर्शक आपले प्रा डॉ किरण ठाकूर सरांचे अचानक झालेले निधन होय. गेल्या चार वर्षांत आम्ही दोघेही खूप जवळ आलो होतो. त्या विषयी, मी माझ्या कालच्या लेखात लिहिले आहेच. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
आता वाचू या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला
देवेंद्र भुजबळ (संपादक)
मिशन आयएएस चे संचालक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी माझ्यावर (देवेंद्र भुजबळ) लिहिलेला लेख खूप जणांना आवडला, भावला. या सर्वांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. आपले प्रेम, लोभ असाच कायम असू द्या, ही नम्र विनंती.
१
सर, काठोळे सरांनी तुमच्या व्यक्तिमत्वाचे योग्य शब्दात वर्णन केले आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तुम्ही माणसे जोडण्याचे कार्य उत्तमपणे सुरू ठेवले आहे. नोकरी, व्यवसायात सर्वच पैसे कमवतात. पण विविध क्षेत्रातील माणसे जोडतो तो खरा माणूस. हि संपत्ती फार कमी लोकांना कमावता येते सर.
तुमच्या कार्याला सलाम🙏
— गणेश जोशी. व्यंगचित्रकार, ठाणे
२
प्रा.डाॅ.काठोळेसर यांनी माणसे जोडणारा अधिकारी, हे आपल्या विषयी लिहिलेले वाचुन खुप छान वाटले सर. 🙏🙏🙏
— राजेंद्र ठाकरे, सेवानिवृत्त माहिती कर्मचारी, छ. संभाजीनगर.
३
देवेंद्र भुजबळ : माणसं जोडणारा अधिकारी ..
अतिशय सुंदर लेख आहे. हा लेख वाचून मी देखील भूतकाळात गेले 😇 जेव्हा अलका ताई व भुजबळ सरांची ओळख आमच्या आईच्या जागी असणाऱ्या आशा ताईनी करून दिली.
प्रथम बोलायची भीती वाटत होती एवढा मोठा अधिकारी …..आपण काय बोलणार….कसे बोलणार. 🤔
पण……अलका ताईनी हा प्रश्न सहज सोडवला त्या इतक्या सहजतेने बोलत होत्या जणू आमची अनेक वर्षाची मैत्री आहे. 🤗 असेच सूर जुळत गेले…..तोंड ओळख म्हणता म्हणता एक आपलेपणाची जाणीव वाटू लागली. ☺️
काही माणसं अगदी थोड्याच ओळखीत आपले होऊन जातात तशा अलका ताई जणू माझी मोठी बहीण वाटू लागली.
नंतर सरांशी लिखाणामुळे हळू हळू ओळख होत गेली माझे लेख ते संपादित करू लागले. मला वेळोवेळी मार्गदर्शन केले प्रोत्साहन दिले तू ही लिहू शकते याची जाणीव केवळ आणि केवळ सरांमुळेच झाली.
मला एक गोष्ट प्रकर्षाने या जोडी बाबतीत जाणवली की जेवढा माणूस मोठा असतो तेव्हढाच तो जबाबदार, समंजस, शांत समोरच्याला समजून घेणारा देखील असतो. कोणताही मोठेपणा अथवा गर्व नाही फक्त एकनिष्ठ व प्रामाणिक काम…..आणि हो… माणसं जोडण्याची कला ही या दोघांच्यात आहे आणि म्हणूनच न्यूज स्टोरी टुडे हे कुटुंब विस्तारले.
शिस्त प्रिय, नाविन्यता, विविधता हे पोर्टल चे यशाचे रहस्य हे धनुष्य 💪 पेललं ते या जोडीने.
अलका ताई म्हणजे सदैव वाहणारा झळा प्रचंड उत्साह, 😍🥳 जिद्ध आणि तितक्याच प्रेमळ 🫶थोड्या रागीट 😡 पण हा राग तसा फार काळ राहत नाही असा माझा स्वानुभव आपली चूक कबूल केली की पुन्हा पहिल्यासारखी निखळ मैत्री. 🤝🤝 कधी फोन करून विचारले कसे आहात तर तेथून लगेच उत्तर टका – टक 💃💃आणि हे शब्द ऐकलं की जणू मला ही दहा हत्तीचे बळ येत. 😎
तुला कधीही केव्हाही व कोणतीही मदत लागली तर मी नव्हे तर आम्ही दोघे आहोत ना…. हे शब्द मनावर कोरले गेले…. खूप मोठी जादू आहे या शब्दात जे अंतर्मनात जागा करतात… एक हक्काची… आपलेपणाची.
नाहीतर आज…. आपले माणसं सुद्धा हे बोलत नाही…..असो…
पण….ही जोडीच वेगळी….. जगावेगळी…..लेखकांना केवळ लिहितच ✒️ केलं नाही तर त्यांचे पुस्तकाचे स्वप्न 📚📚 पूर्ण केलं.
लेख संपादित केले प्रकाशित केले साथ दिली आधार दिला…. अजूनही माणुसकी जिवंत आहे याचे उदाहरण म्हणजे माझे साहित्यिक गुरू देवेंद्रजी भुजबळ व माझी मैत्रीण कम मोठी बहीण कम गुरू पत्नी म्हणजे अलका ताई.
अनेक अविस्मरणीय आठवणींचा साठा आहे जो व्यक्त करता येत नाही…..मी पुन्हा जीवन नव्याने जगले…..
तसे लिहायला खूप आहे …..अहो एक पुस्तक देखील निघेल या दोघांवर…..पण मग संपादन व प्रकाशन याची जबाबदारी कोण घेणार …..😉 आणि यांच्यापेक्षा दुसरे कोण चांगले करू शकते हा विचार करून पुन्हा मग शांत होते. 😞
भुजबळ सर व अलका ताई यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांचा हा साहित्यिक प्रवास आजन्म चालू राहो हीच शुभेच्छा.
— रश्मी हेडे. सातारा
४
सन्मा. श्री भुजबळ साहेब,
नमस्कार.
प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे सरांनी “देवेंद्र भुजबळ: माणसे जोडणारा अधिकारी” हा आपला स्वभाव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक/वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असतांंना अनेक लोकांना केलेले मार्गदर्शन, सहकार्य केले व सेवानिवृत्ती नंतरही सामाजिक भान ठेवून करत असलेल्या कामामुळे आपली ख्याती महाराष्ट्रभर आहे.
त्यामुळे डॉ काठोळे सरांनी आपल्या संदर्भात लिहिलेला “माणसे जोडणारा अधिकारी” हा लेख आजच्या न्युज स्टोरी टुडेच्या पोर्टल वाचला व तो आम्हाला खूप भावला.
डॉ नरेशचंद्र काठोळे सरांचे या खास आठवणींच्या सर्वंकष लेखाबद्दल मनापासून अभिनंदन आणि आपले व आपल्या सामाजिक कार्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपला शुभेच्छूक,
— राजाराम जाधव, निवृत्त सह सचिव, नवी मुंबई.
५
Sir
Correct narrated by Pro Dr Nareshchandra about you.
Great personality.
— Sukhdeve. Nagpur
६
“देवेंद्र भुजबळ”
माणसे जोडणारा अधिकारी “
खूप छान लेख, खरे आहे.
— प्रिया मोडक. ठाणे
७
सुप्रभात सर.. देवेंद्र भुजबळ : माणसे जोडणारे अधिकारी !! खूप सुंदर लेख आहे. मी अगदी २००% सहमत आहे या लेखाशी आणि मथळ्याशी.. माझ्यामध्ये देखील सरांमुळे एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सरांचा व्यक्तिमत्व इतकं मोठं असून देखील बोलणं तितकच मृदू आहे….. लेखांमध्ये सरांच्या नावाचा अर्थ खूप सुंदर रित्या समजून सांगितला आहे… ९० देशातील लेखकांना व वाचकांना एकत्रित जोडणारे अधिकारी…. श्री. देवेंद्र भुजबळ सरांना खूप खूप शुभेच्छा… 💐💐
— सौ आश्लेषा गान. सातारा
८.
‘माणसे जोडणारा अधिकारी’ असा निवृत्त माहिती संचालक *श्री.देवेंद्र भुजबळ* यांच्या विषयी विदर्भातील ‘मिशन IAS’ चे संचालक *प्रा.डॉ.नरेशचंद्र कोठोळे* यांचा लेख मनापासून आवडला. त्यांचा शेवटून दुसरा परिच्छेद तर अतिशय बोधप्रद वाटला. देवैंद्रच्या कर्तबगारीचे, कार्यक्षमतेच, कर्तव्यदक्षतेचे ते खरेखुरे अवलोकन सुरेख रीतीने केले आहे.
श्री देवेंद्र व प्रा. डॉ नरेशचंद्र या उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन…
— सुधाकर तोरण. निवृत्त माहिती संचालक, नासिक.
९
देवेन्द्रजी, माणसं जोडणारा अधिकारी म्हणून डॉ. नरेशचंद्रांनी आपल्या सद्गुणांची करून दिलेली ओळख भारावून टाकणारी तर आहेच पण असेही आय ए एस अधिकारी आहेत याचा आश्चर्ययुक्त अभिमानही वाटला. आपल्यालाही नीला सत्यनारायणमॅडम, भूषण गगराणीसर, गद्रेसर यांच्यासारखे मोजकेचं का होईना पण सचिव पदावरील असे अधिकारी भेटले, ज्यांना आपल्या हाताखालील अधिकार्यांकडून गोड, प्रेमाने बोलून कसं काम करून घ्यायचं ते कळतं होते, हे आपलं सद् भाग्यचं म्हणायला हवं.
देवेन्द्रजी आपल्यावरील लेख खूप छान,उद् बोधक वाटला. अभिनंदन.
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्री यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.
१०
Good morning and happy day Shri and Sou Bhujbalji. I am on this group. Many times I read your articles and articles on you. Very very useful and provoking the society. From the said material I say you were and are really public servants as expected under constitution If everyone becomes like you then really life of public will be at ease. Thanks .
— R R GANDHI.
Principal District Judge Mumbai and Chief Legal Adviser. Mahavitran Mumbai.
११.
प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे यांचा लेख वाचन तुमचं व्यक्तिमत्व कळालं. मी भाग्यवान आहे की तुमच्याशी जोडले गेले. मी नेहमीच तुम्हाला काहीतरी साहित्य प्रकाशित करण्यासाठी देते आणि तुम्ही लगेच ते प्रकाशित करता खूप छान वाटते 💐💐
— प्रा अनिसा शेख. दौंड – पुणे
माझी जडण घडण :भाग २९ अभिप्राय….
१
राधिका ताई,
Rule your Stars .. आणि पत्रिका…खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पुर्ण त्यावेळची परिस्थिती मांडली…
काही प्रश्नांची उत्तरं न मिळण्यातच आयुष्याची जडणघडण असते हेच खरं,
अगदी खरं…
पण आठ वर्षे पप्पांनी ते गुपित कसं त्यांच्यामध्ये साठवून ठेवला असेल ह्याची मात्र कल्पना सुद्धा होत नाही.. इतकं मोठं गुपित पचवून सर्वांपासून लपवून ठेवायचं काही सोपी गोष्ट नाही …ते आठ वर्ष त्यांच्यासाठी आठ युगां इतकी असतील हे मात्र नक्की …सर्व जाणून त्याच्यावर अजाण पणे रिएक्शन्स देणे फार अवघड असतं..
— मानसी म्हसकर. बडोदा
२
सुंदर.
— सुनील सातपुते. संगमनेर
३
छानच लिहिले आहे माझी जडणघडण
— वैभवी मराठे.
४
Interesting…👏👏💐
— सरोज भिडे. डोंबिवली
५
अप्रतीम लिखाण !
मी साईटवर comments दिले.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
६
खरंच, लग्न या शेवटी योगायोगाच्या गोष्टी असतात ..
पत्रिकेवर विश्वास ठेवा किंवा न ठेवता, घडणार ते घडतेच !
आपली मानसिकता कशी आहे त्यावर आकाशातील ग्रहांचा
परिणाम जाणवतो..
पण पत्रिका हे पूर्ण खोटे आहे या मताची मी नाही कारण काही अनुभव पत्रिकेनुसार आले आहेत.
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
७
लेख वाचनीय नक्की आहे.
लग्न जुळणीसाठी पत्रिका बघावी लागते. पत्रिका बघूनही काही वेळा घटस्फोटाचा उद्योग होतोच.
तर्क असतात. ९९% पत्रिका व १% नशीब असत. काही वेळेस १% सुद्धा भारी पडतो, आणि आयुष्य होत्याचं नव्हतं होऊन जातं.
अंधश्रद्धा मात्र नसावी.
लेख वाचल्यावर, पत्रिका अभ्यासक म्हणून मला जे वाटलं ते मी मांडले.
— अरुण पुराणिक. पुणे
८
संध्या आणि अरुणाच्यासाठी विवाहाचा प्रस्ताव, संध्या आणि अविनाश मुळे यांची एकमेकांशी जुळलेली लग्नगाठ. मग गुरुजींचे भाकीत, त्यांनी दिलेला काळा धागा असे एकामागोमाग एक घडत गेलेले प्रसंग खूप उत्कंठा वाढवणारे आहेत.
तुझ्या पप्पांचे ज्योतिष विषयातील ज्ञान असतांना अंधश्रद्ध नसणे.
संध्याच्या मायेपोटी दिलेला काळा धागा हे पैलू छान वर्णीले आहेस.
शेवटी अविनाश मुळे यांचे अपघातातून सुखरूप वाचणे ह्या घटनेने वेगळीच कलाटणी मिळाली आणि सगळ्यांना दिलासा देणारा प्रसंग ठरला. ह्यावर खरं तर एक कथा होऊ शकेल. ह्या भागाचे लेखन कथेसारखे फुलत गेले आहे.
खूप छान !
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई
९
तुझ्या या लिखाणाने आपल्या घरातील कितीतरी माहित नसलेल्या गोष्टी आज मला समजत आहेत आणि कळत नकळत काही संस्कार अनाहूतपणे जीवनावर होत आहेत. प्रारब्धात असणार्या गोष्टी टळत नाहीत पण स्वीकारून पुढे चालत राहिलो तर जीवन सुसह्य होते असे वाटते.
— आरती नचनानी. ठाणे
१०
नेहमीप्रमाणेच खूप छान आणि विचार करायला लावील असे.
प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.
उत्सुकता ताणतो.
लेखनशैलीला शतशः प्रणाम!
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
११
राधिका ताई नमस्कार 🙏
आपले ‘माझी जडणघडण” या विषयावरील सर्व लेख मी वाचले, त्यावर येणारे अभिप्राय सुद्धा नेहमी वाचत आहे. यावरून फक्त एकच लक्षात आलं की, तुम्ही म्हणजे एक दिव्य आहात. प्रचंड मोठ्या साहित्यिका आहात.
— पांडुरंगशास्त्री कुलकर्णी. मुंबई
शासकीय अधिकारी संमेलन…
या वृत्तांतावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…
१
फारच छान संकल्पना आहे अधिकारी कर्मचारी यांचे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे मध्ये लपलेला वक्ता, लेखक आणि कवी यामधून जगा समोर दिसून येतो आहे आणि एक चांगले व्यासंगी व्यासपीठ निर्माण केले गेले आहे असे वाटते तसेच या कामीं कष्ट घेणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद आणि या बाबत लेखन करून आमचे पर्यंत पोहचविणारे देवेंद्र भुजबळ व अलका भुजबळ यांना देखील खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
— विजयकुमार लोखंडे. सोलापूर
२
शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन भरणे ही कल्पनाच खूप छान, अभिनव वाटली आणि त्याचे विस्तृत वर्णन व फोटोज पाहून मनापासून आनंद झाला. खूप छान विषयांवर चर्चासत्रे, उत्तम ठराव, ह्या सर्व गोष्टींवरून “अभिरुचीसंपन्न संमेलन” असे वर्णन करता येईल. 👍💐
— मृदुला राजे. जमशेदपूर
३
शासकीय अधिकारी साम्रानाचे मराठी साहित्य संमेलन 2024 हे अत्यंत सुंदर थाटात बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे संपन्न झाले व याचा थोडा का होईना पण खूप सुंदर स्वाद घेता आला, अनुभवता आला तो आदरणीय श्री देवेंद्र भुजबळ जी यांच्या भेटीमुळे. तसेच शेवटचे सत्रात उपस्थित राहण्याचा योग आला. त्यामुळे या सुंदर उपक्रमात पुढच्या वेळी मात्र नक्की सुरुवातीपासून उपस्थित राहील अशी मनाची समजूत करून घेतली .या संमेलनातील सर्वच अधिकारी कर्मचारी वृंदांनी अत्यंत मनापासून कला संविधेची संपूर्ण जबाबदारी अत्यंत कुशलतेने पार पडली सर्वांनाच मनापासून शुभेच्छा. अनेक कलावंतांची भेट होऊ शकली नाही याबद्दल मनात हुरहुर लागून राहिलेली आहे ते 2025 मध्ये पूर्ण करूया. सर्वांचा आभारी आहे धन्यवाद.
— किशोर विभुते, सौ.संगीता विभुते. अकोला
४
आदरणीय देवेंद्र भुजबळ सर, पहिल्या शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाविषयी आपला बातमीवजा वृतांत वाचला. खूप माहिती मिळाली. आपले लेखन खूपच भावले. असो. महोदय, या संदर्भात अधिक माहितीसाठी संयोजकांपैकी काहींचे मोबाईल नंबर पाठविले तर आनंदच होईल. काही शासकीय अधिकाऱ्यांची पुस्तके पाहता येतील. कृपया आयोजक संयोजकांचे मोबाईल क्रमांक पाठवावे ही पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद …
— विलास जाधव. संपादक साप्ताहिक राष्ट्रभक्ती, मुंबई
५
अधिकारी साहित्य संमेलनानिमित्त आपली धावती भेट झाली याचा आनंद वाटला.
साहित्य सेवेचा एक भाग म्हणून साहित्य प्रसाराचे महत्वाचे कार्य न्यूज स्टोरी टुडे पोर्टल करत आहे हे अभिमानाने सांगावसं वाटतं.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
इतर मजकुराविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया….
१
साधकांचे अनुभव वाचून आयोजकांना किती आनंद झाला असेल, याची कल्पना येते.
जीवन म्हणजे काय ? मध्ये उल्लेखलेले पुस्तक मी वाचले होते. खरे आहे. करायचे आहे म्हणूंन उद्यावर सोडू नये. आजच करून घ्यावे ..
काय सांगायचे आहे, भेटायचे आहे, द्यायचे आहे ते वेळेत करावे .. आयुष्य फार लहान.. ऑस्ट्रेलियात राहणारी लेखिका फाईव्ह रेग्रेट्स मध्ये जे लिहीते ते सगळीकडेच लागू आहे. पैसे,धन,प्रतिष्ठा किती काळ टिकणार ? लेख छान आहे.
अनुराधाताईंची भाषा व सुरेख, अलंकारिक आहे. प्रतिभा त्यांच्यावर प्रसन्न आहे म्हणूनच त्या लिहू शकतात..
ती आता माझ्या मनाच्या कागदावर स्वामीनीच्या तोऱ्यात पदन्यास करीत येते वगैरे.
राधानगर बीच वर्णन वाचनीय आणि फोटो प्रेक्षणीय.
“चहा”टळ चहा ” मजेदार!
आजचा अंक साने गुरुजींना वाहिलेला आहे ते स्तुत्यच … राजपूतजींचा लेख आवडला तसेच सुरेशजींचे कविता परीक्षण ही वाचनीय आहे.
वर्षाताईंनी पावती चे महत्व सांगत ती घेण्याचा आग्रह केलाय आणि तोंडी करार करणे टाळायचा सल्ला दिलाय , बरोबरच आहे.
कांचन गोरे यांना आमच्यातर्फे ही अभिनंदन..
शेषरावजींमुळे एक सुंदर भाषण वाचायला मिळाले.
धन्यवाद.
गुरूंच्या दरबारी माझा सत्कार झालाय याचा विशेषानंद मानणारे डॉ मनमोहन सिंग किती विनम्र, निर्मल, शांत होते.
पालकत्व ..लेख तरुण दाम्पत्यांनी आवर्जून वाचावा असा आहे.
प्रतिभाताईंचे अंदमान आणि भिडे यांची कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई
२
सुलोचना गवांदे. अमेरिका यांचा *केरसुणी* हा लेख फारच आवडला. वाचताना खूपच गंमत वाटली. कुठेतरी माझ्या सवयीशीही हा लेख सहजपणे जुळला म्हणूनही असेल. लहान असताना, आई जेव्हा कामाच्या वाटण्या करायची त्यात केर काढणे हे काम माझ्याच वाटेला असायचे. कारण आईला माझे ते काम फार आवडायचे.
साध्या साध्या गोष्टीतल्या गमतीदार आठवणी. 😊😊
— राधिका भांडारकर. पुणे
३
“आणि पुन्हा दहावीत गेलो..”
हा वृत्तांतआवडला.
नुसताच आवडला नाही तर जणू काही माझ्यासमोरच हे सारे घडतेय असा भास झाला. असो.. एकही ईंग्रजी शब्द न वापरता लेख लिहिला म्हणून कौतुक करावे तितके थोडेच.
जगा आणि जगवा.
— प्रकाश पळशीकर. पुणे
४
खूप छान लिहिलंय, डाॅ. मनमोहनसिंग ह्यांच्यावर.
— मीना गोखले. निवृत दूरदर्शन निर्माती, मुंबई.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800