नमस्कार मंडळी.
कार्यबाहुल्यामुळे मागच्या आठवड्यात “वाचक लिहितात…” हे सदर प्रसिद्ध करता आले नाही, या बद्दल क्षमस्व आणि कार्यबाहुल्य म्हणजे काय, तर माझ्याच “कला साहित्य भूषण” या पुस्तकाची निर्मिती आणि प्रकाशनाचा कार्यक्रम हे होय. या पुस्तकाच्या प्रकाशनाची बातमी आपण वाचली असेलच. विशेष म्हणजे, हे प्रकाशन आपल्या सिंगापूर स्थित लेखिका मोहना कारखानीस आणि त्यांचे पती श्री संजय यांनी आयोजित केलेल्या स्नेह भेट कार्यक्रमात करण्यास, या दोघांनी आनंदाने सहमती दर्शविली, त्यामुळे प्रकाशनाचा कार्यक्रम खुपच उठावदार झाला. या दोघांचेही मनःपूर्वक आभार.
आता पाहू या, वाहकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
सिंगापूर स्थित लेखिका नीला बर्वे यांच्या “कोवळं ऊन” या कथा संग्रहाचे परीक्षण, दुसर्या लेखिका राधिका भांडारकर यांनी लिहिले होते. या परीक्षणावर प्राप्त झालेले अभिप्राय पुढील प्रमाणे आहेत.
1
पुस्तक परिचय वाचून प्रत्यक्ष “कोवळं ऊन”अनुभवण्याचा विचार मनात आला. छान लिहिले आहे परिक्षण !
नीला बर्वे सिंगापूर स्थित असल्या तरी मराठी बद्दल आत्मीयता आहे. कथा संग्रह अर्थातच छान असणार !
_उज्ज्वला सहस्रबुद्धे. पुणे
2
राधिका खूप छान परिचय करून दिला आहेस पुस्तकाचा. पुस्तक वाचण्याची इच्छा झाली आहे.
_नंदिनी चांदवले. पुणे
3
छान,सगळ्या कथांचा आढावा छान घेतलास त्यामुळे उत्सुकता वाढते.
_अंजोर चाफेकर, गोरेगाव.
4
तू ‘कोवळं ऊन’ कथा संग्रहातील कथाचा चांगला वेध घेतला आहेस.कथा वेगवेगळ्या विषयांवर आधारित आहेत. कथासंग्रहाबद्दल ऐकलं होतं.
नीला बर्वे ह्या सिंगापूरच्या रहिवासी आहेत ना ? त्या ‘लेखिका ग्रुपच्या’ सदस्य असल्याने व्हाट्सअपवर संवाद होतो. पूर्वी जास्त व्हायचा.
_अनुपमा.
1
वर्षा भाबळ यांचा “एकत्र कुटुंब काळाची गरज” हा लेख छान आहे .
_ श्रीकांत पाटकर, मुंबई.
2
कुटुंबसंस्था हे भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्य आहे. ते जपण्यात सामाजिक ऐक्य वृध्दींगत होऊ शकेल हा विचार मौलिक आहे.
_ प्रा डॉ सतीश शिरसाठ, पुणे.
3
“एकत्र कुटुंब पद्धत काळाची गरज” हा लेख खूप छान आहे. आजच्या परिस्थितीचे उघड सत्य.कितीही कठीण असले तरी सत्य स्वीकारावे लागतेच. संस्कार, सुरक्षा, माया, प्रेम मिळतेच …छान वर्षाताई.
कोडी…कविता ही छान आहे ..राजकारणावरील विदारक प्रश्न.
तेजस्विनी आणि विनीत यांच्या विवाहाच्या वेळी सफाई कामगार ताईंच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करण्यात आले ते फार भावले, नव दाम्पत्यांना आमच्याही शुभेच्छा.
बहिणाबाईंच्या कवितेचे केलेले विवेचन, त्यांच्या आशयघन, आध्यात्मिक ओव्यांचा घेतलेला आढावा खूप छान.
प्राची राजे यांचे कौतुक वाटते. स्वतः आय टी इंजिनियर असून साहित्याची ओढ प्रशसनीय आहे. अभिनंदन. धुक्याची चादर आणि त्या बरोबरचे प्रकाशचित्र ..
दोन्हीही सुंदर.
_ स्वाती वर्तक, मुंबई.
4
भुजबळ सर, खूपच छान लेख लिहून संपूर्ण बच्चन परिवाराचा खूप छान परिचय करून दिला आहेत. मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐
_ मृदुला राजे. जमशेदपूर
5
वाढत्याआत्महत्या, जीवनाची लढाई हरण्यापूर्वी ! लेख वाचला. वास्तव चित्रच आहे समाजातील!
पण याला कारणीभूत आत्महत्येचा विचार करणारेच असावेत. मन कमकुवत, परिस्थितीशी, संकटांशी दोन हात करण्याची जिद्द ठेवली तर मात करता येते. पण त्यांची यासाठी तयारीच नसते. स्पर्धेत अपयश येण्याची भीती वाटत असेल तर उतरूच नये अशानी. अपयशाने खचून नं जाता उलट का आले असावे यांचे कारण शोधून त्यावर उपाय शोधला तर नक्कीच सापडतो. तो मार्ग सोपा नसतोच, पण प्रयत्न केला तर यश मिळतेच. नकारात्मकता दुर करून सकारात्मक विचार मनात आणले तर आणि समाधानी वृत्ती ठेवली तर हे प्रमाण नक्कीच कमी होईल.
प्रतिभा रावळ यांचा जीवनपट खरंच स्फूर्तीदायक आहे. कला आणि उत्साह दोन्ही त्यांच्यात असल्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा नं डगमगता त्यावर मात करून आपले ध्रुवासारखे खास स्थान निर्माण केले. अनेकाना त्यांच्या या चरित्रातून नक्कीच प्रेरणा मिळेल.
_ सौ स्नेहा मुसरिफ, पुणे.
6
देवेंद्र भुजबळ सरांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक पत्रकारीतेचे जे सविस्तर शब्दबद्ध केले आहे ते सर्वांना अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणारे आहे. महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना कृतज्ञता पूर्वक प्रणाम, तसेच देवेंद्र भुजबळसर यांचे सर्वोत्कृष्ट लेखाबद्दल मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा
🙏
— सुधाकर तोरणे.
7
श्री भुजबळ साहेब,
नमस्कार.
“एकत्र कुटुंब पद्धत काळाची गरज” हा सौ वर्षा महेंद्र भाबल यांचा हा लेख न्युज स्टोरी टुडेच्या पोर्टलवर वाचायला मिळाला. मला वाटते की, आपण माझ्या परिवारातील सदस्यांच्या मुलाखतीनंतर आपल्या पोर्टलवरच्या वाचकांच्या मनात “एकत्रित कुटुंब पद्धतीचे सौंदर्य” हा यूट्यूब वरील कार्यक्रम पाहिल्यावर कदाचित अनेक वाचकांच्या मनात एकत्रित कुटुंबाचे फायदे जाणून घेतल्यानंतर आपल्या मनातील भावना निश्चितच उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. कदाचित म्हणुनच सौ वर्षा भाबल यांच्या सकस लेखणीतून सुंदर विचारांचा लेख वाचायला मिळाला. यासाठी मी आपले व सौ अलका भुजबळ या सामाजिक विचारांने झपाटलेल्या दांपत्याचे “एकत्रित कुटुंब पद्धती संदर्भात आपल्या पोर्टलच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. त्याबद्दल भुजबळ दांपत्याचे मनःपूर्वक अभिनंदन, धन्यवाद आणि आभार !!
_राजाराम जाधव, निवृत्त सह सचिव. नवी मुंबई.
8
भारत हे अलौकिक नंदनवन आहे. विविधतेची सुंदर फुले जगाला मोहवतात. याची प्रशंसा अलिकडेच पुतिन यांनी केली आहे. सुरेख काव्यरचना.
_ प्रा डॉ सतीश शिरसाठ, पुणे.
राधिका भांडारकर यांच्या ‘माझी जडणघडण’ भाग ७५ अभिप्राय….
1
खरोखरच थरारक 😨😨
निसर्ग ही अनुभव देताना “भारतीय की अमेरीकन” पहात नाही. सर्वजण सारखेच. छान सांगितला अनुभव राधिकाताई “थरारक”
_छाया मठकर, पुणे.
2
राधिका ताई, खूप मजेशीर प्रवास वर्णन.. मजा आली वाचताना. खाकरा खावा आवो गुजरात…
_मानसी म्हसकर. वडोदरा
4
आजचा जडणघडणचा भागही छान आहे, पण मला तो जरा त्रोटक वाटला. पुट इन बे हे बेट फारच रमणीय आहे.
आमची रेस्टाॅरंटच्या पार्कींग लाॅट मधून गोल्फ कार्ट कोणीतरी चोरली, आम्ही दुसर्या कार्टमधून आमच्या कार्टचा शोध घेत असताना वेगळ्या ठिकाणी ती पार्क केलेली आढळली. तेव्हा पोलीसला कळवले तर त्यांनी काय सांगावे ? तुम्ही ती घेऊन जा. कोणीही कोणाची कार्ट नेतो हा वेगळाच अनुभव त्यावेळी आम्हाला आला.
शेवटी सगळ्या कार्टस् भाड्याच्या दुकानातच जातात.
_अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
6
इटालियन पिझ्झा गुजराथी लेडी …. evevnt मजेदार ….
मी ही एकटाच फिरलो आहे.
फक्त एकदाच सौ. बरोबर होती ….
_अरुण पुराणिक, पुणे.
7
मजा आली वाचायला, तो पावसाचा थरार अनुभवला आणि तो माणूसकीचा ओलावा.
— अंजोर चाफेकर, मुंबई.
8
पुटीन बेचा अनुभव थरारक आणि माणुसकीचा आलेला प्रत्यय तर फारच छान !
आम्हालाही असाच अनुभव श्रीनगरहून पेहलगामला जाताना आला होता. आमची गाडी रस्त्यात खराब झाली पण तेथील लोकल लोकांनी आम्हाला खूप धीर दिला आणि मदतही केली.
_आरती नचनानी, ठाणे.
माझी जडणघडण भाग ७६ अभिप्राय….
1
राधिका ताई,
अतिशय सुंदर हा लेख… एकापेक्षा एक शब्दांचा भांडार असलेला हा लेख मनात घर करून गेला .. ६० च्या दशकातील गुलाममह्हमद (तुम्हाला आजही हे नाव माहीत आहे ह्याचे कौतुक) तुम्ही आज दहशतवादींमधे शोधत आहात हे वाक्य म्हणजे चाबूक. काश्मीर वर्णन अप्रतिम. मनाला गारवा देऊन गेलं.. घोड्यावरचा तो थरारक प्रसंगाने शहाराच आणला..
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
_मानसी म्हसकर, वडोदरा.
3
अगदी तंतोतंत घडलेला प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यावेळी आम्ही खूप लहान होतो. बर्याचवेळा हा प्रसंग, ताई, छुंदा, पप्पा, आई यांच्या तोंडून ऐकला होता. पण आज वाचताना नव्यानेच काहीतरी अनुभवायला मिळाले.
आता आठवलं की देवाच्या योजनांचे कौतुक वाटते. हे वाचताना मला केरळची आपल्या ट्रीपची आठवण झाली. माझा पण काळ आला होतापण वेळ आली नव्हती !
_आरती नचनानी, ठाणे.
3
अगदी अविस्मरणीय अनुभव. तुमचे लेखन नेहमीच मनाला भावते. हे आजचे मात्र मनाला स्पर्शून गेले. भयानक प्रसंग उद्भवला होता. दैव बलवत्तर होतं तुमचं म्हणून वाचलात. हे जाणवलं.
_प्रज्ञा मिरासदार, पुणे.
4
खरच, तो क्षण आणि मोठ्या भावासारखा मदतीला धावून आलेला आणि विनाकारण ज्याला इतका बेदम मार खावा लागला आणि तरीही आपली जबाबदारी, आपले कर्तव्य समजून तुम्हाला तुमच्या माणसांपर्यंत सुखरूप घेऊन येणारा, माणसातील माणूसपण जपलेला तो देवदूत. त्याला सलाम 🙏
_अस्मिता पंडीत, पालघर.
6
Hi Bimba. Both write ups r very enjoyable. मजा आली.
_संध्या जंगले, बांद्रा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
