नमस्कार, मंडळी.
आपल्या समाजात आदर्श शिक्षकांविषयी किती प्रेम, आदर आहे हे आदर्श शिक्षक श्री कृष्णकांत सासवडे यांच्या यश कथेला मिळालेल्या व मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसून येते. विशेष म्हणजे ते निवृत्तीनंतरही शांत बसले नसून अधिकाधिक समाजोपयोगी काम करीत आहे, हा गुण निश्चितच आपण सर्वांना प्रेरणादायी आहे.
या आठवड्यात प्राप्त झालेल्या निवडक प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आगामी आठवडा व महिन्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आपला
– देवेंद्र भुजबळ, संपादक.
राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम जागविणारी, वीररसाने प्रेरीत करणारी प्राचीन कला, शाहीरी परंपरा भक्तीभावाने, समर्पण भावनेने व समर्थपणे जपणाऱ्या शाहीर मावळे यांना मानाचा मुजरा व लक्ष लक्ष शुभेच्छा
– किशोर जगन्नाथ पतंगे
खुपच छान! शाहीर शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत व गेली अडतीस वर्ष फाल्गुन वद्य तृतीयेस अव्याहतपणे शिवजयंती साजरी करत आहेत. एखादी गोष्ट ठरविली की ती यशस्वीपणे पार पाडण्यास ते सतत प्रयत्नशील असतात.
– प्रमोद कमलाकर निजामपुरकर
सन्मा. दिलीप गडकरींजी,
जेष्ठ साहित्यिक, यांनी “आम्ही कर्जतकर ” बाबतचे अप्रतिम लेखांकन केले असून श्री भुजबळ साहेबांच्या सकस लेखीनीद्वारे संपादन केले आहे.
खरं म्हणजे सह्याद्रीच्या रांगेतील एका टेकडीच्या / पर्वताच्या ( बोरघाट ) कुशीतील मुंबई -पुणे रेल्वे मार्गावरील एक छोट्याशा गावाचे महत्व पेशवे काळापासून ते ब्रिटिश साम्राज्य आणि आजच्या काळातही कसे महत्व प्राप्त झाले आहे याबद्दल अतिशय समर्पकपणे रेखांकन केले आहे.
याशिवाय, जुन्या पिढीतील भिडे, पाध्ये, काळे , मुळे, कोडिलकर, आरेकर यांच्या पासून ते सुप्रसिद्ध वडापाव वाले दिवाडकर यांच्या खास वैशिष्ट्यांसह अप्रतिम वर्णन केले आहे. त्यामुळेच ”आम्ही कर्जतकर” खरोखरच वाचनीय झाले आहे. त्यासाठीच सन्माननीय गडकरी जी यांचे लेखन व भुजबळ साहेबांच्या सुंदर संपादनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!
– राजाराम जाधव, नवी मुंबई.
“ हळवी पाखरं ”
कसं काय जमतं डॉक्टर तुम्हाला इतकं सुंदर लिहायला
अगदी मनमोहन समोर उभी राहिली, ग्रेट
– विलास कुलकर्णी
गुरुतुल्य आदरणिय सासवडे सरांच्या जीवनपटाला प्रथमतः मी मनापासून सलाम करतो…
माझा आणि सरांचा सन २०१० पासून नोकरीच्या निमित्ताने खराळवाडी विद्यालयात संपर्क आला.सदैव कुटूंब, समाज,नोकरी व सहकारी मित्र यांच्याबाबत सेवा व समर्पभाव जपून सर्वांशी प्रेम व आपलेपणाचा स्नेह वृध्दींगत करणे हा सरांचा खरा स्थायीभाव आहे. जीवनात अथक प्रयत्नांना नेहमीच यशाची किनार असते हेच सरांच्या जीवनसंघर्षावरुन दिसून येते.जीवनात आलेले सुख – दुःख व संकटांपुढे न झुकता जीवननौका प्रयत्न व समर्पितभावाने पुढे घेऊन जाण्यात सर यशस्वी झालेले आहेत…याचा मला सार्थ अभिमान आहे. सरांचा जीवनप्रवास नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक आहे…पुनश्च एकदा सरांच्या आदर्श जीवनप्रवासाला सलाम…
– नरेंद्र बंड सर
आदर्श शिक्षक,
माझे परमस्नेही श्री सासवडे सरांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा मागोवा घेणारा वास्तववादी आणि प्रेरणादायी लेख वाचला. जुन्या आठवणींचा पट डोळ्यासमोर तर लागत. एक अत्यंत विश्वासू प्रामाणिक, पापभिरू, आस्तिक ,सोशिक, सात्विक, लाघवी, उदार, कुटुंब वत्सल, विद्यार्थी प्रिय आणि प्रसन्न शिक्षक म्हणून ते सुपरिचित आहेत. सरांच्या जीवनातील अत्यंत कसोटीची क्लेशदायक घटना थोरले बंधू कै. भैय्यासाहेब यांचे अकाली अपघाती निधन. अशा बिकट परिस्थितीत ज्या धीरोदात्तपणे कुटुंबाचे पालन केले ते केवळ अतुलनीय. रामायणातील भरताच्या बंधुप्रेमाप़माणे समर्पित जीवन जगणार्या सरांविषयीचा आदरभाव आणखीनच दुणावतो. प़तिकुल परिस्थितीत आत्मविश्वासाने जिद्दीने रात्रंदिवस कष्ट करुन अर्जित सुबत्ता संपन्नता आणि समाजमान्यता ठळकपणे नजरेत भरते. सेवानिवृत्ती नंतरही अतिशय तडफेने तन्मयतेने आणि निरपेक्ष पणे गरजू समाज बांधवांसाठी झोताने पाहून अहंकाराचा वारा न लागो माझ्या मना या संतवचनाप़माणे पाय सतत जमीनीवर असणाऱ्या सरांबद्दल कौतुक वाटते. भावी जिवनात त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडावी यासाठी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंततो.
– जाधव एन .एच.
भावे, तुमच्या साहित्य विषयक लिखाणात तुमचा अभ्यास आणि चिंतन अगदी स्पष्ट दिसते. तरीही ते लिखाण नेहमीच अर्थवाही, रसाळ आणि वाचनीय असते. पुस्तक परीक्षण आणि काव्यात्मक रसग्रहण दोन्हीही लेखन नेहमीच मला आवडते.
– दर्शना साठे
ओठावरलं गाणं….
खुप छान & सुंदर कामगिरी
– दीपक मानकर
स्त्री सखी : “भायली”
Beautiful writing style, love to read Marathi
– Manjusha Bhaskarwar
Congratulations sir ! 💐 It was a great experience to work with you at Kharalwadi school. Your helpful nature and active team member taught us many new things.we are proud of you.Once again many congratulations
– Mrs. Rewati Jarad
अदितीचा “मनोगंध”
Great Aditi
Sundar lekh Rupesh
– Vilas kulkarni
….सार्वजनिक कामात सातत्याने व्यस्त राहून , मोठ्या कालावधीत नोकरी करून कुठलीही संपत्ती मात्र वाढवता आली नाही. कारण संपत्ती हे कधीच ध्येय नव्हते, आणि असणारही नाही. पण …….आपल्याला प्रामाणिकपणे जे करणे शक्य आहे ते करत राहायचे. एवढच गणित त्यांना माहीत आहे. उभ्या आयुष्यात जे ज्ञान त्यांच्या कडे असेल ते विद्यार्थ्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक नोकरी म्हणून नव्हे तर….एक पवित्र पेशा म्हणून !! शिक्षक म्हणून ज्या दिवशी जबाबदारी घेतली तेव्हा पासून सेवेत असेपर्यंत त्यांनी सर्वात जास्त ….. शाळेचा असणार आहे याची काळजी घेतली. जीवनात आतापर्यंत अनेक प्रकारचे चढ उतार, प्रसंग अनुभवलेत. पण ….अविचल, स्थिर आहेत. कारण प्रत्येक गोष्ट प्रमाणिकपणे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आणि त्यामुळे इतरांना काय वाटेल ? याचा फारसा विचार कधीच करत नाही. प्रत्येकाचे ईश्वराने भले करावे, सर्वाना सद्बुद्धी द्यावी एवढीच त्या करुणाकराकडे प्रार्थना.
– पानसरे एस जी
ओठावरलं गाणं….
भावाबहिणीचे अतुट नाते आणि त्या नात्याचे सर्व धागे उलगडून आपल्या या रसग्रहणांत दाखवले गेलेत. खूप छान.
– आशा लिंगायत.
ओठावरलं गाणं….
भाऊ व बहीण यांच्या नात्यातील ओढ या गीतात उत्तम रित्या वर्णीली आहे. आपण केलेल्या रसग्रहणामध्ये ते सुरेख उलगडून सांगितले आहे. सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या व ओठावर रेंगाळणाऱ्या अनेक गाण्यांपैकी हे एक गाणं. हे सदर चालू करून विकास भावे व देवेंद्र भुजबळ यांनी जुन्या गाजलेल्या गाण्यांना उजाळा द्यायचा स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल त्यांना धन्यवाद.
– विवेक भावे
एक आदर्श मित्र, सहकारी, शिक्षक आनी प्रेमळ मनाचा निस्वार्थी मार्गदर्शक, समाज कार्याची आवड असणारा म्हणून श्री सासवडे सरांचा उल्लेख करावा लागेल.
त्यांचे वडील,आई, आनी मोठा भाऊ हे आमचे कुटुंब चे स्नेही होते.
सर, आणि मी पदवी नंतर नोकरी शोधण्याचे दृष्टीने अधिक जवळ आलो. अत्यंत चांगला स्वभाव, प्रामाणिक वृति, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी, हे विशेष गुण आहेत.
– शांताराम शेलार
आदरणीय श्री. कृष्णकांतजी सासवडे सरानी खरोखर संघर्षमय जीवन जगून स्वतःची स्वतंत्र व वेगळी ओळख फक्त कासार समाजापर्यत मर्यादित न ठेवता इतर समाजासाठी एक आदर्श निर्माण केला. सतत हसतमुख व परिस्थितीला शरण न जाता कठीण समस्या सोडवत राहिले. समाजातील सर्व थरातील लोकांशी कायमच चांगले संबध व सुसंवाद ठेवला.
अशा थोर व्यक्तीला आमचा मानाचा मुजरा.
– श्री. संदिप रांगोळे
मा.कृष्णकांतजी सासवडे सर यांना मी गेल्या २५ वर्षापासून ओळखत आहे. ते माझे ज्येष्ठ बंधू समान, गुरूसमान असून ते खरोखरच एक सरळमार्गी, कर्तुत्ववान आणि सर्वांच्या उपयोगी पडणारे आदर्श मार्गदर्शक आहेत.
एक सहकारी शिक्षक व माजी मुख्याध्यापक – श्री. तानाजी अंकुशराव.
(सचिव) सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असोशियन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
निसर्ग गान, सुंदर निसर्ग वर्णन. छानच आहे कविता.
– सविता पोतदार
मराठी पक्षी विश्वकोश : आवाहन….
देवेंद्र सरांच्या आवाहनातून एक आगळा वेगळा, पक्षीविश्वकोश समोर येणार, ह्याचा खूप आनंद होत आहे. छायाचित्रकार व लेखकांसाठी पक्षी प्रेमींसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम उदयास येईल. खूप शुभेच्छा!
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.
‘मराठी पक्षी विश्वकोश आवाहन’ हा देवेंद्र भुजबळ यांचा लेख आवडला. आशय तर आहेच उत्तम परंतु पक्ष्यांच्या चित्रांमुळे आकर्षकही झाला आहे.
– प्रा प्रतिभा सराफ
निसर्ग गान, खूप सुंदर कविता!!! निसर्गाचे वर्णन अप्रतिम!!!
– स्वाती शिरुडे
खुप प्रेरणादायी लेख लिहिला आहे. इच्छा असेल तर मार्ग नक्किच सापडतात याचे उत्तमोत्तम उदाहरण आहे. डॉ. परशराम यांच्या स्वप्नपूर्ती साठी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ एन जी ओ (मँगो) च्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि प्रथित यशाबद्दल अभिनंदन !
एखाद्या आत्मचरित्रास एका लेखात सारबद्ध करण्याचे कसब प्रस्तुत लेखक कमल अशोक यांना चांगलं अवगत असलेले दिसले. उत्तम लेखनास प्रोत्साहन आणि सम्पादनाचा गाढा अनुभव असलेले देवेंद्र जी यांनी वाचकांना नामी संधी उपलब्ध करून दिली त्या बद्दल त्यांचे मनस्वी आभार.
– रमेश
सुजाता आपण लिहिलेले निसर्गगान अतिशय समर्पक असेच आहे. निसर्गाशी एकरूप झाले की असेच वाटते. 👌👌
आम्ही अकोटकर
अतिशय सुंदर असा लेख आहे, अकोट बद्द्ल संपुर्ण माहिती थोडक्यात वर्णन करण्यात लेखकाला यश आलेले आहे. सर्व स्थळांबाबत अतिशय कमी शब्दात अभ्यासपूर्ण वर्णन केलेले आहे. उदा. नंदीकेश्वर मंदिरा बाबत वानखेडे साहेबांनी अतिशय अभ्यासपूर्ण आणि मोजक्याच शब्दात महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळेच या लेखास वेगळेच महत्व आलेले आहे.
– आर बी सुरळकर
कौतुकास्पद! ‘गोमय गणपती’ या लेखातून बोध घ्यावा असा आहे.
– प्रा प्रतिभा सराफ
सावरकर, मदर तेरेसा
खूप छान.
अजुनी रूसूनी आहे…
अविट गोडीचे व चालीचे गाणे …कुसुमानिल …मस्त..
पी के पवारजी …
आम्ही नाही सुधारणार .. बळी देऊ
नि बळी घेऊ !
-प्रा सौ सुमती पवार
ज्यांच्या नावांत राजे आणि मावळे यांचा संगम आहे अशा शाहीर हेमंतराजे पुरुषोत्तम मावळे यांचा सुरेख परिचय श्री. देवेंद्र भुजबळ यांनी करून दिला. त्यांचे शिक्षण, आवड, साहित्य कलाप्रांतातील संचार पाहून त्यांच्याविषयीचा आदर दुणावला. इतके दिवस एक प्रसिद्ध शाहीर एव्हढीच माहिती होती पण त्यांचे विविध कार् , पुरस्कार पाहून खूप कौतुक वाटले.
– नीला बर्वे, सिंगापूर
हळवी पाखरं मनाला भिडणारा लेख. एक वेगळा, काळीज हेलावून टाकणारा अनुभव !
– वर्षा फाटक, पुणे
हळवी पाखरे पुन्हा पुन्हा वाचावयास उद्युक्त करणारा लेख आहे.
– प्रकाश पळशीकर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश.