Wednesday, August 6, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे, आपल्या पोर्टल ला २२ जुलै रोजी ५ वर्षे पूर्ण झाली, याचा खूप आनंद होत आहे. लेखकांनी, कवींनी कितीही चांगले,सकस, दर्जेदार लिहिले तरी त्या लेखनाला वाचकांची दाद नसेल, प्रतिसाद नसेल तर लिहिणारी व्यक्ती नाउमेद होऊ शकते. त्यामुळे कुठल्याही कलाकारासाठी प्रेक्षकांची दाद जशी महत्वाची असते, तशीच दाद लेखक, कवी यांच्यासाठी असते. म्हणूनच जेव्हा वाचक मंडळी भरभरून प्रतिसाद देतात,तेव्हा केवळ त्या लेखक, कवी यांनाच नाही तर तो आनंद सर्व टीम एन एस टी ला होत असतो, कारण सर्व श्रम सार्थकी लागल्याचे ते द्योतक असते. आपला लोभ असाच कायम असू द्या.
काही अपरिहार्य कारणामुळे आपले शुक्रवार, शनिवारचे पोर्टल प्रसिद्ध होऊ शकले नाही, याबद्दल क्षमस्व.
आता पाहू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)


लेख वाचून कळले.
पाच वर्षांचे आनंददायी मार्गक्रमण. मान्यवरांचे अभिनंदन 🙏⭐.
— विजया केळकर. हैदराबाद.

सर, आपल्या दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदनऽऽऽ !! 🙏🌹🚩
— कवी विलास देवळेकर. मुंबई.

मा देवेंद्रजी,
आपल्या पोर्टलला पाच वर्षे पूर्ण झाली या साठी आपले मनःपूर्वक अभिनंदन.
लवकरच सुरु होणाऱ्या यु ट्यूब वहिनीला वासंतिक शुभेच्छा….
आपण, माझे बरेचसे लेखन पोर्टलवर प्रसिद्ध केले आहे, याचा ही आनंद मला मनस्वी खूप आहे.
कळावे
आपलाच ….
— अरुण पुराणिक.

आनंददायी ५ वर्षे..
खूपच छान.
मनापासून अभिनंदन.
— वंदन कुलकर्णी. निवृत्त दूरदर्शन निर्माता.

न्यूज स्टोरी टुडे वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !🌿💐🌿
गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा वृत्तांत वाचताना मन आत्यंतिक आदराने भरून आले. किती अफाट कामगिरी आहे !Great 🙏
— नीला बर्वे. सिंगापूर

नमस्कार.
छान वाचनीय आहे अंक. आपल्या सर्वांच्या ‘न्यूज स्टोरी टुडे’चे हार्दिक अभिनंदन. आपल्या समस्त परिवारास (पोर्टलसह) निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई

न्यूज स्टोरी टुडे, युट्युब वाहिनीचे मनःपूर्वक अभिनंदन.
— अनिल दस्तुरकर. नांदेड

सर पाच वर्षाच्या ह्या आनंददायी प्रवासाबद्दल खूप खूप शुभेच्छा.
— शुभांगी गान. ठाणे

देवेंद्रजी, आपण आपल्या मिसेसच्या सहकार्याने सुरू केलेल्या “न्यूज स्टोरी टुडे “पोर्टलला हा हा म्हणता पाच वर्षे पूर्ण झाली. अतिशय कौतुकास्पद आणि अभिनंदनीय गोष्ट आहे ही. तुम्हा उभयतांचं मनःपूर्वक अभिनंदन.
या पोर्टलच्या माध्यमातून नुसतंचं मनोरंजन ही संकल्पना आपण ठेवली नाही हे याचं वैशिष्ट्य आहे, ज्याचा आवर्जून उल्लेख करायलाचं हवा. मनोरंजन करणारी अनेक पोर्टल आपण समाजमाध्यमांवर पाहातो परंतु विधायक कामांची माहिती देणारं, आपल्या ज्ञानात भर पाडणारं, बौध्दिक देणारं त्याचंबरोबर जे समाजापुढे येऊ शकलं नाही पण येणं गरजेचं आहे अशी व्यक्ती महता, वैचारिक लेख, ऐतिहासिक माहिती अशा गोष्टींना तुम्ही तुमच्या पोर्टलच्या माध्यमातून समाजापुढे आणल्यात आणि त्यामुळे तुमच्या पोर्टलला देशविदेशातून वाचकही मिळालेत आणि अनेक वैचारिक लेख लिहीणारे लेखक, लेखिका, कवीही मिळाले, ही मोठी जमेची बाजू आहे.
अशा या विविधांगी पोर्टलबरोबरचं आपण अनेक पुस्तकं लिहिलीत, प्रकाशित केलीत यामुळे एक सामाजिक भान राखल्याच्या जाणिवेतून तुम्हा उभयतांना अनेक पुरस्कार मिळाले, ही अत्यंत अभिमानाची, स्पृहणीय गोष्ट आहे.
आपला हा लेखन प्रवास असाच अव्याहतपणे सुरू राहावा, यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या नवीन संकल्पनांना यशाचे धुमारे फुटत राहोत हीच सदिच्छा. 👍💐💐💐
— वीणा गावडे.
मा. मुख्यमंत्र्यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी, मुंबई.
१०
Congratulations Dear sir for very successful five yrs n for its growing popularity. We are grateful to u both Alka vahini n u for giving such a knowledgeable and equally entertaining media platform.💐
— Ranjit Chandel. Yeotmal.
११
मा. सौ. अलकाताई आणि श्री देवेंद्र भुजबळ सर यांना
स. न. वि. वि.
आपले “आनंददायी पाच वर्षे ” वाचून आपणा उभयतांविषयी खूप खूप आदर, कौतुक, अभिमान वाटतो. मी आपले “न्यूज स्टोरी टुडे” नेहमी आनंद, उत्साहाने वाचत असते. या पाच वर्षात ज्या ज्या लेखक कवी आदींचा सहभाग आहे त्यांचे अत्यंत मनःपूर्वक अभिनंदन ! अभिनंदन !!
आपण करीत असलेल्या नवीन उपक्रमास माझ्या अनेक शुभेच्छा !! पुनश्च आपणा उभयतांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!
— श्रीमती अलका रामचंद्र मोहोळकर. पंढरपूर.
१२
सगळेच लेख उत्तम.
‘दाद ‘ला दाद द्यावीच लागेल !
— प्रा सुनीता पाठक. छ. संभाजीनगर
१३
श्री सुनील चिटणीस यांनी लिहिलेले “दाद.. “स्फुट आवडलं…खरी दाद कोणती ते आप्पासाहेब वैद्यांना अंध स्त्री ने दिलेली तर भीमसेनजींना मंचावर जाऊन अंगठी बहाल करणारी…किती हृद्य…! आजकाल तर नुसता ..एक अंगठा ..दाखवून ही दाद दिली जाते.

मीना ताईंचा श्रावण अगदी अंतरंग सुखे भिजवून गेला.. किती अलवार शब्द.. किती प्रतिकं, रूपकं.. हळुवार

प्रीति लाड च्या कविता ही तशाच तरल सुरेल आहेत.

स्वराज्य, म्हणजे काय रे भाऊ ….? हा सुनील देशपांडे यांचा लेख खरोखर डोळ्यात अंजन घालणारा आहे.अवघड खरेच सोपे झाले आहे का ?

सुधीर शेरेजी यांचे विचार बरोबर आहेत. साहित्यिक संवेदनशील, दुःख शोधण्यास तयार असायलाच पाहिजे. तरच ते साहित्य मनाला भिडते

शुभांगी ताईंचा लेख वाचून जुने दिवस आठवले. गच्चीवर झोपणे, मच्छरदाणी लावणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे. छान. आवडले.

शोभाताईंची कथा अशीच बालपणी च्या गोष्टींमध्ये गुंतायला लावणारी. आवडली
— स्वाती वर्तक. मुंबई
१४
उत्तम! अप्रतिम! डोळ्यांतून दाद आली…!

“दाद” या एका शब्दाभोवती एवढा अफाट विचार, अनुभवांची मांडणी, विनोदाची झणझणीत फोडणी आणि तरीही अंतर्मुख करणारा आशय… हे खरंच कौतुकास्पद आहे!

आपण ‘दाद या शब्दाचे इतके पदर उलगडून दाखवले की वाचक नकळतच टाळ्या वाजवू लागतो — म्हणजेच खरी दाद!
▪️ टाळ्यांची दाद
▪️ दातांची दाद
▪️ दानाची दाद
▪️ दिखाऊ दाद
▪️ दिशाहीन दाद
▪️ आणि शेवटी पंडितजींसारख्या कलावंताला मिळणारी मौल्यवान दाद…
या सर्व प्रकारांना एकाच रचनेत बांधून वाचकाला अंतर्मुख करणं आणि चेहऱ्यावर हास्याचं कारंजं उडवणं — हे कोणत्याही लेखकाच्या शैलीचं मोठं यश आहे.
अशा लेखावर फक्त “वाहवा” म्हणणं हीच थोडीशी तोकडी दाद ठरेल…
म्हणून… “तुमच्या लेखणीतलीक ताकद वाचली…
टाळ्यांनी नाही तर मनाने दाद दिली.
— शहाबुद्दीन परकार. फुरूस, खेड जिल्हा रत्नागिरी.
१५
ते गेले नाहीत, आहेत !
Heart touching story.
— संगीता सातोसकर. मुंबई
१६
जबरदस्त लेख. हार्ट टचिंग.
ते गेले नाहीत, नक्कीच आहेत !
— विजू मोरे.

राधिका भांडारकर यांच्या ‘माझी जडणघडण’ भाग ५८ “पालकत्व ” वर प्राप्त झालेले अभिप्राय…..

फार सुंदर लेख !
मातृत्व, पितृत्व,पालकत्व यास कोणतेही पुस्तकी निकष लावता येत नाही हे अगदी पटले. मुलांना वाढविताना त्यांच्या कलाकलाने घ्यावेच लागते.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

पालकत्वाची पहिली परीक्षा, संपूर्ण पालकत्व तुम्ही पूर्ण 100%गुण मिळवून उत्तम उत्तीर्ण झाल्या आहात.
👌छान अनुभव कथन
— छाया मठकर. पुणे

खूपच छान, माझाच विषय.
मी ही मुलींना हेच सांगत असते. चांगली आई व्हा. आईपण भोगा. आईपणासारखा दुसरा आनंद नाही. मुलाच्या जवळ बसून त्यांचा अभ्यास घेणं यात पण किती आनंद आहे. शिवाय आपण त्यांना quality time देतोय याचेही समाधान मिळते.
— अंजोर चाफेकर. मुंबई

अगदी बरोबर 👌😊🙏
— अस्मिता पंडीत. पालघर

आपल्या लेखनाला इतकं समर्पक शीर्षक “पालकत्वाची परीक्षा” दिले आहे. सर्वच पात्रं वाचतांना डोळ्यासमोर उभी रहातात.प्रत्येक पिढीत होत असलेला बदलही योग्य रीतीने मांडला आहे.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर

खूप छान लेख.
— आरती नचनानी. ठाणे

नेहमी प्रमाणे जडणघडण विषय जिव्हाळ्याचा !
आपली मुलं लहान असताना काळजी हा एक मोठा विषय आपल्याजवळ असे.
घरामध्ये मिस्टर डॉक्टर असल्यामुळे मुलांच्या बाबतीत मी थोडी बिनधास्त असे. पण ज्या वेळी मी माहेरी जात असे आणि तिथे मुलांच्या तब्येती थोड्या जरी बिघडल्या की मी सगळ्या घरादाराला त्रास देत असे, कारण मला ह्यांच्यावर विसंबून राहायची सवय झाली होती.
आता ते दिवस आठवले की गंमत वाटते.आता तर नातवंडंही मोठी झाली आहेत..तीच मला सांभाळून घेतात!
— उज्वला सहस्त्रबुद्धे. दुबई

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. राधिकाताईंचा मातृत्वाचा अनुभव त्यातल्या नवखेपणा आणि मुलांची केलेली काळजी हे सगळं अनुभव सगळ्यांनाच येतात पण त्यामध्ये हळूहळू विचार कसा बदलतो अनुभव येतो आणि मग मुलांची वाढ निकोप पणे कशी करता येते हा वस्तू पाठ मिळतो मुलांच्या भावनांची कदर त्यांचा कल बघून त्यांना आवडेल असे शिक्षण देणे किंवा व्यवहारापुरतं शिक्षण देणे असं नसून सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा या दृष्टीने त्यांचे प्रयत्न त्यांच्या मुलींच्या यशाकडे बघून सार्थ ठरले असं लक्षात येतं पुढील भाग वाचायची उत्सुकता दरवेळी वाढते अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आणि खरोखरच पटेल असा शब्दांकन असतं निरीक्षण असतं आणि व्यक्त होणं असतं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !
संदीप सुरेंद्र भुजबळ on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !