नमस्कार, मंडळी.
एखादी व्यक्ती स्थलांतर का करते ? हा एक मोठाच प्रश्न आहे. अर्थात यास वेगवेगळी कारणं असतात. तरीही आपण जन्मतो, रुजतो, वाढतो तेथून निघून जाऊन इतरत्र विशेषतः परदेशात जायचं, तिथली भाषा, संस्कृती, जीवनशैली आत्मसात करायची आणि त्याच बरोबर आपली भाषा, संस्कृती टिकवून ठेवायची हे एक दिव्यच आहे. त्यातही पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी तर ते जास्तच आव्हानात्मक असते. असं सर्व असूनही गेली १५ वर्षे अमेरिकेत राहणाऱ्या डॉ गौरी जोशी कंसारा यांनी आपलं व्यक्तिमत्त्व घडवलं, ते फुलवलं आणि इतकंच नव्हे तर त्या इतरांना घडण्यासाठी कार्यरत आहेत. या बरोबरच त्यांचं मराठी भाषा, कवी, कविता यांच्या वरील प्रेम निरतिशय, निखळ आहे. म्हणूनच “अष्टपैलू गौरी” ही त्यांची प्रेरणादायी कथा वाचकांना खूप आवडली.
प्रा प्रतिभा सराफ यांनी २० वर्षे पाठपुरावा करून, संशोधन करून लिहिलेला “आम्ही चेंबूरकर” ही वाचकांनी उचलून धरला आहे.
या आठवड्यात प्राप्त प्रतिक्रिया पुढे देत आहे.
येत्या गणेशोत्सवासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा💐
आपला,
देवेंद्र भुजबळ, संपादक
प्रतिक्रिया
डॉ. गौरी जोशी कंसारा यांची कथा वाचून आनंद झाला. खरोखरीच त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलूच घडलेले आहे. डॉक्टर गौरी यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त सरोदे परिवारा मार्फत मनःपूर्वक शुभेच्छा…
– विलास बाबुराव सरोदे, औरंगाबाद
मी डाॅ. गौरींचे सदर नेहमी वाचते व मला ते फार आवडतेहि. त्यांची भाषाशैली सुरेख व स्वत: उत्तम कवियत्री आहेत हे प्रत्येक वेळी जाणवले. खुप सुंदर शब्दांत लिहिलेले त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आज कळले. धन्यवाद माननीय देवेंद्रसर.
वाढदिवसानिमित्त डाॅ.गौरींना माझ्या मन:पूर्वक शुभकामना. त्यांचे यश व किर्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो.
– सौ लीना फाटक, इंग्लंड
श्री. देवेंद्र जी, आपले मनःपूर्वक आभार.
आपण माझे इतके कौतुक केले आहे, मला खरंच भरून आले आहे. मी काही कुणी थोर व्यक्ती नाही, तरीही आपल्यावर माया करणारे, आपल्याला शुभेच्छा देणारे लोक केवळ आपल्या घरात नसून जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत ह्या विचारानेच भरून आले आहे. मला आपल्या सारख्या गुणीजनांकडून अजून बरेच शिकायचे आहे. आपण माझ्याबद्दल हे लेखन केले आणि रसिक वाचकांनी ते वाचले ह्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार !
मी खरोखर भाग्यवान आहे की मला इतके मोठे कुटुंब लाभले आहे🙏🏻
Reply
Gauri Joshi Kansara
September 1, 2021 at 3:31 pm
आपणा सर्व रसिक वाचकांना स्नेह असाच राहो आणि दिवसेंदिवस वृद्धींगत होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
डॉ. गौरी जोशी यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
आज खरोखर या लेखातून एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाची ओळख झाली आणि एका व्यक्ती मध्ये किती अमर्याद शक्ती आणि ऊर्जा असते याचे उदाहरण त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या प्रतिभावान कामगिरीला सलाम आणि खूप शुभेच्छा…
– प्रकाश फासाटे.मोरोक्को.,नॉर्थ आफ्रिका.
श्री देवेंद्र भुजबळ सर आपले खूप धन्यवाद, तुमच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तीमत्वांची ओळख करून देतात….डॉ गोरी जोशी यांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा💐💐आपण एक उत्तम कवियत्री आहात👌
– Meghana Sane
रिकॉल ची concept सुंदरच! लेखही भावला. देवेंद्र जी आपले web portal खूपच आधुनिक होऊ लागले आहे.अशाच नवनवीन कल्पना याव्यात! आम्ही स्वागत करू.
मेघना साने
नमस्कार,
शिल्पा कुलकर्णी मॅडम अमेरिका, यांनी Recall ची संकल्पना अतिशय मौलीक पध्दतीने मांडली आहे. खरंच आपल्या दैनंदिन जीवनात अनवधानाने किती तरी लोकांशी बोलतांना- वागतांना अनपेक्षितपणे जे बोलायला नको ते बोलून जातो आणि आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीच्या मनाला इजा होते. मात्र, आपल्या तोंडातून निघालेले वाग्बाण परत घेता येत नाही. जर अशी Recall ची सोय झाली तर ?
या आणि इतरही विषयावर उत्तम विचार मांडले आहेत मॅडमनी, आपले मनःपूर्वक अभिनंदन!!
– राजाराम जाधव, नवी मुंबई,
“विश्व कल्याण दिन” हा
अतिशय स्तुत्य प्रस्ताव आहे👏 त्याची लवकरच पूर्ती होवो अशी त्या विश्वात्मक देवाचे चरणी प्रार्थना 🙏
छान विश्व प्रार्थना…
– पूर्णिमा शेंडे
मित्रांनो,
नमस्कार,
जन्माष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांची जयंती आपण धुमधडाक्याने साजरी करतो आणि योगायोगाने विश्वधर्माची संकल्पना मांडणारी विभुती संत ज्ञानेश्वर माऊली यांचीही जयंती. एकाने कुरुक्षेत्रातील रणांगणात श्रीमद्भगवद्गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण आणि याच भगवद्गीतेचे सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत रसग्रहण करून विश्वधर्माचे ज्ञानामृत पाजुन ” जो जे वांछील तो ते लाभोची संकल्पना मांडणारी माऊली यांच्या वैश्विक विचारांला काय तोड नाही ” या दोन्ही विभुतींच्या विचारांवर आधारित ” विश्वकल्याण दिवस ” साजरा करण्याची संकल्पना मांडली आहे, ती उचितच आहे असे वाटते. अर्थात आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये “वसुधैव तु कुटूंबकम् ” वा ” हे विश्वची माझे घर ” ही फार मोठी अन् वैश्विक – सर्वव्यापी संकल्पना – विचार मांडले आहेत.
या विचाराला , संकल्पनेला Newsstorytoday मधून साद घातली आहे ती उचितच आहे , या विचाराचे स्वागतच होईल असा विश्वास व्यक्त करतो.
– राजाराम जाधव, नवी मुंबई
काँग्रेस गवत….
किती सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाली. खूप धन्यवाद डॉक्टर.
इतके दिवस फक्त काँग्रेस गवत एवढेच माहिती होते…
खूप धन्यवाद..
– प्रकाश फासाटे.मोरोक्को. नॉर्थ आफ्रिका.
चाफा बोलेना… एक उत्तम लेख!
– प्रा प्रतिभा सराफ
उत्तम कविची माहिती आणि आशयघन कवितेचा रसाळ भाषेत सुरेख परिचय. आभार
– स्मिता भागवत, कॅनडा
खूपच छान व माहितीपूर्ण लेख! 👌
श्री. म. माटे यांचे व्यक्तिमत्त्व व कार्य उलगडत जाते यातून..जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली 🙏🙏
– समृद्धी भाळवनकर
डाँक्टर मोहिरे साहेब
खुपच छान समाजकार्य
आमचेकडून तुमच्या कार्याला सलाम.
व शुभेच्छा.
– मदन कोकिळ
आदरणीय डॉक्टर
संतोष मोहिरे साहेब,
आपण सामाजिक बांधीलकीचे भान ठेऊन डोंगराएवढे ऊंच कार्य केले पण पाऊले मात्र कायम जमिनीवर ठेवली व निराधार लोकाना कायम आधार दिला.
आपल्या कार्याला आमचा सलाम व मानाचा मुजरा.
– संदिप रांगोळे, पुणे.
आज आमचे वडिल श्री जयसिंग किसन लोकरे आणि आमचा परीवार आहे तो डाॕक्टरांच्या कृपेमुळे .त्यांनी प्रयत्न केल्यामूळे आज आमचे वडिल स्वतःच्या पायावर चालू शकले. डाॕक्टर तूमचे उपकार आयुष्यभर विसरू शकनार नाही
-सुरज लोकरे
खरंच, मला प्रथमच कळले, मानवी दूध बँक कश्या उपयोगात आणल्या जातात. खूप छान माहिती डॉ. प्रशंसा यांच्या कडून मिळाली. धन्यवाद.
–सौ. वर्षा महेंद्र भाबल.
सुरेख लेख 👍👍
स्त्रीयांचे आरोग्य
खूपच छान नवीन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
मोहन आरोटे, कल्याण
देवेंद्रजी..
आपण माझ्या लेखाला योग्य जागी योग्य फोटो टाकून समग्र केले आहे. मनापासून धन्यवाद !
Pratibha Saraph
प्रा. प्रतीभा सराफ ,# चेंबूरकर यांच्या सर्वंकष लेखणीतून प्रसवलेले आणि सन्मा. देवेंद्र भुजबळ साहेबांनी संपादन केलेले ” आम्ही चेंबूरकर ” हा लेख वाचतांना माझ्या मनाला प्रश्र्न पडला की, खरंच एकेकाळी कोळी आणि आगरी समाजाची वस्तीस्थान असलेल्या चेंबूरच्या परिसरात आज या समाजाचा मागमुसही दिसत नाही. अशा जुन्या-नव्या पिढीतील अनेक सामाजिक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थाचे जाळे अनेक समाज धुरीणांच्या अथक प्रयत्नानंतर निर्माण केले आहे , हा संपूर्ण लेखाजोखा अतिशय सुंदरपणे व सजगपणे मांडले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
– राजाराम जाधव, सेवानिवृत्त सहसचिव
महाराष्ट्र शासन
आमच्या चैंबुर ची एवढी छान सुंदर माहिती वाचून खुप वाटले. मी चैंबुर मध्ये लग्न झाल्यावर आले. त्यामुळे आज चैंबुर ची जी माहिती वाचून भरपूर नविन माहिती मिळाली. चैंबुर मधील श्री स्वामी समर्थ च्या मठाचा उलेख राहिला. प्रा. प्रतिभा सराफ चे लेखन सुंदर व फोटो सहित माहिती खुप छान. 🙏नेहमी प्रमाणे NewsStoryToday सुरेख लेख 👍👍
– मंदा विजय शेटे, चेंबूर
लेखिकेने चेंबूर या उपनगरा विषयक दिलेली सखोल माहिती आवडली. ब्रिटिश कालीन लोकवस्ती विशेषता आगरी समाजाचे राहणीमान ते आत्ताच आधुनिक चेंबूर, ही सर्व माहिती संकलनासाठी लेखिकेने फारच मेहनत घेतली आहे. चेंबूर विभागातील विविध परिसर पूर्वीचे आणि सद्य परिस्थितीतील बदल अतिशय सुंदर मांडणी झाली आहे. हा लेख वाचताना विशेषता चेंबूरकर वासियांना नक्कीच आवडणार यात शंकाच नाही. माझ्या चेंबूरकर वाशी मित्रांना मी हा लेख फॉरवर्ड केलेला आहे.
– सुधीर थोरवे, नवी मुंबई
माझा चेंबूरविषयीचा लेख इतक्या वाचकांना आवडला याचा विशेष आनंद आहे. देवेंद्रजी आणि अलका आपण हा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
प्रतिभा सराफ