नमस्कार मंडळी.
या वर्षातील हा आपल्याशी पहिलाच संवाद असल्याने, आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय वर्ष ठरो, यासाठी आमच्या कडून आम्ही प्रयत्न करू. आपण ही आपले योगदान असू द्या.
आता पाहू या, वाचकांच्या प्रतिक्रिया.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
1
नमस्कार,
तुमची ‘कुणी तिकीट देणार का तिकीट’ ही कविता खूप आवडली.
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका.
2
सर नमस्कार,
दि.२३ डिसेंबर २०२५ च्या न्यूज स्टोरी टुडे मधील आपले ‘कुणी तिकीट देता का रे तिकीट ?’ अतिशय सुंदर विडंबन काव्य. शंभर टक्के सत्य परिस्थिती. आवडलं बुवा आपल्याला !
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
3
मुलींना काय वाटत असावे ?
सुंदर लेख..
— कुमार निलंगेकर.
निवृत्त दूरदर्शन वरीष्ठ अभियंता, छ. संभाजीनगर
4
नियोजनबद्ध विकासाची हमी पक्षाच्या जाहीरनाम्यात दिली गेली पाहिजे. पक्षाचे व्हिजन निश्चित असावं.
— राजेंद्र लेंभे. मुंबई
5
साऱ्याच कविता, विडंबन खूपच सुरेख ! ‘संकल्प’ सिद्धीस जावो ! यासाठी शुभेच्छा 💐
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
6
अतिशय उत्तम अंक… समयोचित आणि विषयानुरूप लेख वाचून आनंद झाला. 🙏
— मृदुला राजे. जमशेदपुर
राधिका भांडारकर लिखित, माझी जडणघडण : समारोप. प्राप्त झालेले अभिप्राय….
1
मा. राधिकाताई ….
नमस्कार ….
आपली लेखमाला, स्वतःच्या जीवनाविषयी लिहिताना अत्यंत मुद्देसूद लेखन असल्याचे मला जाणवले आहे. उत्कृष्ट संवाद, मांडणी व्यवस्थित, अवास्तव कांहींही नाहीं. मी सर्व भाग वाचलेले आहेंत. आपण याला पुस्तक रूप द्यावे, असे मला वाटते ….
— अरुण पुराणिक. पुणे
2
👍👍 आता पुढे काय ?
— पूनम मानुधने. जळगाव
3
अरेच्या, बघता बघता तुमच्या जडण घडण मध्ये आम्हीही गुंग होऊन गेलो ! आणि आता तुम्ही ‘बाय बाय’ केलं आहे !
पण काहीतरी नवीन लिखाण आमच्यासाठी पाठवत जा !
— उज्ज्वला सहस्रबुद्धे. पुणे
5
प्रिय राधिका,
‘माझी जडणघडण’चा समारोपही अतिशय हृद्य झाला आहे. सगळे लिखाणच खूप सुंदर, ओघवते आणि गुंतवून ठेवणारे झाले आहे. अनुभव कथनाला तुझी प्रगल्भ वैचारिक बैठक लाभल्याने ते खूप रंगतदार आणि वाचनीय, चिंतनीय झाले आहे. प्रत्येकाला आपलं आयुष्य ‘त्यात काय विशेष ?’ असं साधं, सरळ वाटत असतं. पण त्यातील चढ उतार, टक्के टोणपे आणि अनुभव इतरांना मार्गदर्शक आणि प्रेरक असू शकतात. तेही इतक्या सुंदर भाषेत लिहिलेले असतील तर काय दुधात साखरच ! खूप खूप अभिनंदन. असेच सुंदर लिखाण होत राहो.
— ज्योत्स्ना तानवडे. पुणे
6
छान होती लेखमाला. 👌👌
प्रत्येक लेख छान, अनुभवाने परिपूर्ण. छान लेख, सर्व एव्हढ्यात संपले पण.
— छाया मठकर. पुणे
7
राधिकाताई
माझी जडणघडण सुरू होऊन दीड वर्ष कधी झालं ते कळलंच नाही .. असं वाटतं जणू आत्ताच तुम्ही भाग लिहायला सुरुवात केली..
खरं म्हणजे हे तुमचं आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा अनुभवांचा खजिना होता जो तुम्ही आमच्या समोर खुला केला. अतिशय सुंदररित्या तुम्ही शब्दांमध्ये तुमचा अनुभव बंदिस्त केला… प्रत्येक भाग वाचताना खूप मजा यायची… अजून तर खूप काही जाणून घ्यायचं होतं , वाचायचं होतं.. तुमच्याबरोबर तुमचं गत आयुष्य पुन्हा जगायचं होतं … कधी कधी तुम्ही अनुभव तुमची लिहायचात आणि असं वाटायचं की हे तर माझ्यासोबत पण घडलं होतं.. इतकं ते जवळचं आपलंसं वाटत होतं … अजून खरं खूप काही वाचायचे आहे .. तुम्ही बघा पुन्हा लिहायला सुरुवात करा .. सध्या वाटलं तर थोडी विश्रांती घ्या… पण पुन्हा सुरू करा… आम्हाला माहिती आहे की अजून तर खूप काही आहे जे तुम्हाला सांगायचे आहे आणि आम्हाला जाणून घ्यायचे आहे… बघा पुन्हा एकदा लिहायला सुरुवात करा.. मी म्हटलं तसा पाहिजे तर ब्रेक घ्या.. पण जडणघडण थांबू नका… कारण आम्हालाही तुमच्यासोबत खूप काही शिकायला मिळालं… यावेळेस सुद्धा पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
— मानसी म्हसकर. वडोदरा
8
ही मालिका आटपलीस याचे दुःख आहेच. पण हे ही खरे आहे, हे प्रत्येक क्षणाला घडतच जाणारं आहे.
ज्यांना संस्कार दिले त्यांच्या सोबतीने जाताना माझ्यावर नव्याने संस्कार होत आहेत.
किती सुंदर आणि खरं आहे.
आता उद्या वाचायला जडणघडण नाही याचेच वाईट वाटते. पण सुरवात असते तेथे शेवट असतोच !
सौ अलका भुजबळ व देवेंन्द्र भुजबळ यांचे मनापासून आभार.
— अंजोर चाफेकर. गोरेगाव
9
थांबू नका.
लिहा..
— सुमती पवार. नाशिक
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
