नमस्कार मंडळी.
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे न्यूज स्टोरी टुडे पोर्टल ने २२ जुलै २०२५ रोजी ५ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. याबद्दलचा आढावा कालच्या अंकात घेण्यात आला आहे. त्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. आपण त्या पुढील प्रसिद्ध करीत आहोत. या निमित्ताने आपणास आवाहन करण्यात येते की, आपले पोर्टल अधिक वाचनीय,उपयुक्त ठरण्यासाठी आपल्या काही कल्पना, सूचना असल्यास आपण त्या अवश्य कळवा.
आता वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
देवेंद्र भुजबळ यांचा याकूब सईद यांच्यावरील लेख खूपच छान आहे. दूरदर्शनचे पूर्वीचे दिवस आठवले. आम्ही तेव्हा शाळकरी मुली होतो.
— प्रिया गडकरी. कर्जत.
२
“वृध्दाश्रम : काळाची गरज” हा लेख सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर चांगलाच प्रकाश टाकतो. ज्या भारतीय संस्कृतीत “मातृऋण, पित्रृऋण व आचार्यॠण हे कधी फिटत नसते, ते त्यांची शेवटपर्यंत सेवा करूनच थोडे हलके होते अशी धारणा अथवा श्रध्दा आहे त्या भरतभूमीचे हे उदात्तीकरण म्हणायचे की अंध:पतन असा संभ्रम निर्माण होतो. म्हणून वृध्दाश्रम ही काळाची गरज म्हणायचे की कर्तव्यापासून पलायन म्हणायचे असा डायलेमा सध्याच्या पिढीपुढे उभा आहे. जी संस्कारित पिढी आहे ती कर्तव्य समजते पण जी स्वतःला उच्चभ्रू समजते ती मात्र वृध्दाश्रमासारख्या पळवाटा शोधते आणि आपण कसे कर्तव्यदक्ष आहोत हे जगाला भासवते. म्हणून ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी ती गरज आहे. पण इतरांसाठी ती पळवाट आहे. उदाहरणार्थ एक दोन-तीन एकर जमीन असलेला शेतकरी भागत नसल्यास रोजगार हमी योजनेच्या कामावर कष्टाची कामे करून कुटुंबाचे उदरभरण करेल पण आईवडिलांना वृध्दाश्रमात ठेवल्याचे उदाहरण माझ्या तरी पाहण्यात आले नाही.
बघा साधकबाधक विचार करून तुम्हाला काय वाटते ?
— ब रा देशपांडे. डोंबिवली
३
याकूब सईद यांच्याबद्दल उत्तम लेख. खूप जुन्या आठवणीत रमायला झाले. सासूबाई त्या मालिका आवडीने बघत असत.
रेषांमधली भाषा मला नेहमीच आवडते. शैलेशजीचे अभिनंदन. चित्रातील नेमके बारकावे टिपतात ते.
मोनिका आणि कोमल बद्दल वाचून भावविवश झाले. आपल्या समाजातील ही गरीब श्रीमंत दरी, गरिबीमुळे बालकांना सोडून देणे सारेच अतर्क्य. लवकरच त्यांचे चांगले पालक मिळोत ही शुभेच्छा.
उपेंद्रजींचा लेख खूप खूप वास्तववादी आहे. रोचक असून गंभीर विषयाला हात घालणारा आहे. आवडला.
— स्वाती वर्तक. मुंबई
४
उपेंद्र कुलकर्णी यांच्या सांगा, कसं जगायचं ? वर लगेंच खाली हेमंत भिडे यांनी दिलेले सुरेख उत्तर. 👌🏻
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
५
नमस्कार देवेंद्र,
आजचा तुमचा ‘असे होते, डॅा दीपक टिळक‘ लेख वाचला. तुमचे खास अनुभव वाचायला आवडले. तुम्ही नशीबवान आहात. डॅा दीपक टिळक यांच्या बरोबर अमूल्य वेळ काढण्याची संधी मिळाली. साधी राहणी पण उच्च विचारसरणी अशा महान व्यक्तीबरोबर संपर्कात राहणे ह्यासाठी भाग्य लागते. तुम्ही भाग्यवान आहात.
धन्यवाद,
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका.
६
वा असे होते डाॅ. दिपक टिळक… सुंदर लेख.
— तेजश्री सहस्त्रबुद्धे. केनिया
७
दीपकजी टिळक यांना अनेक वेळा भेटलो. त्यांचे वडिल जयंतराव टिळक हे सभापती होते ; त्यावेळी विधान भवनात त्यांनाही भेटलो होतो. दीपकजींचा स्वभाव शांत, संयमी होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात त्यांनी खुप बदल केले आणि आणखी विस्तार केला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
— गणेश जोशी. व्यंगचित्रकार, ठाणे
८
डॉ दीपक टिळक या महनीय व्यक्तीचा परिचय तुम्ही अतिशय सुंदररित्या करून दिला.
— शुभांगी गान. ठाणे
९
असे होते डॉ दीपक टिळक, अप्रतिम, सॅल्यूट 🫡
— प्रकाश कथले. ज्येष्ठ पत्रकार, वर्धा
१०
डॉक्टर दीपक टिळक यांच्या संदर्भातली मोलाची माहिती व आपला त्यांच्याशी असलेला संबंध/ संपर्क पाहून खूप आनंद वाटला.
डॉक्टर टिळकांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏾
— वसंत संख्ये. मुंबई
११
भारती सावंत यांचा ज्वलंत विषयावरील लेख सुरेख👌🏻 डॉक्टर दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक.. खूप छान भाषण आणि कार्यक्रम जोरदार झालेला दिसतोय.अभिनंदन.
शुभदा डावरे चिंधडे यांच्या लेखात उल्लेख झालेले अहिल्यानगर येथील सावेडी मधील श्री क्षीरसागर महाराज हे माझा भाऊ महेश कलबुर्गे यांचेही गुरु आहेत. प्रचंड श्रद्धा आहे त्याची. आम्हीही बरेचवेळा दत्त मंदीर आणि मठात जातो. शांत आणि प्रसन्न वाटते खूप.🙏
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
१२
जीवनासाठी समतोल आवश्यक चांगले सांगितले आहे विकसित महाराष्ट्र मध्ये नोंदवून झाले आहे…
श्री ओकजींचे अनुभव विविध असतात वाचनीय असतात .. आज तांबरम मधील कोर्ट साक्ष जबान्या, तक्रार स्वतःच मागे फिरवणे यात अडकणे… हे सर्व प्रत्येक क्षेत्रात चालू असलेले वाचून खंत वाटते
चिंतन … वाचनीय
अरुणजींची कविता सुरेख आहे.
— स्वाती वर्तक. मुंबई
१३
श्री मारुती विश्वासराव यांचा ‘आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक’ हा वृत्तांत समजून घ्यावा असा आहे. मा. देवेंद्र भुजबळ यांच्या सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघात ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर झालेल्या व्याख्यानावरील हा वृत्तांत आहे. खरंच, मा. देवेंद्र सरांच्या ‘आनंदी जीवनाची तत्त्वे अगदी सहज आचरणात आणण्याजोगी आहेत. दुसऱ्यांना दुःख न देता स्वतः आनंद घेताना नातेवाईक व इतरांमध्ये तो वाटणे, योग्य आहार, विहार, व्यायाम व झोप, आनंद मिळेल असा एखादा छंद, आर्थिक हाव न धरणे आणि सर्वात मुख्य म्हणजे, आहे त्यात समाधान बाळगणे. आनंदाची ही गुरुकिल्ली वापरुन आपण सारे आनंदी होऊया.
विंग कमांडर शशिकांत ओक यांच्या हवाईदलातील आठवणी अतिशय वाचनीय असतात. “तांबरम” ला प्रमोशनवर गेल्यानंतर अंगावर टाकण्यात आलेल्या एकावर एक जबाबदाऱ्यांचे ओझे त्यानी कसे पेलले याचे सुंदर शब्दचित्र खरोखरच या लेखात पाहायला मिळते.
शुभदाताईंचा ‘चिंतन’ हा लेख खरोखरच चिंतन करण्याजोगाच ! लहानपणापासून अध्यात्माचे संस्कार कसे घडत जातात हे छान विशद केले आहे.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
१४
Beautiful and useful thoughts. Sorrows when shared it decreases as against this when we share joys & happiness, it multiplies its a universal truth revealed in ur speech. “Pyar batate chalo “song has the meaning, if one follows this mantra, u are the happiest person 👍
कुठे नेऊन ठेवलाय, महाराष्ट्र ?
https://newsstorytoday.com/कुठे-नेऊन-ठेवलाय-महाराष्/
Atleast some one painted the picture of dirty pilitical scenario in State rather similar is the case all over the country while press, people’s representative or even inteligencia who is expected to speak are keeping mum. Authors like Joshiji is the need of the hr. Salute to his candid way of speaking truth. Also my compliments to our editor Bhujbal sir n Alka vahini for giving space to speak over on our portal 🙏👍
— Ranjitsinh Chandel. Yeotmal.
१५
किरणजी,
ग्राहकांसाठी खूप छान कार्य करीत आहेत. शिवाय पत्रकारिता !
फलटणच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत. आजीकडे जाताना एसटी फलटण नाक्यावर थांबायची. मग सारे जण उतरून पाय मोकळे करायचो. जांभळे, करवंदे विकायला आलेली असायची. तसेच उसाचा रस ! तिथल्या झाडाखाली एसटी सुटेपर्यंत आम्ही खूप खेळायचो. त्यामुळे खूप दिवसांनी फलटणचे नाव वाचून उत्सुकता निर्माण झाली. फलटणबद्दल बातम्या वाचताना आणि अशा आठवणीतल्या फलटण येथील लोकांसाठी किरणजी खूप काम करीत आहेत हे वाचून आनंद झाला आणि त्यांच्याबद्दल जिव्हाळाही वाटला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
— नीला बर्वे. सिंगापूर
राधिका भांडारकर लिखित माझी जडणघडण भाग ५७ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया …
१
चारूचे व्यक्तीचित्र अगदी हुबेहूब रंगवलं आहेस. आजही चारू डोळ्यासमोर आहे. तिचं गोड आवाजातलं बोलणं माझ्या कानात आजही घुमतं आहे.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
२
मैत्रिणींबाबतीत राधिकाताई तुम्ही खरेच श्रीमंत आहात.
— छाया मठकर. पुणे
३
मस्त आठवणी. लाकडी पेट्या रचून त्यावर गादी टाकून केलेली बैठक व पलंग. माझ्या आईनेही अशीच केलेली, त्यावर फ्रील लावून घरी शिवलेला कव्हर कोपऱ्यातील पेटीवर टेबल क्लॉथ घालून त्यावर ठेवलेली फुलदाणी आठवली. त्यात बाभळीच्या काट्याना रंग लावून त्यात खोचलेसे रंगीबेरंगी मणी डोळ्यासमोर ऊभे राहिले. जुन्या ग्रामोफोनच्या रेकॉर्डस रंगवून त्यावर पेंट केलेली निसर्गचित्र आठवली. वडिलांची दर तीन वर्षानी छोट्या गावात बदली व्हायची त्यामुळे जे मिळेल त्याचा उपयोग करून सजावट करायची. खरच माझी आई सौ हिरा कर्नाड खूप हुशार गुणी बहुश्रुत लेखिका, कवियत्री नृत्यांगना, दिग्दर्शिका, ऊत्तम गृहीणी होती. खूप अभिमान वाटतो तिचा. चारूचं व्यक्तिमत्व छानच रंगवलय. डोळ्यापूढे उभी राहते.
— रेखा राव. मुंबई
४
राधिका चारू /दीदी .. खूपच छान लिहिले आहेस. Anju n me always used to say that in Jalgaon , she has made her own place with her own character. I still remember her red carpet, her wicker sofas and how she used to take care of everything. Very nice
— संध्या जंगले. मुंबई (चारुची धाकटी बहीण)
५
Thanks Bimba. (Radhika) You are the first person to appreciate me. I feel very proud that still (77 yrs) my friends remember me.🙏🙏
— सुषमा पालकर. पुणे
६
बालपण छानच असतं नेहमी. मस्त !
— सुमती पवार. नाशिक
७
खूपच छान लिहिता तुम्ही. प्रतिक्रिया छानच येतील. तुमचं सहज सोपं लिखाण छान वाटतं वाचायला. समोर सगळं घडतं आहे असं वाटतं.
— प्रज्ञा मिरासदार. पुणे
८
चारूवरचा लेख आत्ताच वाचला.. आवडला..
— सुचेता खेर. पुणे
९
राधिका, चारुबद्दल तू खूपच छान लिहिले आहेस. अगदी हुबेहुब चारूचे वर्णन केले आहेस. मला खूपच आवडले. त्यादिवशी तिची खूप आठवण आली आणि आपले जळगावचे सुंदर दिवस आठवले. वो भी क्या दिन थे !
— जयश्री कोतवाल. पुणे
१०
— ‘ चारू ‘ —
लहानपणीच्या आठवणी लिहितांना अगदी बालवयात शिरली होतीस त्यामुळे शाळकरी मुलीने मैत्रिण वर निबंध लिहिला आहे असं वाटलं माझ्या मनाला, गमतीशीरच ना ?
पुढे चारूबद्दल लिहितांना तिच्या आठवणीत हरवून गेलीस. तिच्या व्यक्तीमत्वातील वेगळेपण छानच रंगवलं आहेस.
— अनुपमा. 😊🌹💕मुंबई
११
खरच, चारू अगदी अशीच होती. माझ्या कपाळावरची टिकली तिला इतकी आवडली होती, की मी तिला माझ्याजवळचं पूर्ण पॅकेटच देऊन टाकलं, काय खूश झाली होती ती तेव्हा ! म्हणाली, मला प्रत्येक साडीवर मॅचिंग टिकली लावता येईल, ते पॅकेटही तिने खूप जपून ठेवले होते. त्यावेळी मोबाईल नव्हते, नाहीतर टिकली लावलेला फोटोही पाठवला असता. ती गायची पण सुरेख !
— आरती नचनानी. ठाणे
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800