Tuesday, September 16, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार, मंडळी.
आपण वर्षभर आतुरतेने वाट पहात असतो, त्या श्री गणेशाचे आगमन या आठवड्यात झाले आहे. श्री गणेशाविषयी कितीही लिहिले, बोलले तरी थोडेच ! असो…
आपला पुढील आठवडाही चैतन्यदायी जावो, या हार्दिक शुभेच्छा💐
या आठवड्यात प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ, संपादक

प्रतिक्रिया
श्री.राजेंद्र अचलारे, पुणे तसेच श्री.डाॅ. संतोष मोहिरे कराड यांच्या विषयी ची माहिती वाचून खूपच छान वाटले, आनंद ही झाला. समाजातील तरुण पिढीने आर्दश घ्यायला हवा. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
श्री. देवेंद्र जी भुजबळ व रश्मीताई हेडे यांचे ही मनापासून आभार त्यांनी खूप चांगली माहिती दिली.
— चंद्रकांत शिरापुरे, मालेगाव

सन्मा. राजेंद्रजी अचलारे यांची , ”नवी वाट” आजच्या तरूण पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे. रश्मी हेडे मॅडमच्या लेखणीतून प्रसवलेल्या विचारांची शृंखला राजेंद्रजी अचलारे यांची व्यावसायिक संघर्ष करून पुण्यातील एक यशस्वी बांधकाम उद्योजक म्हणून निर्माण केलेले ब्रॅंड ही फार अचंबित करणारी गोष्ट आहे. कारण, या क्षेत्रात परिवारातील काहीही वारसा नसतांनाही केवळ स्वतःच्या जिद्दीने, चिकाटीने , कष्टाने प्रतिकूल परिस्थितीतही या क्षेत्रात आपले नाव केले आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. “ब्रेव्हो ब्रेव्हो राजेंद्रजी अचलारे ब्रेव्हो” !!
राजाराम जाधव, सहसचिव (सेवानिवृत्त)
महाराष्ट्र शासन

खूपच प्रतिभासंपन्न प्रतिभाताईचं जीवनकार्य
रणजित पवार

प्रतिभावान प्रतिभा👌
प्रतिभा रावळ अश्या लढवय्या चित्रकाराची ओळख, भुजबळ सरांच्या लेखातून, आज वाचनात आली. खूप धन्यवाद!
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.

प्रतिभावान प्रतिभा
प्रतिभा रावळ यांचा लेख उत्तम !
– प्रा प्रतिभा सराफ

माझा चेंबूरविषयीचा लेख इतक्या वाचकांना आवडला याचा विशेष आनंद आहे. देवेंद्रजी आणि अलका आपण हा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
– प्रा प्रतिभा सराफ

अबब ! किती ही चेंबुरची माहिती! युगायुगांची! चेंबूर मधे दोन वर्षे राहण्याचा योग आला होता आणि तसेही एरवी आम्ही शूटींग साठी एस.एल.स्टुडिओला देवनार डेपो वरून जायचो. त्यामुळे प्रतिभा यांनी लिहिलेल्या जागा पहिल्या होत्या पण त्यांचा इतिहास नव्हता माहित. पूर्वेतिहास लिहिल्याने लेख वाचनीय झालय. चिंबोरीचे चेंबूर आवडले.रसास्वाद घेते आहे.☺️
– मेघना साने

जीवन प्रवास–भाग : १३
सुंदर लेखन, सुंदर आठवणी 🙏
– मोहन आरोटे

सुंदर मालवणी भाषेतील कविता. श्रावण महिन्यातील सणावारांच यथोचित वर्णन केले आहे.
– श्री.महेंद्र श्रीधर भाबल

मालवणी भाषेचा लहेजा घेऊन आलेली सुन्दर कविता. श्रावणाचं आरसपाणी वर्णन.
– लक्ष्मण महाडिक

#माझे वडील (खरं तर ते माझे मित्र आहेत, नेहमी फ्रीली आणि हसतमुख असे माझे वडील 👌)
खरं तर काय लिहू, सुचत नाहीये, कारण कितीही लिहिलं तरी मनातील सर्व गोष्टी पूर्ण होतील असे नाही.
नेहमीच सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं हा त्यांचा गुणधर्म आहे.माणसं जोडणे हे मी त्यांच्या कडून शिकले आहे.
कोणत्याही परिस्थितीत नेहमी हसतमुख राहून त्यावर मात करून पुढे कसं जायचं हे मी त्यांच्या सोबत राहून शिकले आहे..
बोलण्यातून कोणत्याही वयाच्या व्यक्तीला सहज ते आपलसं करू शकतात.. मग ते लहान मूल असो की वयोवृद्ध व्यक्ती..
अश्या या प्रेरणादायी माझ्या वडिलांना माझे नमन ..
We are proud of you 🤗
We are happy to having you in our life 💯
– हर्षदा कृष्णकांत सासवडे 😇

पोरबंदर : श्रीकृष्ण सखा सुदामा पुरी
मॅडम नवीन आर्टिकल मी तुमच्या आतुरतेने वाट बघतोय. मी तुमचा लेख आमच्या गावाच्या वर्तमान पेपरात वाचला. तुम्ही खूप छान लिहिता. तुमचे लेख खूप माहिती असते. मी तुमच्या लेख वाचूनच त्या जागेवर भेट द्यायला जातो.खूप मुळात माहिती देतात तुम्ही. मला तुमचे लेख खूप आवडत.मे तुमचा लेखाची आतुरतेने वाट पाहतो.
– कृष्ण

अतिशय सुंदर लेख !!
खरंच आपली भाषा हेच आपल खरंच व्यक्त होण्याचं माध्यम…
खूप सुंदर… 👍👍
– प्रकाश फासाटे. मोरोक्को, नॉर्थ आफ्रिका.

भुजबळ सर, तुमची दूरदृष्टी,सखोल वाचन व लपलेले हिरे शोधून, सर्वां समोर त्यांचे पैलू मांडण्याची कला, अप्रतिम! salute sir!🙋
प्रतिभा रावळ अश्या लढवय्या चित्रकाराची ओळख, भुजबळ सरांच्या लेखातून, आज वाचनात आली. खूप धन्यवाद !
– सौ. वर्षा महेंद्र भाबल.

लाल वस्तीवरचं बाळ….
या लेखाने खरोखर निःशब्द केले.
आपले कार्य खूप महान आहे. लेख वाचून सगळा प्रसंग समोर उभा राहिला.
आपल्या कार्याचे खूप कौतुक.
– अपर्णा महाडिक

स्त्रियांचे आरोग्य – भाग : ४ थायराॕईड – एक सामान्य आजार
खूप छान माहिती दिलीय..सुंदर !!
– श्रीकांत वसंत दीक्षित

Nice initiative for Eastablishment of Marathi Vidhypeeth. Best wishes
– D L Thorat
Jt.Secretary (Retd), Govt.of. Maharashtra

“दगड व्हाव्ह मन”
– काव्य नीता
गेल्या काही दशकांपासून समाजातील
नाती आणि नीती
या दोन्ही पासून दूर होत जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढतेय
” मी आणि माझा संसार ” बास
हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र !
थोडक्यात आता उरली फक्त “नीता”
(एक हळव्या व्यक्तिमत्वाची)
सभोवतालच्या घटनांकडे उघड्या
डोळ्यांनी बघून रक्तबंबाळ झालेल्या मनाची “नीता”
एकच माफक अपेक्षा करतेय
” उध्वस्त झालेल्याच्या आसवांच्या पुरात आता तरी वाहू दे मी पणा उभ्या माणूस जातीचा
हे काव्य वाचल्या पासून माझ्या मनात एकच भुंगा घोंगवू लागलाय, एकेकाळी मर्दुमकी गाजवणारे
आम्ही निष्क्रिय का होत आहोत ?
– प्रकाश पळशीकर, गाझियाबाद, उत्तर प्रदेश

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments