नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात सदरात आपले स्वागत आहे. वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित,
देवेंद्र भुजबळ (संपादक)
१
झेप…
पुनिता यांचे कार्य कौतुकास्पद आहे. बाहेरच्या देशात गेल्यावर आपली संस्कृती, भाषा, सणवार जपणे खूप कठीण असते. त्या स्वतः च फक्त नाही तर इतरांनाही सामावून घेतात याचा आनंद झाला. न्यू जर्सी येथे अशीच एक शाळा आहे, तेथे माझा पुतण्या आणि सून कार्यरत आहेत.
अमेरिकन भारतीयांनो रजा घ्या… या आपल्या लेखात अमेरिकन राष्ट्रपती, तिथल्या सद्य परिस्थितीची साद्यंत माहिती देऊन कळकळीचे आवाहन केले आहे. बघायला पाहिजे हे कसे, काय, कधी शक्य होते ?
कोवळं ऊन…
या पुस्तकाचा श्री शेवाळकरजींनी इतका उत्तम परिचय करून दिला आहे की ते विकत घ्यावेच असे वाटते, हेच त्या लेखनाचे श्रेय आहे. प्रत्येक कथेचा शेवट न सांगता वाचकांची उत्कंठा वाढविण्यात ते यशस्वी झाले आहेत.
वैद्य सरांची कविता एकदमच वेगळी आहे. भावली.
— सौ स्वाती वर्तक. मुंबई
२
न्यूज स्टोरी टुडे तील सदरे वाचनीय व एकंदरीतच ज्ञानवर्धक आहे।🌸🙏🏽
— डॉ गोविंद गुंठे. लेखक, दूरदर्शनचे निवृत्त संचालक, नवी दिल्ली
३
अमेरिकेन भारतीयांनो “रजा” घ्या!
अतिशय सुंदर लिखाण, सर्वांनी बोध घेण्याजोगे🙏🏼
— सुरेश गोपाळे. निवृत्त महापालिका अधिकारी, मुंबई
४
आज मात्र दुर्दैवाने लोकशाही म्हणजे “लोकांकडून स्वतःला निवडून घेऊन मनमानी पद्धतीने राज्यकारभार करणे” असे चित्र दिसतेय. हे निर्विवाद सत्य जनतेपुढे मांडण्याचे धाडस देवेन्द्रजी आपण केलेत मानलं तुम्हाला.
अमेरिकेची गेल्या बारा हजार वर्षाची वाटचाल, थोडक्यात जन्मापासून आजतागायत प्रवास, ह्या छोटेखानी लेखात अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने मांडला आहे या वरून या लेखासाठी किती प्रचंड मेहनत घेतली आहे याची जाणीव झाली.
केवळ अमेरिकन भारतीयांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन तथाकथित अमेरिकन लोकांना धडा देऊन भागणार नाही तर इतर देशातून आता अमेरिकन झालेल्या सर्वांनीच हे पाऊल उचलले तर आताच्या अमेरिकन अध्यक्षांना तातडीने अनेक निर्णय मागे घेण्याशिवाय पर्याय राहणार असल्याचे.
एकेकाळी स्वदेशीची चळवळ चालवणाऱ्या स्व. महात्मा गांधी यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही आणि मुळात या पृथ्वीवर असणारे जमीन ही,
“सब भूमी गोपालकी” हेच सत्य स्वीकारावे लागेल.
अभ्यासपूर्ण लेखा बद्दल धन्यवाद
— प्रकाश पळशीकर. बेळगाव
५
सर, अतिशय अभ्यासपूर्ण लेख, यात आपण फारच उत्तम उपाय अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना सुचवला आहे. हा लेख अधिकाधिक लोकांनी वाचावा हीच प्रार्थना .🙏
— आशा कुलकर्णी. प्रमुख, हुंडा बंदी चळवळ, मुंबई.
६
“असेही होऊ शकते !”
मोबाईलच्या आहारी गेलो आहोत हे १००% खरे आहे.
जगाबरोबर रहायचे तर ….
काय होईल ? काही भरवसा नाही !
— विजया केळकर. हैदराबाद
७
व्हाट्सअप बंद या बाबतचे आपले विचार वाचले.
खरंच आपण खूप जागृत आहात. दहा वर्षांपूर्वी साहेबांसोबत काय बोलणं झालं, ते स्टेजवरून भाषणात काय बोलले इथपर्यंत आठवण म्हणजे कमालच आहे !
म्हणूनच तुम्हाला इतक्या उच्च पदापर्यंत जाता आले. स्मरणशक्ती, वाक्यांची रचना आणि सगळ्यांना सामावून घेण्याचा गुण तो मात्र त्या हास्य क्लब आणि गुळाचा चहा या मधील वाटाघाटी वर संपुष्टात आला, हे वाचून आनंद झाला. सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय आनंद वाटत नाही असं वाटायला लागलं. चला ठीक आहे… मजा आली.
— किशोर विभूते. अकोला
८
साडी पुराण, आवडले, अगदी बायकांची हळवी नस पकडून, खुप छान लिहिले आहे, कुरुक्षेत्र डोळ्या समोरून झलक चमकून गेली. आणि कितीही साड्यांनी कपाट भरून गेले ना तरी मन काही भरत नाही. अगदी कुठे जाण्यासाठी साडी कोणती नेसायची म्हणून कपाट उघडले की भसकन 4/5 साड्या खांदा, हातावर ओघाळतात, अन जणू सांगतात की मला आज तरी तू नेसून बघ ना, बरेच दिवसा पासून मी वाट च पाहत होते, की तू कधी कपाट उघडते अन मी तुझ्या हातावर विराजमान होते. 🌹
— सौ मीना घोडविंदे. कवयित्री, लेखिका, ठाणे
९
“असेही होऊ शकते ?”
छान. Good U R safe.
— चंद्रकांत बर्वे. निवृत्त दूरदर्शन संचालक. मुंबई
१०
नमस्कार सर,
आजच्या ‘पोर्टल’ मधील आपला ‘असंही होऊ शकते !’ हा लेख वाचला. मस्त खुसखुशीत लेख ! आता आमच्या मोबाईल बाबतीत असं काही झालं तरी घाबरायला होणार नाही. पण सर, नकळत आपल्या मोबाईलमध्ये कायद्याचा भंग करणाऱ्या लिंक्स, मजकुर, फोटो येऊन पडतात त्यासाठीची काय दक्षता घ्यायची तेही सांगितले असते तर आम्हाला त्याची माहिती मिळाली असती.
मंजुषाताई किवडे यांचे ‘साडी पुराण’ लेखाचे प्रत्येक महिला अगदी मनापासून पारायण करते.
खूप छान लेख.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
११
“कोवळं उन” हे नीला बर्वे यांचे पुस्तक वाचून अतिशय आवडले.बरेच परिक्षण आले असल्याने विस्तार भयास्तव मी त्यांच्या लेखनाबद्दल अभिनंदन करतो आणि विशेषतः या न्यूज टुडे प्रकाशित १६ क्रमांकाचे पुस्तक अतिशय उत्तम प्रकारे मुखपृष्ठ, टाईप सेट व सर्वोत्कृष्ट दर्जेदार बांधनीबद्ल प्रस्तावनाकार देवैंद्र भुजबळ आणि प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांचे मनापासून अभिनंदन करतो.
— सुधाकर तोरणे
१२
मोबाईल दक्षता…
हल्ली AI च्या सहाय्याने आपल्या नातेवाईकांचे किंवा मित्र मैत्रिणींचे चेहरे हुबेहूब तयार करून त्याद्वारे व्हिडिओ कॉल केले जातात. म्हणून यापासूनही सावध राहणे अतिशय गरजेचे आहे. मी तर ओळखीच्यांचाही व्हिडिओ कॉल आला तर उचलत नाही. थोडा वेळ जाऊ देते. मग त्यांना मेसेज पाठवते किंवा फोन करून विचारते की तुम्ही मला व्हिडिओ कॉल आता केला होता का ? बहुधा तो त्यांनी केलेला नसतो. काहीजण असे फसले आहेत. म्हणून प्रत्येकाने सावधगिरी म्हणून एकमेकांना सांगायला हवे की थेट व्हिडिओ कॉल न करता आधी मेसेज तरी पाठवा किंवा कॉल करून कळवा मग तो व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करा.
— नीला बर्वे. सिंगापूर
१३
हलकं फुलकं..
साडी पुराण खूप छान लिहलंय 😃.
— प्रकाश फासाटे. मोरोक्को.
माझी जडणघडण भाग ६५ अभिप्राय.
१
बिंबा (राधिका) आबांची व्यक्तिरेखा तू अगदी बेमालूम उभी केली आहेस ग 👍🏼 वाचता वाचता भांडारकर कुटुंब माझ्या डोळ्यासमोर उभं राहातं होतं ग. तुझ्या माहेरचं वातावरण एकदम मोकळं ढाकळं आणि इथे नाही म्हटलं तरी कडक शिस्तीचं. जड नाही गेलं का ग तुला ? असो.
— अलका वढावकर. ठाणे
२.
छान लिहिले आहेस.
प्रत्यक्ष आबाच डोळ्यासमोर उभे राहिले…
— सुचेता खेर. पुणे
३
“आबा”, एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. छान परिचय करुन दिला, राधिकाताई तुम्ही.
— छाया मठकर. पुणे
४
आबा, आपले सासरे यांच्या करारी ध्येयवादी स्वभावाचे पैलू चांगले उलगडले आहेत. पूर्वीच्या काळी अशी व्यक्तिमत्व बरीच असत वाटते.
— सौ स्वाती वर्तक. मुंबई
५
घरोघरीचे आबा असेच होते.. त्या काळी …
— सुमती पवार. नाशिक
६
आज “आबा” वाचताना मला एक जाणवलं प्रत्येक मोठ्या एकत्र कुटुंबात एक व्यक्ति अशी असते जी निस्वार्थीपणे कुटुंबाची धुरा सांभाळून असते आणि पत्नीची साथ उत्तम असेल तर मग सर्व काही सोपे होऊन जाते. Hats off to such couple.
— आरती नचनानी. ठाणे
७
सहज, सुंदर लिखाण.!
आबांच व्यक्तिमत्त्व, त्यावेळच्या वातावरणासकट डोळ्यासमोर आले.
— सुमन शृंगारपुरे. पुणे
८
आजच्या जडणघडणीतील सामोपचाराचा भाग वाचताना मला असे वाटले की तुझा मानसशास्त्त्राचाही सखोल अभ्यास आहे. आबांच्या करारी मुर्तीचे वाचतांना प्रत्यक्ष दर्शन घडले. आबा आणि माईंच्या सहजीवनाचे वर्णन खूपच भावले. अशीच लिहिती रहा. सोमवारची आतुरतेने जडणघडण वाचण्यासाठी वाट पहात असते.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
९
अतिशय सुंदर वर्णन.
— श्रीकृष्ण भांडारकर. अमळनेर
१०
आबा…
छान लिहिलं आहेस. आबांची शिस्त, कर्तृत्व, त्यांनी केलेली उद्योगधंद्याची यशस्वी उभारणी. ह्याबरोबरच कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं स्थान, त्यांचा दरारा अशा अनेक गोष्टी वर्णील्या आहेस. मला माझे आजोबा डोळ्यासमोर उभे राहिले. कडक शिस्त, कर्तबगार, वक्तशीर. आम्ही लहान होतो तेंव्हा त्यांनी खूप चांगले संस्कार आमच्यावर केले.आम्ही पहिल्या दोन नाती लाडक्या होतो. त्यामुळे शिस्तीतून आम्हाला सूट मिळायची. माझी आत्या (वडिलांची आतेबहीण) आमच्याकडेच होती. हिंदी चित्रपट बघायला गुपचूप दुसऱ्या दाराने जात असे. 😊
कालावधी एक असल्यामुळे अनेक आठवणी जाग्या होतात.
— अनुपमा, मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800