Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
कार्य बाहुल्यामुळे गेल्या आठवड्यात आपले हे सदर प्रसिद्ध करता आले नाही. त्यामुळे एका एवजी गेल्या दोन आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)


प्रकाश फासाटे यांनी सांगितलेली हनुमंथय्या यांची कथा, यांचे बलिदान वाचताना अंगावर शहारे येतात. खरे आहे आम्ही घरात निवांत बसलेले असताना आपले जवान कोणत्या परिस्थितीत आपले रक्षण करीत असतात..त्रिवार वंदन त्यांना.
राग आणि रागाची मांडणी कशी साधन व साध्य असते हे सुरांची बरसात करून सुखावणाऱ्या अश्विनी भिडे वरील लेख योग्य शब्दात दखल घेणारा आहे..आवडला.
— स्वाती वर्तक. मुंबई

ऐतिहासिक घटनेचे श्री प्रकाश फासाटे यांनी अप्रतिम वर्णन केले आहे.
— खाजाभाई बागवान. पुणे

सर नमस्कार,
कॅन्सर दिनाच्या निमित्ताने अलकाताईंवरील लेख वाचला. किती धीरोदात्तपणे त्यांनी कॅन्सरला तोंड देऊन त्यावर मात केली असेल…. मनात किती वादळे आली असतील…किती वेदना सोसल्या असतील सारे काही डोळ्यांसमोर तरळून गेले. खरंच कॅन्सर झालाय हे नुसते कळले तरी ती व्यक्ती तर सोडाच पण जवळचे नातेवाईक पार ढेपाळून जातात. आपण सर्वानी मात्र सारेकाही धीराने घेऊन अलकाताईंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात… त्यांची सकारात्मकता आणखी बळकट केलीत. अलकाताईंनी तर पुस्तकाद्वारे, माहितीपटाद्वारे जनतेमध्ये कॅन्सर जागृतीचे अत्यंत उद्बोधक काम केले आणि करत आहेत त्यासाठी त्यांना त्रिवार वंदन. 🙏🙏
मी माझे सासरे (वय८०) आणि पुतण्या (वय ४५) कॅन्सरने गमावले आहेत. पुतण्या गमावल्याचे दुःख तर अजून ताजेच आहे.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

न्यूज स्टोरी टुडे दि.३०/०१/२५, चा अंक वाचला. आवडला.
विशेषतः या अंकातील “आठवणीतील गव्ह्ररमेंट कॉलनी” अप्रतिम. माझी १९५९ ते १९७२ या कालावधीत गध्दे पंचविशी गेली. आम्ही या कॉलनीत बी-४०/६ या इमारतीत राहात होतो. माझे वडील गोपाळराव हे मंत्रालयात (पूर्वीचं सचिवालय) गृह खात्यात
(SB 2) विशेष शाखेत विशेष अधिकारी (स्पेशल अधिकारी)
म्हणून निवृत्त झाले. इयत्ता ५ ते ७ काळाचौकी (आता अभ्यूदयनगर इ.क्र ६ व शाळा इ.६ मध्ये होती) नंतर परळच्या नवभारत विद्यालयात व नंतर नवीनच सुरू झालेली  मा.शिर्सेकर स्थापित अन् प्रिन्सिपॉल म्हणून जेलेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. पुर्वी ही शाळा एमएचबी येथे भरत होती. पूर्वी सर्व वर्ग पत्राच्या आधारे भरत होते. या शाळेची एस एस सी (S.S.C) ही इ.११ असे. माझी शाळेतून मी १९६४ साली एस एस सी झालो. ही आमची ssc ची दुसरी बॅच होती. आमच्या इमारतीत (चौक १० व १२ इमारतीचे असतं) तळमजल्यावर पोस्ट ऑफिस होते. आमच्या घराच्या इमारतीसमोर मोठे तळे होते. काही वर्षांनंतर बस क्र.२१२ बांद्रा पण ते कॉलनी (तेव्हा पूर्व -पश्चिम असा  जोडणारा पूल नव्हता. एम एच बी ऑफिसही श्री नव्हते) नंतर कला नगर वसाहत झाली. आम्ही जळणासाठी रेल्वे फाटका जवळ असलेल्या पिठाच्या गिरणीतून गहू वगैरे दळून आणत असू.
समोरच्या मैदानावर मारूती मंदिरच्या स्थापनेसाठी आमचा पुढाकार होता. चेतना कॉलेज नंतर स्थापन झाले.
बी.कॉम डहाणूकर कॉलेज व नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन इन बिझनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम चेतना व जर्नालिझमचा कोर्स एस एन डी टी तून पूर्ण केला.
पूर्वी या वसाहतीत हैदराबाद, विदर्भ, मध्यप्रदेश काही गुजरात राज्यातील मराठी माणसं मराठी राज्य म्हणून महाराष्ट्रात मुंबई आले. त्यावेळेच्या कॉलनीची शान काही औरच होती. अक्षरश: चाळी सदृश्य वातावरण व एकोपा होता. येथे मला प्रभु अग्रहारकर हे विधानसभेत स्टेनो, प्रफुल्ल भानूशाली निवृत्त विक्रीकर अधिकारी, सुरेश जोशी हे आमच्या समोर राहायचे. त्याचे वडील हे कमिशनर ऑफ रेशनिंग होते पहिल्या मजल्यावर धामोरीकर व अग्निहोत्री राहायचे.
१९७२ साली माझे बाबा गोपाळराव उपाख्य अण्णा रोपळेकर निवृत्त झाल्यावर आम्ही ही अविस्मरणीय अशा वसाहतीचा निरोप घ्यावा लागला. नंतर आम्ही परळ येथील समर्थ चाळीत राहायला आलो.. नंतर मी दररोज बांद्राला जात असे. पच्छिमेला तलावाच्या समोर नीतिन सावंत राहायचा.. अजूनही राहतो. हा मला शाळेत वरच्या वर्गात होता त्याचा भाऊ रमेश हा माझा वर्गमित्र.
महात्मा गांधी शाळेत गणिताला देशपांडे बाई, इंग्रजीला पेंडसे सर, चिंदरकर बंधू हेही होते.
अशा अनेक आठवणींना उजाळा मिळाला म्हणून मी लिहिता झालो. मी बाहेर गावी असताना यावर लिहिले होते पण… असो.
या अविस्मरणीय वसाहतीतील ही एक आठवण…
न्यूज स्टोरी टुडे च्या संपादक सौ.अलका व त्यांचे यजमान माजी डायरेक्टर देवेन्द्रजी भुजबळ साहेब यांचे हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद शुभेच्छांचासह शुभ रात्री 🌹
आपला नम्र,
— नंदकुमार रोपळेकर.
(माजी कर्मचारी, पब्लिसिटी डिपार्टमेंट, सचिवालय, मुंबई)
त्यावेळी हे खाते सचिवालयात तळमजल्यावर होते. आमचे अधिकारी वाबगावकर होते. ते कॉलनीत राहायचे. मी नेहमी सेकंड शिपला (दुपारी दोन ते रात्री ८/९) असायचो.

सौ. पौर्णिमा शेंडेनी “आठवणीतील गव्हर्नमेंट कॉलनी, बांन्द्रा पूर्व”  यांनी अतिशय सुंदर, मौलिक, व बारीकसारीक दृष्टीकोनातून  कॉलनीतल्या समाज जीवनाच्या सुवर्णकाळातील लेखाजोखा मांडणारा लेख लिहिला, त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभार !!
मी सामान्य प्रशासन विभागात कार्यासन अधिकारी झाल्यावर शासकीय वसाहतीतील रहिवासी होण्याचे भाग्य मला माझ्या  तिसाव्या वर्षी मिळाले. तेंव्हा माझी मुलं खूप लहान होती. त्यांनी कॉलनीत लहानपणाचा खरा आनंद उपभोगला. सुरूवातीला फक्त २-३ वर्षेच आम्ही “बी टाईप” क्वॉर्टरमध्ये राहायला होतो. त्यानंतर आम्ही “वाय टाईप क्वॉर्टरमध्ये राहायला गेलो. ही “वाय टाईप कॉलनी म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासाची कॉलनी. मोठे क्वार्टर, समोर खेळाचे मैदान, बॅडमिंटन कोर्ट, मुलांना क्रिकेट खेळायला भरपूर मोकळी जागा,  आजुबाजुला नारळाची, वडाची आणि गुलमोहराची झाडे, जणू काही निसर्गरम्य परिसरात निवास करण्याचे भाग्य आम्हाला व परिवारास लाभले. येथे वास्तव्यास असलेले अधिकारी शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत होते. या प्रत्येक अधिका-यांचे एकमेकांशी जवळीकीचे संबंध नसले तरी या अधिका-यांची मुले -मुली मात्र जीवाभावाचे मित्र म्हणून राहायचे. ओघानेच त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे- येणे होत असल्याने मग मुलांच्या माध्यमातून पालक अधिका-यांच्या ओळखी व्हायला लागल्या आणि नंतर सर्वांच्या आईचे घरगुती कार्यक्रम, हळदी कुंकू, भीशी च्या निमित्ताने एकत्र येणे, कधीतरी आई मंडळीची छोट्या छोट्या पिकनिक, सामुहिक नवरात्रातील वाय टाईप कॉलनीतील सामुहिक दांडीया, दिवाळी – होळी साजरी करण्याची मुला – मुलींची  धमाल मस्ती मजा करायचो.
पाहता पाहता गव्हर्नमेंट कॉलनीतील आमचे २८ वर्षाच्या वास्तव्यात अनेक आनंददायी क्षण अनुभवायला मिळाले. शेवटी शासनाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत राहून सहसचिव या पदावरून निवृत्त झाल्यानंतरच या कॉलनीतील आमचा कार्यकाळ संपल्यावर सलाम ठोकतांना मन भरून आले, नव्हे, कॉलनी सोडतांना हुंदके आवरने आम्हाला अनावर झाले होते.

मात्र आजमितीस या  शासकीय वसाहती मधील गैरसोयी, मोडकळीस आलेल्या इमारतीं पाहून अत्यंत वाईट वाटते. गेल्या अनेक पिढ्या या कॉलनीत घडल्या, आज व्यावसायिक व व्यवहारी जगात ही शासकीय वसाहत अपवाद कशी राहील.? म्हणतात ना “कालाय तस्मै नमः !!
— राजाराम जाधव, सहसचिव (सेनी) महाराष्ट्र शासन,
६  
रेश्माताईंसारख्या स्त्री कलाकार, स्वतः ला झोकून देणाऱ्या, कलेशी ईमान राखणाऱ्या कौतुकास्पद आहे..छान उलगडले आहे त्यांचे कार्य.
विनयजींबद्दल वाचून खूप आनंद वाटला. असेच सतत कार्यरत असणारे, शिकण्याची जिद्द बाळगणारे नावाप्रमाणेच विनय शील असणारे ..यांची माहिती देवेंद्रजींनी उत्तम शब्दात दिली आहे. धन्यवाद
विंग कमांडर ओक जींचे वेगवेगळे अनुभव वाचायला मजा वाटते. नेता, पुढारी यांच्या कडून सत्कार करवून घेण्यापेक्षा लहान मुलांची परेड छान वाटते
शैलेशजींची कविता खूप आवडली. त्यांनाच अशी चित्रं वाचता येतात जे कलेचे खरे जाणकार, दर्दी असतात. कीर्ति भावे चे मधुबनी चित्रातून बहरलेले काव्य सुंदर.

श्रद्धा जोशी यांची कविता आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

देवेंद्र जी आज एक सुखद काव्य परडी वाचकांना पेश केली.
हेमंतरावांच्या चारही कवितेतून त्यांना स्वातंत्र्य लढ्यात आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिच्या भावना शब्दा शब्दागणिक व्यक्त झालेल्या दिसतात.
*जे जे करती संगत*
*शत्रूचेही असे स्वागत*
*इच्छा मनी हीच असे*
*प्रगत हो सारे जगत*
आम्ही भारतीय खुजा मनाचे नाही वसुधैव कुटुंबकम हे ब्रीद आहे हेच वरील चार ओळीं सांगत आहेत
NST सारख्या असंख्य सभासद असणाऱ्या पोर्टल ची वाट आता पुढे चालू राहील अशी आशा व्यक्त करतोय
हेमंतराव खर तर तुम्ही कवि मनाने श्रीमंत आहात फक्त या पोर्टल वर दान करीत रहा मी ग्वाही देतो दान सत्पात्रीच असेल
— प्रकाश पळशीकर. बावधन, पुणे

सर नमस्कार,
माझ्या काही प्रतिक्रिया.
श्री.रणवीर राजपूत यांचा ‘एकनाथ शिंदे-अनाथांचा नाथ’ हा आदरणीय एकनाथ शिंदेंवरचा लेख खूप वाचनीय झाला आहे. त्यांची धडाडी, जबाबदारी घेण्याचा स्वभाव, केलेल्या कामांचा गवगवा न करणे इ.स्वभावविशेष कळले. छान व्यक्ती चित्रण !अनुजाताई,
‘हलकं-फुलकं’ लेख मन हलकं-फुलकं करून गेला. मित्रत्वाचा प्रपोज-डे अजूनच रिचार्ज करून गेला. आपण मजेत साजरा करा ‘व्हॅलेंटाइन विक’. आम्हालाही कळवा बरं का !

डाॅ. राणीताईंचा ‘नवस बालहक्काचा’ हा लेख आवडला. पालक सगळेच असतात. पण पालकत्व निभावणारे तेही विशेष मुलांचं पालकत्व निभावणे फारच विशेष!

सुनील देशपांडे यांच्या प्रेमाचे रंग भावले. प्रेमाच्या रंगांचे इंद्रधनुष्यच जणू ! खूप सुंदर लेख.

तरुणाईत मिसळल्यानंतर खरोखरच आपण ताजेतवाने होतो. एक प्रकारचा निर्भेळ आनंद अनुभवायला मिळतो. आपल्या लेखाने आमचीही ‘उमेद’ वाढविली. लेख आवडला.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली

नमस्कार.
आज आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे उत्साही उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दखल घेऊन रणवीर रजपूत यांचा लेख छापला, आवडला. ‌हार्दिक अभिनंदन व शुभेच्छासह आपल्या समस्त परिवारासस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व परिवारास निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना शुभ दिवस
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई
१०
लैंखिका सौ श्रध्दा बेलसरे यांच्या *गोतावळा* पुस्तकाचा परिचय लेख आवडला. उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील पुस्तकांसाठी हार्दिक शुभेच्छा…
— सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
११
प्रा आशी नाईक यांचा मॅक्सम्युलर खूप आवडला. नवी मुंबईत विज्ञान संमेलन आणि यू के तील पदव्युत्तर वैद्यकीय संधी वाचले.. माहिती उचित. गज आनन म्हात्रे  यांच्या 2 चारोळ्या भावपूर्ण शेवटची विनोदी … छान आहेत.

महेश केळुस्कर यांच्या बद्दलची माहिती छान वाटली.

मराठी भाषा ..बद्दल जे काही उपक्रम राबविले जातात ते बरेच वेळा मी फक्त कागदावरच पाहिले आहेत ..श्री दिलीपजींनी सांगितलेले उपाय योग्य च आहेत. आशा आहे की ते चांगल्या तऱ्हेने राबविले जातील निदान आता तरी…अभिजात दर्जा मिळाल्यावर.

डोळे हे जुलमी गडे… उत्तम हलकं फुलकं… खूप आवडला लेख
वैद्यजींची कविता छान आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई
१२
आदरणीय सर🙏
तरूण पिढीला आपण किती सहजपणे समजून घेतले. कारण जनरेशन गॅप आणि विचारातील मतभेद बाजूला सारून त्यांच्या विश्वात रममाण होवून युवा पिढीला आपण मार्गदर्शन केले खूपच छान वाटले. 🙏🙏🙏
— सीता राजपूत. अंबेजोगाई, बीड
१३
छान आहे उमेद…ही मुले आमच्या देशाचे भविष्य आहेत. जर स्वयंसेवक, सुरक्षारक्षक वगैरे असेच शिस्तीत सदैव असतील तर भारताचे भविष्य उज्ज्वल होण्यास कितीसा वेळ लागेल सर…

ओक जींची पार्टी ही छान…अशा या भेटींमुळे, लहान सहान घटनांमधून देखील आपल्याला शिकायला मिळते.. वाक्य आवडले.

द्रौपदी मीरा चे अलौकिक प्रेम, अमृता प्रीतम्य यांचे उत्कट, तर गोपाळआनंदी चे विरोधाभासी आणि आमटे यांचे नतमस्तक करायला लावणारे प्रेम ..अशा विविध छटा रंगवत..सुनीलजींनी उत्तम वेलेन्टाईन साजरा केला..अभिनंदन
— स्वाती वर्तक. मुंबई

“माझी जडण घडण” भाग ३५ वर प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

आजचा *रेडिओ* हा ३५ वा भाग अप्रतीम. वाचताना मीही त्या काळात गेले. नीलम प्रभू, प्रभाकर  जोशी, लीलावती भागवत, अमीन सयानी यांचे आवाज आजही कानात घुमतात. तू अगदी मंगल प्रभातची ठराविक ट्यून, कामगार सभा, वनिता मंडळाचे वाद्यवृंद यांचे  तू केलेले वर्णन प्रभावित करते.
अशीच बहारदार लिहित जा. तुला खूप खूप शुभेच्छा !
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे

राधिकाताईंच्या लेखमालेमुळे मी देखील आपल्या जुन्या रम्य दिवसात हिंडून आले. त्यांचा रेडिओ माझा ही सखा आहे. आमच्या तर घरात त्या खोलीचेच नाव “रेडिओ घर” पडले होते. छान राधिका ताई.
— स्वाती वर्तक. मुंबई

बिंबा, तुझ्या लेखामुळे आपल्या काळातील  रेडिओच्या  सगळ्या गोड‌ आठवणी जाग्या झाल्या. सगळ्याच कार्यक्रमाचं किती गारुड होतं आपल्यावर. तू अगदी सविस्तर लिहिलं आहेस 👌 बिनाका तर आपला प्रियकरच जणूं😃 मजा आली वाचताना. तो टिपीकल डबा आजच्या आधुनिक काळातील Antic peace आहे.
— अलका वढावकर. ठाणे

मा. सौ . राधिकाताई भांडारकर यांचा माझी जडणघडण अंतर्गत *रेडिओ* हा लेख वाचनात आला. रेडिओवर मंगलगाणी, भक्तीगीतं, गीता अध्याय विवेचन हे सर्व मंजुळ आवाजात कानी पडतं. काम करता करता ही ऐकून समाधान मिळते.

आजकालच्या संगणक, मोबाईल जमान्यात ही रेडिओ ऐकणारी माणसं आहेत. पुणे, मुंबई आकाशवाणी वरून सकाळी वाजणारी सिग्नेचर tune श्रवणीय व ऐकतच रहावी अशी असते.

रेडिओ हे मनोरंजनाचे साधन नव्हे तर, सामाजिक संस्काराचे, समाज उद्बोधनाचे दृक श्राव्य माध्यम आहे. आनंदी जिवनाची दिशा दाखविणारे एक श्राव्य माध्यम आहे.

सर्वच काही अप्रतिम आणि वाचनीय असेच आहे.
उत्तम लेख वाचवयास मिळाला…
— अरुण पुराणिक.

नमस्कार राधिकाताई .
तुमचा रेडिओवरील लेख वाचला. परवाच आमच्या अथश्री सोसायटीत सौ जयश्री कुबेर ह्यांचे आठवणीतील आकाशवाणी ह्या विषयावर छान भाषण झाले. ५० वर्षांचा काळ आठवणीत ऐकला. पडद्यामागे किती कष्ट पडतात ह्याची छान कल्पना आली.
— सुलभा गुप्ते. पुणे

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन कामलिनी विजयकर आपल्याला….
अजूनही असे अनेक आवाज मनात खोल घर करुन राहिले आहेत.
आकाशवाणी वाद्यवृंदाच्या मंजुळ स्वरांनी उजाडणारी ती सकाळ.
भक्तीगीत, भावगीते यांनी सुंदर केलेली रोजची सकाळ. कसं विसरणार सगळं ?
त्याबर रात्री रंगणारी संगीत संमेलन, त्यातून किती शिकायला मिळालं.
बिनाका गीतमाला. 60 ते 65 मधील तो काळ, ती गाणी, मैत्रिणी
बरोबर होणाऱ्या गप्पा. किती म्हणून सांगावं !
जुन्या आठवणीत हरवूनच गेले आहे.
सगळं अप्रतिम ! मस्त !
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

किती सुंदर लिहीतात ताई तुम्ही 🙏😊
— अस्मिता पंंडित. पालघर

माझी जडणघडण भाग ३६ अभिप्राय

लेख अगदी अल्प असला तरी खूप काही सांगून जाणारा आहे. आवडला.
— अरुणा मुल्हेरकर. ठाणे

फारच सुंदर लेख… प्रवाही, सुयोग्य भाषा…
— नीलिमा खरे. पुणे

Nivadungach  suddha tumhi etake sunder warnan karun aamhala pan vanaspati ch Important samjayala help jhali. Thank you Radhika tai.
Very nice Nivdung
— मीना वाघमारे. अमरावती

खूप छान.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

किती सुंदर. निवडुंगासारखं कणखर पण हिरवाई टिकवणारं आपलं व्यक्तिमत्त्व असावं 👌👌🙏
— अस्मिता पंडीत. पालघर

राधिका भांडारकर यांचे ‘माझी जडणघडण’ या मालिकेतील लेख नेहमीच छान असतात. वेगवेगळ्या व्यक्ती, वेगवेगळे प्रसंग,त्यावर त्यांच्या तेव्हाच्या प्रतिक्रिया, आताचं भाष्य खूपच interesting असतं. त्यातून त्यांचा विचारीपणा, समतोल, सामाजिक तसेच नातेसंबंधातील भान या सगळ्या गोष्टी जाणवतात आणि आपण पुढच्या लेखाची वाट पाहू लागतो.
— गौरी गाडेकर.

“निवडुंग” छान लिहिले आहे राधिकाताई 👌👌
कणखर मन व निवडुंग  यथार्थ तुलना, आवश्यक आहे, हे ठसते मनामध्ये.
— छाया मठकर. पुणे

साध्या विषयांवर सहज सोप्या भाषेत खूपच छान लिहिले आहे. दुर्लक्षित निवडुंगालाही न्याय दिला आहे. त्याचे उपयोग, त्याचे गुण, त्याची विविधता या सर्वांकडे आपले लक्ष वेधून घेतले आहे. साध्या विषयांत आशय आढळणे ही तर साहित्यिकाची खासीयत आहे.
— सुमन शृंगारपुरे. पुणे

‘ निवडुंग’ पूर्वी तशी उपेक्षित असणारी ही वनस्पती. तिच्याशी तुझं असलेलं नातं, आजीने निवडुंगाचा रोजच्या जीवनात केलेला वापर.
त्यामुळे तिचे महत्व तुला समजले.

खरंच, औषधी आणि उपयुक्त अशा निवडुंगाकडे दुर्लक्षच केले जाते. कॉलेजमध्ये त्यावर अभ्यास ..हे सगळं छान लिहिलं आहेस.

आता तर ‘निवडुंग’ आंतरराष्टीयरित्या प्रसिद्धी पावला आहे.
सौंदर्य प्रसाधनात त्याचा वापर जगमान्य झाला आहे.  तुझी 36 वी माळ वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई
१०
बिम्बा, अग, निवडुंग या विषयावर, काट्यांच्या खेरीज काही लिहीता येईल अस मला कधीच वाटलं नव्हत बाई !
केशवसुत तुझ्याकडे बघूनच म्हणाले असावेत !
“साध्याही विषयात आशय कधी
मोठा किती आढळे
नित्याच्या अवलोकने जन परि
होती पहा आंधळे”
खरंच तुझी भाषा किती छान आहे. व्यक्त होणं छान जमलंय तुला.
— नयना वैद्य. ठाणे
११
Nice How come u remember childhood memories so well.
— जयश्री कोतवाल. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments