Sunday, February 15, 2026
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात सदरात आपले स्वागत आहे.
प्रथमतः आपणा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आम्ही आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात पर्यटनासाठी गेलो असल्याने काही दिवस पोर्टल बंद ठेवावे लागले, या बद्दल मनःपूर्वक दिलगीर आहोत. त्यामुळे आपले वाचक लिहितात…हे सदर सुद्धा मधे प्रसिद्ध करता आले नाही. असो.
आता पाहू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ
संपादक

कामाख्या देवीचे मंदिर : काही अनुभव,काही सूचना या मी (देवेंद्र भुजबळ) लिहिलेल्या वृत्तांतावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत

भुजबळ सरांचा देवी कामाख्या मंदिराच्या व्यवस्थापनाबाबतचा आणि एकंदरीतच तिथल्या प्राण्यांच्या बळी देण्याच्या क्रूर प्रथेविरुद्ध जो ठाम आणि परखडपणे मांडलेला संदेश आहे, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
सर, देवाच्या नावाखाली सध्या जो बाजार मांडला जात आहे, त्यांच्यासाठी हा आपला संदेश म्हणजे एक झणझणीत अंजन आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्यासारख्या तडफदार व्यक्तींनी आपल्या लेखनाद्वारे असे ताशेरे ओढणे खरोखर प्रशंसनीय आहे.
आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार !
— जया रेवणकर. खारघर, नवी मुंबई

कामाख्या देवीचे दर्शन या बाबत आपल्याला आलेले अनुभव आणि त्याविषयी परखडपणे लिहिलेला वृत्तांत उत्तम आहे.
— प्रिया गडकरी. कर्जत

कामाख्या देवीच्या मंदिरातील तुमचे अनुभव वाचून अंगावर शहारे आले. खूपच मिस मॅनेजमेंट असली पाहिजे.
— मदन कोकिळ. कराड

कामाख्या देवीच्या मंदिरात मी पण दोन महिन्यापूर्वी गेलो होतो मलाही तसाच अनुभव आलेला आहे.
— डी .जवळकर.

गेल्या काही वर्षांत कामाख्या मंदिरात हे असे बदल झालेले दिसतात. मी आता पर्यंत तीनदा गेलोय. कधीच असा अनुभव आला नाही. शेवटचा २०१७ साली गेलो होतो.
— राजीव गोखले. निवृत्त दूरदर्शन संचालक, पुणे.

भाविकांचे श्रद्धा स्थान असलेलं कामख्या मंदिरातील अव्यवस्थाचे कुवर्णन ऐकून शोक झाला. खरंच सरकारने ह्या बद्दल त्वरित कडक विधान केलं पाहिजे.
— कीर्तीश धामारीकर. इंदोर, मध्य प्रदेश.

कामाख्या मंदिर… मी पण अनुभव घेतला आहे.
— सुषमा शेठ.

कामाख्या देवस्थानात असलेला भ्रष्ट्राचार पाहून अशा ठिकाणी न गेलेले बरे असे मला वाटते. भाबड्या धार्मिक लोकांची अशी पिळवणूक करणारे जे कोणी आहेत त्यांच्या विरोधात सबंधित सरकार कारवाई का करीत नाही ? असा प्रश्न उद्भवतो. सहल चालकांनी पर्यटकांना या बाबत जाहीर सूचना देणे गरजेचे आहे.
— निरंजन राऊत. मुंबई

कामाख्या देवीच्या दर्शनासाठी होणारा त्रास बघून अतिशय दुःख झाले.. वाईट वाटते या तळागाळापर्यंत फोफावत चाललेल्या भ्रष्टाचाराची बाहेरच्या देशांमध्ये तोंड दाखवायची लाज वाटते..
तुम्ही निदान हे लिहून या विषयाला वाचा तरी फोडली आहे.. बघूया काही आशादायी चित्र दिसते का ?
अर्चना मॅडम बद्दल वाचून वाईट वाटले.. आमचीही विनम्र श्रद्धांजली.. 🕉️ शांति:
स्नेहाची रेसिपी दिवाळीत नक्की करून बघेन
माणसांच्या गर्दीतूनी..
कविता छान.
— स्वाती वर्तक. मुंबई
१०
कामाख्या देवी विषयावरील आपला वृत्तांत वाचला.काही वर्षांपूर्वी राजस्थान मधील अंबाजी टेम्पल येथे गेलो होतो त्यावेळेस असाच अनुभव आला. तिथे गेल्यावर पंड्यांनी घोळकाच घातला. लगेच दर्शन अमुक इतके रुपये. कुणाचाच तिथे कंट्रोल नव्हता. गर्दी अमाप, शिस्तीचा पत्ता नाही. तसेच ठराविक काळच मंदिर उघडे वगैरे वगैरे.
कामाख्या देवीचा वृत्तांत देखील काहीसा त्याच प्रकारचा परंतु अधिक अन ऑर्गनाईज वाटला.
खरे तर ट्रस्टी आणि शासकीय कंट्रोल जसा तिरुपती बालाजी, सिद्धिविनायक, अक्षरधाम, मीनाक्षी, गोल्डन टेम्पल येथे आहे तसाच भारतातील सर्वच मंदिरांमध्ये हा कंट्रोल येणे गरजेचे आहे.
मोठ्या प्रमाणात भाविक श्रद्धेने जात असतात परंतु हा सगळा प्रकार पाहिल्यावर त्यांना मोठा प्रश्न पडतो की देवाच्या दारी हे काय चालले आहे ? असो .
या सर्व श्रद्धास्थानावर एक नियंत्रण असणे गरजेचे आहे.
— सुधीर थोरवे. नवी मुंबई

अर्चना मॅडमच्या निधनाची बातमी वाचून फार दु:ख झाले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अर्चना मॅडमना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏
— राधिका भांडारकर. पुणे

राधिका भांडारकर यांच्या “माझी जडणघडण” भाग ६८ वर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…

खरंच गं, तुझा लेख वाचला की मलाही खूप काही आठवत जाते. अशाच जुन्या गोष्टी घरातल्या सासरे दोन महिने बेशुद्धावस्थेत दवाखान्यात होते, तेव्हा माझ्या सासूबाई पण तिथं बसायच्या.. पण एक विचित्र अलिप्तपणा जाणवायचा त्यांचा ! त्यांच्या जोडीला त्यांच्या एक जाऊबाई ही असायच्या. दिवसभर बसून यायच्या, पण संध्याकाळी त्यांना थकायला व्हायचं, पण सांगायचं कुणाला! मनातून सगळी कंटाळलेली असत आजारपणाला. शेवटी सासरे गेले आणि सगळी सुटली!
असे दिवस कायमचे लक्षात राहतात.तेव्हा मी प्रेग्नेंट होते. एका जावेला तीन महिन्याचा बाळंतीण तर दुसऱ्या जावेला दोन जुळ्या मुलींच्या पाठीवर सव्वा वर्षात झालेला मुलगा अशी तीन बाळं होती !!
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे

अप्रतीम लेख!
नवरा आजारी असताना पत्नीच्या मनाची घालमेल, थोडे चिडणे, त्रासणे आणि त्याचवेळी मनात सतत काळजी असणे या सगळ्या गोष्टींचे चित्रण अगदी उत्तम प्रकारे केले आहेस.
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका

किती सुंदर लिखाण. स्त्री मनाचे विविध कंगोरे किती छान टिपले आहेत ताई तुम्ही.
— अस्मिता पंडीत. पालघर

तुझ्या व्यतिरेखा वाचताना ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते. तू लिहिलेलं अगदी खरं आहे. कोणी चुकीचे नसतं. त्या वेळी जे बरोबर वाटत तेच सर्व करतात.🙏
— संध्या जंगले. मुंबई

आपल्यापेक्षा ज्येष्ठांची दुखणी जवळ जवळ प्रत्येक जण त्यातून जातो. सर्व प्रसंग तुम्ही चांगल्या प्रकारे हाताळले. अगदी धीराने. प्रसंगातील बारकावे आठवून, मनाची झालेली स्थिती, दाखवलेला संयम, बरोब्बर लिहिलय.
— छाया मठकर. पुणे

खूप छान लिहिले आहे.
— पूनम मानुधने. जळगाव

तुझे प्रत्येक सदर ही एक स्वतंत्र कथा असते, जिथे घडलेल्या गोष्टींत मनाचे पदर उलगडून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो.
शिवाय प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करायची तुझी ताकद.
मला एक जाणवलं हे सदर लिहीण्याच्या निमित्ताने तुझा
Down the memory lane फेरफटका होतोय.
आणि तू त्या प्रसंगाकडे त्रयस्थपणे व साक्षीभावाने पाहतेस.
ज्ञानेश्वर म्हणतात, तसा डोळा भीतरू पालटू झाला. तसेच लेखनशैलीत प्रचंड ताकद आहे. कुठेही कंटाळवाणे व रटाळ तर अजिबात होत नाही व प्रत्येकवेळी विचारांचा नवीन पैलू दिसतो.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव

आबांचे आजारपण….
या लेखात तू स्त्रीमनातील सल माईंच्या रूपात अगदी तंतोतंत मांडला आहेस.अर्थात त्याच स्त्रिया ज्या मनोभावे नवर्‍याचे सर्व करतात.काही पुरूषही अगदी मनोभावे बायकोची सेवा करतात.
मस्त लेख !
— आरती नचनानी. ठाणे

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11