Saturday, July 12, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात या सदरात आपले स्वागत आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे गेल्या आठवड्यात हे सदर प्रसिद्ध करता आले नाही, या बद्दल क्षमस्व. पण त्यामुळे आज आपल्याला गेल्या १५ दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतील.

विशेष म्हणजे, माझ्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी लिहिलेले “६५ वर्षे : एक ससावलोकन” हे आत्मचिंतनपर लेखन खूप वाचकांना भावले. हा एक नवीनच शब्द मराठी शब्दकोशात भर टाकणारा ठरेल, अशी आशा आहे.
वाढदिवसानिमित्त माझे मित्र श्री मारुती विश्वासराव यांनी “सेवाभावी देवेंद्र भुजबळ” हा लेख लिहिल्याबद्दल त्यांचे आणि तो आवडल्याचे कळविणाऱ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार.

आपल्या लेखिका स्वाती वर्तक मॅडम यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त शाब्दिक शुभेच्छा तर दिल्याच पण माझे छानसे चित्र काढून पाठविले ! खरंच, आपणा सर्वांचे असे प्रेम पाहून मन भरून येते. आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडतात. असेच आपले प्रेम कायम असू द्या.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)


सौ शोभाताई, बरेच दिवसांनी आपल्या लेखणीतून उतरलेले “मोबाईल पुराण” हे काव्य छानच आहे. मला जे एक कडवे आवडले, ते पुन्हा उद्धृत करण्याचा मोह आवरता नाही आला.
“छान छान परिवार
भेट सदैव घडविरे
सांज सकाळ होता
एकमेकांना आठविरे”.

त्याच्याच खालचे कडवेसुद्धा आवडले…

“द्यानियांचा राजा तु रे
अनेक प्रश्नच उठतिरे
अडचणींवर मात करोनी
उत्तरे क्षणात भेटतीरे”
— प्रकाश पळशीकर.  बेळगाव

सुंदर कविता मोबाईल पुराण !
— खाजा बागवान. पुणे

नागेशजींचा लेख खूप माहितीपूर्ण, उत्तम लिहिलेला आहे. महिला सक्षमीकरणाचे उचललेले पाऊल .. वाचून खूप आनंद झाला.
कालिदासाच्या…
आषाढाचा प्रथम दिवस… याबद्दलचा लेख छान आहे. महान कवी.. आठवले.. त्याला फक्त मेघ, नद्या यांचीच माहिती नसून उत्तम खगोलशास्त्रज्ञ असल्याचे आढळते. आमचे परिचित डॉ यांनी रामकालीन ग्रहताऱ्यांचा अभ्यास करून स्वतःचे विमान रामाच्या पदचिन्हांवरून उडविले होते.किती महान कवी होता तो …!
नमन
तसेच शुभांगीताईंचा लेख, छान परिचय करून दिला आहे.शाळेत रंगमंचावर केलेले कुमारसंभव आठवले
— स्वाती वर्तक. मुंबई

भाषा कल्लोळ…..
आजच्या शैक्षणिक धोरणावरचा डाॅ.विजय पांढरीपांडे यांचा सविस्तर
लेख अर्थपूर्ण आहे.
— शुभदा चिंधडे. ठाणे

भाषा कल्लोळ.. लेख  आवडला.
खूप छान विवेचन. 👌🏻
— मनीषा पाटील. केरळ

भाषा कल्लोळ .. हा लेख खूपच छान उहापोह करणारा आहे.. आवडला… पण गेली कित्येक वर्षे आपण हेच ऐकत आलो आहोत की मुलांना त्यांच्या कलाने शिकू द्या… डॉ विजयजी म्हणतात.. “मातृभाषा, इंग्रजी बरोबर इतर कोणत्याही भाषा शिकणे केव्हाही चांगलेच पण अमुकच वेळा शिकली पाहिजे असा आग्रह नको…..वगैरे.”
मुळात हेच समजणे समजावणे कठीण वाटते.. इतर देशात किंवा आपल्या देशातील काही शाळांमध्ये असे काही प्रयोग शक्य ही असतात. मध्यंतरी सरकारी धोरणाप्रमाणे मुलांच्या कमकुवत एरियाजचा शोध घ्या. त्यांच्या जवळ बसा वेगळे काढून त्याचा अधिक सराव करून घ्या असेही सांगण्यात आले.. लेखी नियम वाचायला किती छान खरेच….. पण ते  करायला सोपे असतात.. का ? कारण भारताची म्हणजेच अनुषंगाने शाळांची विद्यार्थी संख्या अफाट…. त्याच प्रमाणे आपल्या सोयीनुसार  भाषा शिकणे म्हणजे नेमके काय…. शाळेत की बाहेर… लेख छान असून विचार प्रवर्तक आहे
श्रीपाद सहस्त्रभोजने यांची माहिती उत्तम आहे खरेच अशी व्यक्तिमत्व भारावून टाकणारी असतात..
धन्यवाद श्री अविनाशजी.
अनुवादित कथा भावस्पर्शी आहे. आवडली.
सायलीची कविता छान आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई

भाषा कल्लोळ…
अहो पण लहान मुलांची ग्रहण शक्ती अतिशय फास्ट असते. खरंतर लहानपणी तुम्ही जितक्या भाषा शिकवाल तेवढ्या भाषा ही मुलं पटकन आत्मसात करतात आणि तुम्हाला जर आपल्यावर इतक्या वर्ष राज्य केलेल्या इंग्रजांची इंग्लिश भाषा चालते तर मग सगळ्या जगात प्रचलित असलेली सगळ्यात प्रदेशात प्रचलित असलेली हिंदी का चालत नाही ? आणि महाराष्ट्राची आपल्या हातूनच मराठी माणसांचा गळा घोटणाऱ्या या उद्धव च्या सांगण्याला बळी पडून  वेडा राजा हि त्यात सामील झाला. त्याला स्वतःचं डोकं वापरायचं की नाही ? चौदा वर्ष जवळजवळ यांचे राज्य होतं. मराठी मुलांना काय दिलं हो ? वडापावच्या गाड्या  ? हा उद्धव लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण स्वतःच्या भावांबरोबर कसा वागलाय तो 13 14 वेळा कोर्ट केलं त्याच्यावर. त्याचे मी नाव काय ठेवलंय माहितीये उद्धव नाही उद्धट ! मी तर सरळ सरळ लिहिते अजिबात घाबरत नाही.
— डॉ प्रफुल्लता सुखटणकर. कॅनडा

डॉक्टर भास्कर घाटावकर हे सरकारी वसाहत वांद्रे येथे माझे शेजारी
सुरुवातीपासून धडपड, उद्योगी व महत्त्वाकांक्षी असलेले हे एक अफलातून व्यक्तिमत्व.
वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी एकाच वेळेस चार पुस्तकांचं प्रकाशन केल्याची बातमी वाचली, खूप आनंद वाटला.
धाटावकरांचे मनःपूर्वक अभिनंदन👍🏼🌹🙏🏾
— वसंत संख्ये. मुंबई

हिंदू पन्नास वर्षानंतर कसा असेल हा अतिशय संशोधनपर, अभ्यासपूर्ण लेख आणि चिंतन करायला लावणारा लेख आहे. खरंच सर्वात कमी असणारी आपली हिंदूंची संख्या विचार करायला लावणारी आहे.
— शुभांगी गान.  ठाणे
१०
नमस्कार सर,
आपला ‘ हिंदू: ५० वर्षांनंतर कसा असेल’ हा लेख वाचला आणि थोडे सुन्न व्हायला झाले. खरंच अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. हिंदुंच्या सहिष्णु वृत्तीमुळे ही परिस्थिती ओढवली आहे असे वाटते. बदलत्या अर्थकारणांमुळे कुटुंब आकुंचन पावत आहेत. ‘हम दो हमारे दो ‘ वरुन ‘हम दो हमारा एक’ अशी घोषणा झाली. आतातर ‘डिंक’ सोसायटी (डबल इन्कम नो किड्स) अस्तित्वात आली आहे. आईवडीलांच्या नोकरीमुळे मुलांना सांभाळणार कोण ? या समस्येमुळे मुलेच नकोत अशी झालेली मानसिकता, अति शिक्षणामुळे आलेली अहंता इ. बऱ्याच गोष्टी अंतर्भूत आहेत. यावर मौन धारण करून चालणार नाही तर सर्वंकष विचारमंथन होणे आवश्यक आहे. एक समस्येला वाचा फोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
११
नमस्कार देवेंद्र,
तुमचा ‘हिंदू: ५० वर्षांनंतर कसा असेल ?’ हा लेख खूप विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक हिंदू – सनातनी धर्मियांनी ही बाब समजून घ्यावी हे अत्यंत गरजेचे आहे.
तुम्ही दिलेल्या टक्केवारींच्या  संख्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. गेल्या ७५-८० वर्षांत हिंदूंची टक्केवारी कमी कमी होत आहे. आत्ताच ठाम भूमिका घेऊन आपलेही माहेश्वरी समाजासारखे होणे कसे टाळता येईल या नियोजनाचा पद्धतशीर अंमलबजावणी करणे काळाची नितांत आवश्यकता आहे.
तुमची पत्रकारिता व त्यातून समाज प्रबोधन करणारे लेखन नेहमीच चांगले असते.
धन्यवाद.🙏
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका
१२
हिंदू धर्मावरील लेख वाचला. खरंच अशी परिस्थिती राहिली तर, हिंदू धर्म शिल्लक राहिल की नाही हा प्रश्न पडतो. या बाबत काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे कारण एकदा हिंदू धर्म नष्ट झाला तर त्या देशातील लोकांची काय अवस्था होईल ही कल्पनाच करवत नाही…
यावर मला काही उपाय सुचतात,ते म्हणजे मदरशांना जसं सरकार पोसतं, तसंच आपल्या देशात वैदिक शाळांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. त्या अभ्यास क्रमात आधूनिक विषय सुध्दा शिकवले जावेत. भारतीय कंपन्या नी या पदवी धारकांना प्रशिक्षण देऊन कुवतीनुसार नौकरी द्यावी. कुणाला व्यवसाय चालू करावयाचा असेल तर त्यांना जरूरी ज्ञान देणे गरजेचे आहे. त्यामुळे होईल की आपले सनातन धर्म टिकेल आणि परधर्मियांच विशेषत इस्लाम आक्रमण थोपवून धरता येईल… पण त्यासाठी आपले आमदार आणि खासदार या सर्वांनी प्रयत्न करावयास हवेत तरच हे शक्य आहे….
— मिलिंद महाजन. मुंबई
१३
श्री भुजबळ साहेब,
आपण ज्येष्ठांच्या आनंद मेळाव्याचे वृत्त संकलन फार सुंदर रित्या लिहिल्याबद्दल धन्यवाद. 🙏
— विठ्ठल गव्हाणे.
उपाध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ सानपाडा, नवी मुंबई.

राधिका भांडारकर लिखित माझी जडणघडण भाग ५४ संसाराच्या वाटेवर… अभिप्राय

राधिकाताईंच्या जडणघडणीचा आजपर्यंतचा प्रत्येक भाग मी वाचत आले आहे. आता त्या त्यांच्या नवीन सुरू झालेल्या संसाराविषयी आणि सासरच्या माणसांसोबतचे एकेक अनुभव लिहित आहेत.
राधिकाताईंची लेखनशैली इतकी प्रभावी आहे की त्यांचे एकेक अनुभव हे आपलेही आहेत असे वाटते आणि त्यामुळेच त्यांच्या लेखाशी वाचक मनाने जोडले जातात.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

खूप छान. नेहमीप्रमाणे डोळ्यासमोर सगळे चित्र उभे राहते.
— अंजोर चाफेकर. मुंबई

छान लिहिलय.
“एकत्र कुटुंबातील वातावरण, स्वयंपाकातील फरक, जोडलेले सर्व नातेसंबंध”
“लहान माझी बाहुली”  खूपच छान जोडली आहे. छान वाटले वाचून.
— छाया मठकर.

तिन्ही भाग आजच वाचले. बरंच लिहावंसं वाटतंय.
माझा जन्म खानदेशमधला, शिक्षण तिथेच झालं. माझ्या आठवणी पण जाग्या झाल्या.
पुण्याला बहिणीच्याकडे कार्यक्रम होता म्हणून गेले होते. आल्यावर पण खूप गडबडीत होते, आहे.
आता मला होत नाही तरी करावं लागतं सगळं. नंतर सवडीने लिहीन.
— अनुपमा आंबर्डेकर. मुंबई

खूप छान लिहीलं आहेस.
मी तुझा एक लेख वाचला की पुढच्याची  वाट पाहते.
— संध्या जंगले. मुंबई

इतकं सुंदर लिहिले आहेस!
— आरती नचनानी. ठाणे

६५ वर्षे : एक ससावलोकन…
या मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या आत्मचिंतनपर लेखावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत.

सर,आपले “ससावलोकन” वाचले.आपण जे भोगले ते फारच दुःखी कष्टी आयुष्य होते, आपले दुःख वाचून डोळे पाणावले. आपला संघर्ष फारच मोठा आहे. आपण हे भोगले म्हणूनच आता आपली ही लेखणी गरीब, दिनदुबळे, सामाजिक भान असलेल्या सर्वांसाठी सरसावते व त्यांच्या कलागुणांना, त्यांच्या जगण्याला न्याय देते.
आपणाला उदंड आयुष्य लाभो, ही प्रार्थना.🙏
— नितीन सोनवणे. मुख्य छायाचित्रकार, इकॉनॉमिक टाईम्स, मुंबई.

आदरणीय साहेब..
आपले ससावलोकन वाचून मी खुप सद्गगतीत, भावनाविवश झालो..
एका अष्टपैलू व्यक्तीमत्वाला, प्रेरणास्थान असणार्‍या आम्हा सर्वांकडून आपणांस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..
तुमचे समर्पण, ओढवलेल्या अनेक प्रसंगांना धैर्याने सामोरे गेलेले आपण, तुमचा दृढनिश्चय, आम्हाला दररोज प्रेरणा देतो.. आम्हाला प्रेरणा देणार्‍या, बहुमोल मार्गदर्शन करणार्‍या प्रिय साहेबांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.. पुढील अनेक वर्षे  तुम्हाला आनंद, सुख समृद्धी, यश आणि  आरोग्य घेवुन येवो..
..हॅट् स आॅफ..
— रवींद्र कुसुम मधुकर घोगे व परिवार, सिन्नर.

खूप भावनाप्रधान लेख आहे सर तुमचा. आयुष्यात किती मृत्यू बघितले. खरंच माणूस यांनी तर संपून जातो पण तुम्ही स्वतःला उभारुन इतकं सगळं काही केलंत. खरंच करावं तितकं तुमचं कौतुक कमी आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला आणि “ससावलोकन”  हा शब्द मला खूपच आवडला.
— शुभांगी गान. ठाणे

“ससावलोकन”आणि “सेवाभावी देवेंद्र भुजबळ” हे दोन्हीही लेख कोणत्याही सामान्य माणसाला तोंडात बोटे घालण्यास लावतील इतके अर्थपूर्ण, प्रेरणादायी आहेत. इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत माणूस यशाची एवढी उत्तुंग शिखरे पादाक्रांत करतो, हे नुसतेच कौतुकास्पद नाही तर तो एक वस्तुपाठ आहे.प्रत्येकाने काहीतरी शिकावे यातून हीच मनोकामना आणि आपल्याला वाढदिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा.

ओक सरांचा लेख आवडला. गंमत वाटली की आपण यांची शब्दकोडी सोडवत होतो त्या काळात. हवाईदलात असूनही तिन्ही भाषांवर प्रभुत्व खूप छान वाटले वाचून. फजिती पण मजेदारच.

आजच्या दिनाचे औचित्य साधून रश्मीजींनी लिहिलेली कविता योग्यच आहे. आवडली.
— स्वाती वर्तक. मुंबई

वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा !
शतायुषी भव! शुभंभवतु ! १९६६ साली माझी मानसिक अवस्था तुमच्या सारखीच झाली होती. निमित्त होते मला कावीळ होण्याचे. तेव्हा मी के.सी.कॉलेजमध्ये इंटरच्या वर्गात मंत्रालयात नोकरी करून मॉर्निंग कॉलेजला शिकत होतो. आमच्या कॉलेजच्या मराठी वाङ्ममय मंडळाचे गॅदरिंग होते. त्या दरम्यान मला कावीळ होऊन बरी झाल्याचे निदान झाले होते. पण औषध व पथ्यपाणी चालूच होते. गॅदरिंग संपल्यानंतर आम्हा मित्रांचा चहापाण्याचा कार्यक्रम चालू चालू झाला. मी बरे नसल्याने फक्त चहाच घेण्याचे जाहीर केले. पण मित्र ऐकेनात. त्यांच्या आग्रहास्तव चिवड्याचे तीन-चार घासच घेतले आणि नंतर कार्यक्रम संपला. घरी येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच मला भयंकर ताप भरला. घरातल्यांनी डॉ.कडे नेले. डॉ.नी तपासून सांगितले, कावीळ उलटली आहे… मी औषध देतो, पण गॅरंटी नाही. हे ऐकून माझी काय अवस्था झाली असेल त्याची कल्पना करावी. संपूर्ण आत्मविश्वास गेला होता. वय अवघे २६ वर्षे. भविष्यात रंगवलेल्या सर्व स्वप्नांचा चुराडा होणार होता. पण ईश्वरी इच्छा वेगळीच असावी असे आता वाटते. पण तेव्हा माझी मनोवस्था काय झाली असेल ? काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल. तेव्हापासून जीवनाचे सिंहावलोकन करायचे मी सोडून दिले आहे. जे मिळाले ते त्या जगन्नियंत्याच्या इच्छेने व जे मिळणार आहे तेही त्याच्या इच्छेने असे समजतो. त्यामुळे नैराश्य येतं नाही. गेल्या महिन्यात १५ तारखेला माझा सख्खा पुतण्या थोड्याशा आजाराने निधन पावला. ज्याला अंगाखांद्यावर खेळवले त्याला आपल्या हयातीत अग्नी दिल्याचे पहावे लागले यापेक्षा दुर्दैव ते काय ? कालाय तस्मै नमः एवढेच म्हणणे आपल्या हातात आहे. अशा अनेक दुर्दैवी घटना आयुष्यात घडतच असतात. म्हणून म्हणतात, “झाल्याविशी शोक ज्ञानवंत न जाणती”. गीताई -श्री.विनोबाजी भावे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे.
— ब. रा. देशपांडे. निवृत्त उप सचिव, महाराष्ट्र शासन

सर, आपल्याला जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा 🌹आपला ६५ वर्षे : एक ससावलोकन… हा लेख वाचला. आपण शेवटी शुभेच्छा आनंदाने स्विकारुन इतरांना आनंद द्यावा असे लिहीले आहे. ते बरोबरच आहे. पण हा लेख वाचून आनंद होण्याऐवजी थोडीशी मायुसी वाटली, थोडेसे निगेटिव्ह फिलींग आले. माझ्या मते आपल्या मनात खूप काही साठले आहे, आपण ते आत्मचरित्राच्या रुपात लिहायला हवे, आपला पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, त्यामुळे अनेक महान व्यक्तिमत्वांशी झालेल्या भेटी, आपल्याला मिळालेले अनेक मानसन्मान, किती किती लिहीण्यासारखे आहे, समाजासाठी तो एक दस्तावेज ठरेल. आपण जरूर विचार करावा, आपली भाषाशैली सुध्दा किती प्रभावी आहे हे सर्वच जाणतात. यावर आपण गांभीर्याने विचार कराल अशा प्रार्थनेसह पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा, जीवेत शरद: शतम् !
— आशा कुळकर्णी. मुंबई

ससावलोकन ६५..
मागे वळून पाहताना अनेक प्रश्न पडतात. इथवर कसे काय आलो ?  अटल आहे सारे. इथे फुलांना आहे मरण आणि दगड आहे, चिरंजीवी.
हसत जगारे, फुलत  जगारे
नटलेल्या या जगात..
🌙🌙💖💖..
— रवी वाडकर. नवी मुंबई

देवेन्द्रजी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दूरदर्शनसारख्या प्रकाशझोतात असलेल्या आणि कार्यक्रमांचे निर्माते म्हणून आपली कल्पकता, आपलं व्हिजन, आपलं वेगळेपण दाखवतं असतानाच माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून मंत्रालयात आपलं येणं हे आमच्या विभागाच्या दृष्टीने एक वरदहस्तच ठरलं. त्यांच्या अनुभवी नजरेचा आणि कल्पकतेचा, दूरदर्शनवरील अनुभवांचा प्रसिध्दी विभागातील नवनवीन उपक्रमांसाठी फारच उपयोग झाला, एक नवीन दृष्टिकोन मिळाला.
माहिती खात्यातील चौकटीत काम करणार्‍या भुजबळांना सेवानिवृत्तीनंतर तर आकाश ठेंगणं झालं आहे. काय करू आणि किती करू अशी मानसिकता झाली आहे. पुस्तकं लिहिणं, ती प्रकाशित करणं, विविध विचारांच्या लोकांचे लोकप्रिय विचार, त्यांच्या मुलाखती घेऊन आपल्या ब्लॉगवर अखंडितपणे प्रकाशित करणं, याबरोबरच देशातचं नव्हे तर परदेशात जाऊनही  साहित्य संमेलनात नामवंत सद्पुरूषांचे  विचार ठामपणे मांडणे, संवादसत्रातून युवा जागृतीला हातभार लावणे यासारखे अनेक उपक्रम आता त्यांनी यशस्वीपणे हाती घेतले आहेत आणि ते अधिक उत्साहाने  पार पडत आहेत आणि त्यात त्यांना त्यांची सुदैवी, सुविद्य पत्नीचीही साथ लाभली आहे हे विशेष.
“खूप काही केलं परंतु अजूनही खूप काही करायचं बाकी आहे”, या उत्साहात असलेल्या देवेन्दजींना त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा. 💐
— वीणा गावडे.
मा.मुख्यमंत्र्यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.

श्रीयुत देवेंद्रजी भुजबळसाहेब,
आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.
देवेंद्रजी ४,जुलै हा आपला वाढ दिवस. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना देखील ४, जुलै. आपण देखील एक चालते बोलते विद्यापीठच आहात. न्यूज स्टोरी टुडे च्या माध्यमातून वर्तमानाचे ज्ञान आणि ज्ञानाचा प्रसार करून त्यांना समृद्ध करीत आहात.
खरं तर सरकार दरबारी उच्च पदावरून सन्मानाने निवृत्त झालात. आणि निवृत्त झाल्यानंतर नंतरही आपल्या  कामातील उत्साह, धडाका आणि जनसंपर्क पाहून थक्क व्हायला होते. आपला जीवनपट पाहिला तर आपला प्रवास सामान्य कुटुंबातून सुरू झाला. अनेक कटु अनुभव आले. अनंत अडचणीतून मार्ग काढून, यश अपयशाची पर्वा न करता धैर्य, साहस आणि धाडस या जोरावर आपण यशस्वी जीवन जगताना स्वतःला सुखी आणि समृद्ध बनवले आणि इथेच न थांबता इतरांना ही समृद्ध करीत सामाजिक बांधिलकी जपली. आपली व्याख्याने नवीन पिढीस प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरत आहेत अनेकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. व्यवसायभिमुख शिक्षण सुलभ झाले आहे.
न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टल सुरू करून संपादकीय कार्य सुरू केले. आपण व अलकाताई या माध्यमातून मोठी मेहनत घेत आहात .यातूनच जनसंपर्क आणि जनजागृती बरोबरच नवनवीन माहिती उपलब्ध करून देत आहात आणि यातूनच इतरांना ऊर्जा प्रेरणा मिळत असते.
आपणास वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा देतानाच आपणास उदंड आयुष्य लाभो, सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच आम्हा सर्वांची स्वामी चरणी प्रार्थना.
🌹🍿🍿🪷🎂🎂🌹
— दीपक जवकर. डोंबिवली
१०
“ससावलोकन” काळजाला भिडलं …
— अनुजा देशपांडे. निवृत्त दूरदर्शन निर्माती, पुणे
११
भुजबळ साहेबांनी लिहिलेले “ससावलोकन” व मारुती विश्वासराव यांचा “सेवाभावी देवेंद्र भुजबळ” हे दोन्ही लेख खुप वाचनीय आहेत. ससावलोकन मधून देवेंद्रजींचा मिश्किल स्वभाव व जमिनीवर असणारे पाय हे कॉम्बिनेशन खुपच मनोरंजक वाटले. सरळ सुबोध लिखाण पण खूपच आवडले.
सेवाभावी मधून उमजलेला त्यांचा जीवन संघर्ष पाहता व मिळालेले लोकांचे प्रेम व मानसन्मान बघून अशी व्यक्ती आपल्या परिचयाची आहे याचा आभिमान वाटतो.
त्याना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना…
ससावलोकनचे पुढील भाग वाचायला पण आवडतील.
— रेखा जोशी. नवी मुंबई
१२
नमस्कार सर,
तब्येत बरी नसल्याने आपणास वाढदिवसानिमित्त वाढीव दिवस घेऊन आभाळभर शुभेच्छा देते. आपणास दीर्घायुरारोग्य लाभो. आपले ससावलोकन वाचले. आपल्या आयुष्यात खरोखरच सश्याच्या काळजीसारखे प्रसंग घडले आहेत. आपला ‘ससावलोकन’ हा शब्द खूपच आवडला.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
१३
जिवेत: ! शरद: !! शतम् !!!🌹…..
मा.श्री.देवेंद्रजी भुजबळ साहेब,
प्रसार माध्यमं आणि समाज माध्यमांद्वारे  समाजकल्याणासाठी सातत्याने आपलंअमूल्य योगदान देणारे “न्यूज स्टोरी टुडे वेबपोर्टल” या आंतरराष्ट्रीय पोर्टलचे  निर्माते… हे न्यूज पोर्टल… जगातील  नव्वद देशांमध्ये प्रसारीत होतो… आपल्या पोर्टलच्या माध्यामातून, देशातील आणि जगभरातील वाचकांना, युवा लेखकांना, पत्रकारीतेमध्ये आपलं भविष्य घडविणाऱ्या मंडळीना आपल्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारे…. वृत्तपत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अश्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे … आणि… ज्यांनी आपल्या जादुई लेखणीतून अनेक प्रेरणादायी पुस्तकांचे लेखन करून समाजातील वंचित घटकांकरिता कार्य करत असतानां ज्यांना…. व्यावसायिक नैपुण्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे… एक उत्तम लेखक, पत्रकार… बहुआयामी व्यक्तिरेखा असलेलं व्यक्तिमत्त्व  !…
माहिती महासंचालनालयाचे निवृत्त संचालक, आमचे आदरणीय मा.श्री. देवेंद्रजी भुजबळ  साहेब,
आपणांस जन्मदिनानिमित्त उदंड निरोगी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा  !!…GOD BLESSED YOU  💐
शुभेच्छुक,
— अनिल ज. घरत (उरण तालुका सचिव)
आगरी, कोळी, कराडी संघर्ष सा. संस्था, महाराष्ट्र राज्य

स्वाती वर्तक मॅडम यांनी काढलेले चित्र पुढे देत आहे…

चित्रकार स्वाती वर्तक यांनी माझे चित्र काढून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या!आभारासाठी शब्द अपुरे आहेत..

माझी जडणघडण भाग ५५ अभिप्राय….

वाचताना खूप मजा येते.  तुझ्या आधीच्या प्रवासात आम्ही साक्षी होतो. पण हा प्रवास आम्हाला या लेखमालेच्या रुपाने उलगडतोय.
— अंजोर चाफेकर. मुंबई

आज बरेच दिवसांनी ‘जडण घडण’ आली ! आयुष्याचा हा महत्त्वाचा टप्पा होता.स्वतंत्र संसार सुरू करणे, तो ही स्वतः च्या जिवावर ! आता हे आठवून छान वाटत असेल पण तेव्हा तो एक धाडसी निर्णय होता ना !
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

फारच छान वाटले हा भाग वाचताना. ब्रुकबाॅंड काॅलनीतल्या जुन्या सर्व गोष्टींचा चित्रपट पाहिल्यासारखे वाटले क्षणभर. मुख्य म्हणजे तुम्ही जळगावला कसे आलात, ब्रुकबाॅंड काॅलनीत भाड्याचे घर कसे मिळवलेत हे आता समजले.लिहितच रहा.अगदी चित्रपट कथा वाटते.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

मी सोमवारची आतूरतेने वाट बघत असते. आजचे  स्थलांतर…  too good. I feel if all the Monday write ups joint together, it will make your life story.👌🏻
— संध्या जंगले. मुंबई

संसार, करीअर  सुरूवात छान झाली.. छान लिहिले आहे राधिकाताई
— छाया मठकर. पुणे

स्थलांतर  वाचले. खोल पाण्यात बुडलेल्या खडकाने अचानक डोकं वर काढाव तस वाटलं. पण या सर्व आठवणी अंगावर प्रेमाचे रोमांच आणतात. .तू लिहीलेस्या सर्व घटना माझ्याबाबतीत सारख्या घडल्या व त्या काळात किती साम्य होतं याच नवल वाटलं. माझ्या वडिलांची बदलीची नोकरी होती. त्यामुळे प्रत्येकच तीन वर्षानी बदली व्हायची.  त्यामुळे स्थलांतराचा पुन्हा प्रत्यय आला. तुझे सर्व लेख जुन्या आठवणींना ऊजाळा देणारे आहेत. लिहीत राहा व आनंद देत राहा .
— रेखा राव. विलेपार्ले, मुंबई

प्रभाताईची (लीना फाटक, यू. के.) *“डिझायनर मी”*

एक स्वप्नरंजन, विचारधन, ऊत्तमातील ऊत्तम याची निवड करता करता होणारी मानसिक आंदोलने वाचत असतांना, जागतिक ऊत्कृष्ठ कारागिरी केलेले, सर्व  क्षेत्रातील परमेश्वर निर्मित मानवी “डिझाइन्स”, आपल्याला त्यांची समर्थ लेखणी उलगडून, दाखवून थक्क करुन सोडते.
शेवटी मी म्हणेन कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीने संशोधक आणि शास्त्रज्ञ काय करतील ते बघू. पण आज वरील लेखनातून एक या स्वप्ननिर्माती गोड स्वभावाची प्रभाताई-डिझायनर  मला खूप आवडली.  📖🖊️
— सुनंदा रानडे.

“डिझायनर मी”…
सुरेख कल्पना आणि मनात आले तरी प्रत्यक्ष कागदावर उतरवणे हे अवघड काम तू अगदी लीलया केले आहेस. मस्त 👌👌आवडले.
— सौ शैला गोखले. अमेरिका

खूप छान लेख, अतिशय भावपूर्ण चित्रण व विश्लेषण
— निरंजन केतकर. मुंबई

खूपच छान आहे लेख,वेगळा विषय खूप छान मांडला आहेस,ताई.
— अनुराधा मराठे. पुणे

खूप वेगळाच व सुंदर लेख आहे👌🙏
— सौ जया देव. यु.के.

छान आहे लेख.. मजा आली वाचायला 🤣 आमच्या शाळेच्या ग्रुप वर पाठवू का ?
— हेमंत फाटक. औंध, पुणे

वा स्वतःला डिझाईन करण मस्त कल्पना ! छान झाला लेख. ओघवतति. वर्णन पण मस्त जमलं.असच लिहित जा.
— नीता मोहिदेकर. वाशी, नवी मुंबई

अशी आयडिया मनात येण हेच विशेष आहे, त्यानुसार लेख पण इंटरेस्टिंग झालाय.
हे AI प्रकरण मला तर पचतच नाहीय. आपण साधारण माहिती द्यायची आणि त्याने त्यावर कविता करून पाठवायची म्हणजे स्वतःची बुध्दी गहाण टाकण आहे. भावना हा प्रकारच संपून जाईल. लोक अधिकच रुक्ष होतील ..
— सुनंदा पानसे. पुणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments