Tuesday, December 23, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
आपल्याला मागे एकदा कळविल्याप्रमाणे W’App च्या नवीन कार्य पद्धतीमुळे, सर्व वाचकांना त्यांच्या W ‘App नंबरवर नियमीतपणे रोजचे पोर्टल पाठविणे कठीण झाले आहे. अशाही परिस्थितीत, पोर्टल चालू ठेवण्याची आपण शिकस्त करीत आहोत.

आपल्याला नवीन वर्षात कोणत्या विषयावर वाचायला आवडेल हे कळविल्यास त्या प्रमाणे अवश्य प्रयत्न करता येईल.

आता पाहू या, गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

1
माध्यमभूषण आणि कोवळं ऊन : निर्मळ समाज मनाचे सुंदर दर्शन !
Read criticism of both the literary books one Madhym Bhushan and other Kowal Unh editted by Res Devendra Bhujbal sir and published by Res Alka vahini, the gems of our portal. while Nilaji Barve author of Kowal Unh , the great name in the world of story writing. I congratulate all.
Here i must mention the criticism given on these books above is also rendered by the person of equal stature, one like the ex -director (I and PR) and one other jewel in the literary world, Pralhad Jadhao, Sir.

Jadhao sir rightly described the character of the books.Persons in Madhyam Bhushan are of great excellence and really ornamental to their respective fields. This makes the stories aspiring. Nilaji Barve’s pen worked like a magic wand that left indelible impact on readers The unique aspect of Kowal Unique is QR codes given by the author which shows her attachment with the readers and naturally enhancing its worth. I sum up with expressing again my regards against the authors, our editor and the publisher again because of whom we could avail such precious books, critics of great Excellence too.
_Ranjit Chandel. Yavatmal.
2
नमस्कार सर,
‘माध्यमभूषण’ आणि ‘कोवळं ऊन’ या दोन्ही पुस्तकांवर प्रल्हाद जाधव यांचे सुंदर विवेचन. आदरणीय देवेंद्र सरांनी यापुढेही स्वतःची आणि अन्य साहित्यिकांची अशीच उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करावीत यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.

सौ.मीराताई रोपळेकर यांचे खूप खूऽऽऽऽऽऽऽप मनःपूर्वक अभिनंदन. शृंगेरी मठात घेण्यात येणारी गीता पठणाची पारंपरिक परीक्षाच मुळात एवढी कठीण असते तर ही विशेष परीक्षा नक्कीच त्याहून अवघड. अशा या अत्यंत अवघड गीता पठण स्पर्धेत प्रशंसनीय यश मिळविल्याबद्दल सौ. मीराताई यांचे पुनश्च एकवार आभाळभर कौतुक आणि अभिनंदन. 🙏🙏
श्रद्धा जोशी, डोंबिवली.

3 छान. आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या… परवीन कौसर. बंगळूर.

4
श्री नंदकुमार रोपळेकर यांनी “मैत्र जीवाचे” हा छान लेख लिहीला आहे. खरं तर मैत्री व मैत्र यामध्ये फरक आहे. आपल्या लेखात मैत्री पेक्षा मैत्र जास्त लोभस व चिरंतन असते हे आपल्या जिवलग मित्राबद्दल लिहिताना व्यक्त केले आहे. मैत्री तुटू शकते मैत्र अभंग असते, अतुट असते. असा दोस्ताना एखाद्या व्यक्तीसोबतच असतो. आपल्या प्रफुल्लित मैत्रीचे कौतुक करावे तितके कमीच आहे कारण अशी मैत्री जपणारे फार कमी असतात
आपल्या सहा दशकाच्या ‘मैत्र’ला सलाम.
मी एक मित्राची व्याख्या केली आहे. “आपल्याला झोप येते तेव्हा ज्याला जांभई येते तो खरा मित्र”
आपण दोघेही या व्याख्येत बसत असणार हे निश्चित.
आपली ही दोस्ती आणखी प्रफुल्लित व्हावी कायम ‘कुमार’ अवस्थेत रहावी अशी सदिच्छा व्यक्त करतो.
छान लेख!
श्रीधर कुलकर्णी. कळंब जि. धाराशिव

5 सप्रेम नमस्कार, आज लिखाणाचे एवढे विषय आहेत पण आज रत्न पारखी फार थोडे आहेत पण त्यात ज्येष्ठ तपस्वी आणि आमच्या सारख्यांचे मार्गदर्शक नंदकुमार रोपळेकर यांचे नांव आघाडीवर आहे. कारण आज त्यांचा विषय घनिष्ठ मैत्री हा असून नायक आहे दुसरे तपस्वी प्रफुल भानुशाली. राम लक्ष्मण जोडीची आठवण यावी अशी ही जोडी. जेथे प्रफुल तेथे नंदकुमार हे समीकरण सर्वांना अत्यंत परिचित झाले होते. वांद्रे येथे वसाहत शासकीय पण संबंध जिव्हाळ्याचे याचा मी म्हणजे प्रभु अग्रहारकर वारंवार आस्वाद घेतला आहे. त्यामुळे जिव्हाळा, मैत्री असे भावनिक विषय आणि त्याला साजेशी नंदकुमार आणि प्रफुल जोडी पडद्यावर पाहिली की सिनेसृष्टीतील नामांकित जोडया आपोआप समोर येतात हेच लक्षवेधी खास आकर्षण. अशा या जोडीचा महिमा नंदकुमार यांनी छान शब्दांकित केला आणि तो आम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध करून दिला या बद्दल नंदकुमार रोपळेकर यांचा मी ऋणी आहे. नंदकुमार-प्रफुल ही जोडी अशीच कार्यक्षम राहो हिच शुभेच्छा. प्रभु अग्रहारकर.
6
We both didn’t realise we were making memories when we met we just knew we were having fun.Our friendship is so deep that time doesn’t make any difference.Old friends are like comfortable sweaters – familiar, comforting, and always there to warm your heart.Sometimes talking to your best friend is all the therapy you need.There are friends, there is family, and then there are friends who become family which we are.Every time I think of old memories, I smile because you are always there in them, my bestie.
The wrinkles of old age haven’t been able to wipe away the memories of our youth.We will always be there for each other.
_ Prafull Bhanushali. Mumbai.

माझी जडणघडण : भाग ७७ अभिप्राय….
1
खूप सुंदर वर्णन ! पुन्हा बालीला गेल्यासारखे वाटले.
सुमन शृंगारपुरे, पुणे.

2 प्रवास करणे ही पैशाची उधळपट्टी नसते. अगदी खरं आहे. जगण्यातला आनंद ज्यातून मिळू शकतो, त्याचा तो एक भाग आहे. जगप्रवास मी ही केलेला आहे. बाली ला मी ही गेलेलो आहे. तो फायर डान्स मी ही बघितला आहे. बाली …. एक सुंदर प्रवास. रुपयाचे उदाहरण हे जीवनाचे वास्तव आहे. अरुण पुराणिक, पुणे.
3
अप्रतिम. सगळ्या घटना तुझ्या कडून ऐकलेल्या होत्या तरी ही परत वाचताना तोच थरार, भीती, सुटकेचा निश्वास हे सार अनुभवलं, जणू समोरच घडतय.
वंदना जोशी, पुणे.

4. ७६ व ७७ दोन्ही भाग वाचले. जणू मी प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेतला की काय असे वाटयला लागले. घोड्यावरची सफर हा तर थरारक अनुभव वाचताना माझ्या अंगावर कांटा आला. याचा सौम्य अनुभव मी माथेरानला अनेक वर्षापुर्वी हनीमूनला गेल्यावेळी घेतला होता. त्यामुळे तुझी काय अवस्था झाली असेल हे समजू शकते. गुलाम महमंदची तर फारच दया आली. माणणूसकीच्या पूढे धर्म जात वय सगळच गौण असते. पण अनेकदा सगळ्याच्या लक्षात येत नाही याचं वाईट वाटत. बालीचा अग्वी नृत्याचा कार्यक्रम व त्यानंतरचा जीव घेणारा प्रसंग अंगावर शहारा आणणारा होता. अशावेळी देवाची शक्ती कोणत्या रूपाने मदतीला येते. याचा प्रत्येय येतो आणि आपला विश्वास अधिक दृढ होतो.– रेखा राव, पार्ले.
5
सहलीत आलेला कसोटीचा क्षण आणि परक्या भूमीत भाषेचा अडसर असूनही दिसून आलेली – अनुभवलेली मानवता 🙏
— अस्मिता पंडित ,पालघर.

6 आज दोन्ही जडणघडणचे भाग वाचले.काश्मीरचा तो चित्तथरारक अनुभव अगदी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. बालीचे वर्णनही पुन्हा वाचताना मजाच वाटली. प्रवासात मिळणार्‍या एकेका अनुभवावरून जीवनाचे पैलूृ उलगडत जातात,ईश्वरी शक्तीची जाणीव होत राहते हे अगदीच खरे आहे. जडणघडण वाचताना नेहमीचीच मजा यातही आली. अरुणा मुल्हेरकर, अमेरिका.
7
छान वर्णन बाली बेटाचे.
छान वर्णन, सर्व डोळ्यासमोर उभे राहिले. घरबसल्या बाली ट्रिप घडली़
छाया मठकर, पुणे.

8 I have read all yr stories n really enjoyed reading them जयश्री कोतवाल, पुणे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”